
Car sales: जानेवारी महिन्यात भारताच्या कार बाजारात उलटफेर पाहायला मिळाला आहे. एरव्ही मारुती कारची विक्री चार्टमध्ये सर्वात वरची असते. मात्र यंदा टाटाची कार टॉप पोझिशनमध्ये. मात्र, टॉप-१० च्या यादीत मारुतीच्या ६ मॉडेल्सना स्थान मिळाले आहे. परंतू आता टाटाची नेक्सॉन कार नंबर वनला आली आहे. यामुळे हे स्पष्ट झाले आहे की ग्राहक आता केवळ ब्रँड नव्हे तर सेफ्टी, फिचर्स आणि सुव्हसारख्या बॉडीला जास्त महत्व देत आहेत. बाजारात सुव्ह आणि क्रॉसओव्हर कारची मागणी वेगाने वाढली आहे.तर हॅचबॅक आणि सेडान सारख्या आधी पसंद होणाऱ्या कारचे मार्केट हळूहळू कमी होत आहे.
जानेवारी २००६ मध्ये सर्वात जास्त विक्री झालेल्या कारच्या यादीत टाटा नेक्सॉन पहिल्या क्रमांकावर आहे. नेक्सॉनच्या २३,३६५ युनिट्स विक्री झाल्या आहेत. बऱ्याच काळाने पहिल्यांदा मारुतीच्या कारशिवाय अन्य कोणा कंपनीची कार विक्रीत सर्वात वरच्या क्रमांकावर आली आहे. दुसरा क्रमांक अर्थात मारुती डिझायर आली आहे. तर या कारच्या १९,६२० युनिट्स विक्री झाल्या आहेत. दोन्ही कारच्या मध्ये ३,७०० कारचे अंतर आहे. जे खुप जास्त मानले जात आहे.
Nexon च्या यशामागे या कारच्या पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटच्या साथ-साथ इलेक्ट्रीक मॉडेलला देखील मजबूत मागणी आहे. जानेवारीमध्ये टाटाच्या एकूण इलेक्ट्रिक कारची विक्री ९,०५२ युनिट्स झाली आहे.ज्यात मोठा हिस्सा नेक्सॉन ईव्हीचा आहे. याची किंमत, सेफ्टी फिचर्स आणि आत मिळणाऱ्या सेवा ग्राहकांना आकर्षित करत आहेत.
मारुती भलेही नंबर वन झाली नाही तरी त्याची ताकद तिच्या मोठ्या रेंजमध्ये पाहायला मिळत आहे. टॉप- १० मध्ये मारुती कारचे सहा मॉडेल्सचा समावेश आहे. डिझायर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाचव्या नंबरवर एर्टिगा असून तिचे १७,८९२ युनिट्स विक्री झाले आहेत. सहाव्या क्रमांकावर स्विफ्ट आली असून तिच्या १७,८०६ युनिट्स विक्री झाल्या आहेत. सातव्या क्रमांकावर ब्रीझा आली असून तिच्या १७,४८६ युनिट्सची विक्री झाली आहे. आठव्या क्रमांकावर बलेनो असून तिच्या १६,७८२ युनिट्स विक्री झाल्या आहेत. दहाव्या क्रमांकावर नवी व्हीक्टोरिस असून तिच्या १५,२४० युनिट्सची विक्री झाली आहे.
या सहा मारुती कारची मिळून जानेवारीत एकूण १,०४,८३५ युनिट्सची विक्री झाली आहे. हा आकडा टाटाची नेक्सॉन आणि पंच एकूण विक्री ४२,६२२ युनिट्स झाली आहे. यावरुन स्पष्ट झाले की मारुतीच्या कार विक्रीत अजूनही मजबूत आहे. डिझायरचे कामगिरी खास झाली आहे,कारण स्विफ्ट पेक्षाही डिझायर कार महाग असूनही तिची जास्त विक्री झाली आहे. याचे मोठे कारण टॅक्सी आणि फ्लीटकडून येणारी मागणी म्हटले जात आहे. या कारमध्ये जास्त बुट स्पेस आणि सेडान बॉडी पसंद केली जाते. यासोबत सर्वसामान्य ग्राहकही हीची मजबूती आणि रिसेल व्हॅल्यूमुळे खरेदी करत आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर टाटा पंच आली असून तिच्या १९,२५७ युनिट्सची विक्री झाली आहे. ही कार डिझायर पेक्षा केवळ ३७२ युनिट्सने मागे राहिली आहे. छोटी एसयुव्ही असूनही पंचची विक्रीचे आकडे सांगतात की लोक आता हॅचबॅक कार सोडून उंच सीटींग आणि एसयुव्ही लुकच्या कारना पसंद करत आहेत. चौथ्या क्रमांकावर हुंडई क्रेटा असून तिच्या १७,९२१ युनिट्स विक्री झाल्या आहेत. हा आकडा चांगला असला तरी नेक्सॉन आणि पंचला या कारने मागे टाकल्याने बाजारातील समीकरणे बदलत आहेत हे यावरुन स्पष्ट होत आहे. टाटा कारची आक्रमक किंमत आणि सुरक्षेवरील भर यामुळे स्पर्धा आता तीव्र झाली आहे.
नवव्या क्रमांकावर महिंद्राची स्कॉर्पिओ असून याच्या १५,५४२ युनिट्सची विक्री झाली आहे. यात स्कॉर्पिओ एन आणि स्कॉर्पिओ क्लासिक दोन्हींचा समावेश आहे. या कार महागड्या असूनही त्यांची मागणी कायम आहे, खासकरुन छोट्या शहरात या कारला रुबाबदार कार मानले जाते.नव्या व्हीक्टोरिसने बाजारात वेगाने जागा तयार केली आहे. लाँचिंग पाच महिन्यात या कारच्या ५० हजार युनिट्स विक्री झाल्या आहेत. यावरु कळते मारुतीची डिलरशिप नेटवर्क आणि ब्रँडची ताकद अजूनही कायम आहे.