AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरजेचं आहे की पैशांचा अपव्यय? ‘अँटी रस्ट कोटिंग’वर पैसे खर्च करण्यापूर्वी ‘हे’ नक्की वाचा!

गाडी घेतली की त्यावर अँटी रस्ट कोटिंग करण्याची कार मालकाची धावपळ असते. यामुळे चेसिस आणि अंडरबॉडी गंजण्यापासून रोखता येते. पण ही अँटी रस्ट कोटिंग खरंच फायद्याची आहे का? गाडीचं वय आणि तुमच्या आसपासचं वातावरण पाहून कोटिंग करण्याचा निर्णय घेतला पाहीजे.

गरजेचं आहे की पैशांचा अपव्यय? 'अँटी रस्ट कोटिंग'वर पैसे खर्च करण्यापूर्वी 'हे' नक्की वाचा!
गरजेचं आहे की पैशांचा अपव्यय? 'अँटी रस्ट कोटिंग'वर पैसे खर्च करण्यापूर्वी 'हे' नक्की वाचा!Image Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 03, 2026 | 4:03 PM
Share

नवी कार खरेदी केली की तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं जातं. गाडीवर एक साधा रेघोटा जरी आला तरी जीव वर खाली होतो. इतकंच काय तर गाडीच्या प्रत्येक पार्ट्सची तितकीच काळजी घेतली जाते. गाडीच्या खालचा पत्रा सडू नये म्हणून अँटी रस्ट कोटिंगही केली जाते. नवी कार खरेदी केल्यानंतर डिलरशिप किंवा सर्व्हिस सेंटरमध्ये गाडी जाताच अँटी रस्ट कोटिंचा सल्ला सहज दिला जातो. पण नव्या गाडीला खरंच अँटी रस्ट कोटिंग करणं गरजेचं आहे का? कारण नव्या गाड्यांना कंपनीकडून अधिच अँटी रस्ट कोटिंग केलेलं असतं. त्यामुळे अँटी रस्ट कोटिंग करण्याची गरज भासत नाही. सामान्य आणि सुकं असलेल्या भागात राहणाऱ्यांनी अतिरिक्त कोटिंग करण्याची तशी गरज नाही. पण समुद्राच्या आसपास आणि पाणी साचत असलेल्या ठिकाणी राहणाऱ्यांनी अँटी रस्ट कोटिंग करणं भाग आहे.

अँटी रस्ट कोटिंग नेमकं काय असते?

अँटी रस्ट कोटिंगमुळे चेसिस आणि अंडरबॉडी सुरक्षित राहावी यासाठी एक परत लावली जाते. यामुळे गाडीचा हा भाग पाणी, दमट वातावरण, कचरा यापासून वाचण्यास मदत होते. अँटी रस्ट परत असल्यास गंज लागण्याची शक्यता कमी असते. पण आधुनिक कारमध्ये अंडरबॉडीवर गॅल्वनाइज्ड स्टील आणि फॅक्ट्री फिटेड अँटी रस्ट सुरक्षा असते. त्यामुळे नव्या कारला अतिरिक्त कोटिंग केलं नाही तर पाच ते दहा वर्षे आरामात गंजरहित राहू शकते. जर तुम्ही चेन्नई, गोवा किंवा मुंबईत राहात असाल आणि दमट वातावरणाचा सामना करावा लागत असेल तर अँटी रस्ट कोटिंग असणं आवश्यक पडू शकते.

तुमची गाडी पाच ते सहा वर्षे जुनी झाली असेल आणि कंपनीकडून कोटिंग घासली असेल, तर अँटी रस्ट कोटिंग करणं गरजेचं आहे. पण तुम्ही सुकं आणि सामान्य वातावरण भागात राहात असाल तर नव्या गाडीला तात्काळ अँटी रस्ट कोटिंग करणं तसं गरजेचं नाही. त्यामुळे पैशांचा अपव्यय होऊ शकतो.

अँटी रस्ट कोटिंग करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे गाडी धुवून सुकवणं. जर गाडी न धुताच किंवा धुतल्यानंतर न सुकवताच त्यावर कोटिंग केल्यास ओलावा राहिल. यामुळे गंज लागण्याची प्रक्रिया आणखी वेगाने होऊ शकते. म्हणून अॅटी रस्ट कोटिंग करण्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे.

Follow Us
15 दिवसांत कर्जमाफी जाहीर करा, नाहीतर… रोहित पवारांचा सरकारला इशारा
Rohit Pawar | 15 दिवसांत कर्जमाफी जाहीर करा, नाहीतर… रोहित पवारांचा सरकारला इशारा
संत्र्याचा सडाच पडला! नागपूरच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ
Nagpur Orange Loss | संत्र्याचा सडाच पडला! नागपूरच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ; 20-25 दिवसांपासून पाऊस गायब, शेतकरी संकटात
नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणूक! ट्रम्पांसमोर मोठं आव्हान
Donald Trump | नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणूक! ट्रम्पांसमोर मोठं आव्हान; हाऊस-सिनेटवर कोणाचं वर्चस्व?
पुण्यात भानामतीच्या संशयाने उडाली खळबळ; केसनंद तळेरान वाडीतील विचित्र.
पुण्यात भानामतीच्या संशयाने उडाली खळबळ; केसनंद तळेरान वाडीतील विचित्र अघोरी प्रकाराची चर्चा
गोकुळ निवडणुका जाहीर होताच सतेज पाटलांची बॅनरबाजी, राजकीय हालचाली...
गोकुळ निवडणुका जाहीर होताच सतेज पाटलांची बॅनरबाजी, राजकीय हालचालींना वेग
भोंदू बाबाने मुंबईतील कुटुंबाकडून उकळले 10.95 लाख; वरची एक नोट खरी...
Nashik | 15 कोटींचा पैशांचा पाऊस पाडतो! भोंदू बाबाने मुंबईतील कुटुंबाकडून उकळले 10.95 लाख; वरची एक नोट खरी, बाकी...
अजित पवारांचा अपघात कौटुंबिक विषय? बड्या नेत्याचा सुप्रिया सुळेंना...
अजित पवारांचा अपघात कौटुंबिक विषय? बड्या नेत्याचा सुप्रिया सुळेंना सवाल
आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका, महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला..
आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका, महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला...
रोहित पवार काँग्रेस वाटेवर? परिणय फुकेंच्या दाव्याचे राजकीय पडसाद
रोहित पवार काँग्रेस वाटेवर? परिणय फुकेंच्या दाव्याचे राजकीय पडसाद
पाकिस्तानचा रोज उदोउदो करता, तिथलाच सर्वोच्च पुरस्कार मिळायला हवा!
पाकिस्तानचा रोज उदोउदो करता, तिथलाच सर्वोच्च पुरस्कार मिळायला हवा! नवनाथ बन यांचा संजय राऊतांना टोला