ह्युंडईकडून अवघ्या 31 महिन्यात 2.5 लाख Venue SUVs ची विक्री, जाणून घ्या कारला इतकी डिमांड का?

Hyundai Venue ही नेहमीच भारतीय बाजारपेठेतील टॉप तीन सर्वाधिक विकल्या जाणार्‍या कॉम्पॅक्ट SUV पैकी एक राहिली आहे. Hyundai ने पहिल्या 6 महिन्यांतच 50,000 युनिट्सची विक्री केली होती.

ह्युंडईकडून अवघ्या 31 महिन्यात 2.5 लाख Venue SUVs ची विक्री, जाणून घ्या कारला इतकी डिमांड का?
Hyundai Venue
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 7:00 PM

मुंबई : Hyundai Venue ही नेहमीच भारतीय बाजारपेठेतील टॉप तीन सर्वाधिक विकल्या जाणार्‍या कॉम्पॅक्ट SUV पैकी एक राहिली आहे. Hyundai ने पहिल्या 6 महिन्यांतच 50,000 युनिट्सची विक्री केली होती. या सेगमेंटमध्ये वाढती स्पर्धा असूनही ह्युंडईला व्हेन्यूच्या 2.5 लाख युनिट्सची विक्री करण्यासाठी केवळ 31 महिने लागले. (Hyundai sold 2.5 lakh Venue compact suv in 31 months)

Hyundai Venue ही भारतीय बाजारपेठेतील परवडणाऱ्या कॉम्पॅक्ट SUV पैकी एक आहे. या कारची सुरुवातीची किंमत 6.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे आणि या कारच्या टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 11.85 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. Hyundai E, S, S+, S(O), SX, SX(O) एक्झिक्युटिव्ह, SX+ आणि SX(O) अशा आठ ट्रिममध्ये ही कार ऑफर करते. म्हणूनच, प्रत्येक ग्राहक त्याच्यासाठी योग्य पर्याय निवडू शकतो.

इतर कोणत्याही Hyundai वाहनाप्रमाणे, Venue मध्येदेखील अनेक उत्तमोत्तम फीचर्स आणि टूल्स मिळतात. यात ब्लूलिंक कनेक्टेड कार तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस मोबाइल चार्जर, स्टार्ट/स्टॉपसाठी पुश बटण, क्रूझ कंट्रोल, रिअर एसी व्हेंट्स, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह 8 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग मिळते.

तुम्हाला एलईडी डे टाईम रनिंग लॅम्प, प्रोजेक्टर हेडलॅम्प, क्रिस्टल इफेक्टसह एलईडी टेल लॅम्प, मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले, रिअर पार्किंग कॅमेरा, कॉर्नरिंग लॅम्प, हिल स्टार्ट असिस्ट, लेदर अपहोल्स्ट्री, एअर प्युरिफायर, ड्रायव्हर रीअर व्ह्यू मॉनिटर, आर्कमिस स्पीकर हे फीचर्सदेखील या कारमध्ये मिळतात.

Hyundai Venue चं इंजिन

Hyundai Venue तीन इंजिन पर्यायासह यते. यामध्ये 1.2-लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, 1.5-लीटर डिझेल इंजिन आणि 1.0-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनाचा पर्याय आहे. जे डायरेक्ट-इंजेक्शनसह येते. नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन 83 PS पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. हे इंजिन अशा लोकांसाठी आहे जे डेली ट्रांसपोर्ट आणि सिटी ड्युडीसाठी कारचा वापर करतात.

कारमध्ये डिझेल इंजिन देखील आहे जे 100 PS मॅक्सिमम पॉवर आणि 240 Nm पीक टॉर्क निर्माण करते. यात 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. हे इंजिन अशा लोकांसाठी आहे जे महामार्गावर त्यांच्या वाहनाचा खूप वापर करतात कारण पेट्रोल इंजिनपेक्षा डिझेल इंजिन अधिक किफायतशीर आहे.

याशिवाय, यात टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देखील आहे जे 120 PS मॅक्सिमम पॉवर आणि 172 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स, 6-स्पीड iMT गिअरबॉक्स किंवा 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. जर तुम्हाला व्हेन्यूसह ऑटोमॅटिक गिअरबॉक्स हवा असेल तर तुम्हाला या इंजिनाचा पर्याय निवडावा लागेल.

इतर बातम्या

Hero Moto Corp : जानेवारीपासून महाग होणार ‘हिरों’सह विविध गाड्या, इथे पाहा मॉडेल्स आणि किंमती

Toyota India : टाटा नॅनोपेक्षाही छोटी आहे टोयोटाची ‘ही’ इलेक्ट्रिक कार; काय आहे खास, वाचा…

Motorcycles India : TVS मोटरनं लाँच केली अपाची आरटीआर 165 RP लिमिटेड एडिशन, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

(Hyundai sold 2.5 lakh Venue compact suv in 31 months)