3 लाखांची सूट, ‘या’ कंपनीने उडवली टोयोटाची झोप
इटालियन-अमेरिकन कंपनी जीप आपल्या लोकप्रिय एसयूव्ही- कंपास, मेरिडियन आणि ग्रँड चेरोकीवर भरघोस सूट देत आहे. जीप मेरिडियन एसयूव्हीवर या जूनमध्ये सर्वात मोठी सूट मिळत आहे. कंपनी या मॉडेलवर एकूण 3.90 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे.

भारतीय बाजारपेठेत जीपने जून 2025 मध्ये जबरदस्त ऑफर्स आणल्या आहेत. इटालियन-अमेरिकन कंपनी जीप आपल्या लोकप्रिय एसयूव्ही – कंपास, मेरिडियन आणि ग्रँड चेरोकीवर भरघोस सूट देत आहे, ज्यामुळे टोयोटासारख्या कंपन्यांसाठी तणाव वाढू शकतो.
जीप मेरिडियन एसयूव्हीवर या जूनमध्ये सर्वात मोठी सूट मिळत आहे. कंपनी या मॉडेलवर एकूण 3.90 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घ्या.
डीलरशिपकडे मोठ्या प्रमाणात जुना स्टॉक शिल्लक आहे, ज्याला दूर करण्यासाठी ब्रँडने मर्यादित कालावधीच्या ऑफर आणल्या आहेत. जर तुम्ही जीप एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकते.
जीप कंपास
- जीप कंपासवर कंपनी एकूण 2.95 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे.
- 1.70 लाख रुपयांपर्यंत ग्राहक सवलत
- 1.10 लाख रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बेनिफिट
- 15,000 रुपयांची खास ऑफर
कंपासमध्ये 2.0 लीटर टर्बो डिझेल इंजिन आहे, जे 170 एचपी पॉवर आणि 350 एनएम टॉर्क जनरेट करते. यासोबत ऑल व्हील ड्राइव्हचा पर्यायही देण्यात आला आहे. कंपासची किंमत 18.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 32.41 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.
जीप मेरिडियन: सवलत आघाडीवर
मेरिडियन एसयूव्हीवर या जूनमध्ये सर्वात मोठी सूट मिळत आहे. कंपनी या मॉडेलवर एकूण 3.90 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे.
जीप मेरिडियन ऑफर्स
- 2.30 लाख रुपयांपर्यंतची कन्झ्युमर ऑफर
- 1.30 लाख रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट
- 15,000 रुपयांचा विशेष लाभ
मेरिडियनची एक्स शोरूम किंमत 24.99 लाख रुपयांपासून 38.79 लाख रुपयांपर्यंत आहे. यात रेन सेन्सिंग वायपर्स, दुसऱ्या रांगेतील सीट आणि 6 एअरबॅगसारखे सेफ्टी एलिमेंट्स सारखे अॅडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत.
ग्रँड चेरोकी एसयूव्हीवर 3 लाखांची सूट
जीपची फ्लॅगशिप एसयूव्ही ग्रँड चेरोकीवरही या जूनमध्ये 3 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. ही कार सध्या भारतात केवळ एका व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून त्याची एक्स शोरूम किंमत 67.50 लाख रुपये आहे. लक्झरी सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही डील खास आहे.
‘या’ ऑफर्स फक्त जूनपर्यंतच वैध
लक्षात ठेवा, या सर्व सवलती मर्यादित कालावधीसाठी आहेत आणि केवळ 30 जून 2025 पर्यंत लागू असतील. तसेच, डीलरशिपनुसार ऑफर्समध्ये थोडा बदल होऊ शकतो. त्यामुळे कार खरेदी करण्यापूर्वी आपल्या जवळच्या जीप शोरूममध्ये नक्की कन्फर्म करा.
