AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

October Car Festival : बजेट ठेवा तयार, ऑक्टोबरमध्ये येतील या कार दमदार

October Car Festival : या कार ऑक्टोबर महिन्यात बाजारात दमखम दाखवतील. या कारमध्ये आधुनिक फीचर असतील. त्यामुळे ही कार घरासमोर दिमाखात उभी करायची असेल तर आतापासूनच बजेटची तयारी ठेवा. या कारचे माईलेज पण चांगले असेल. त्यामुळे हा सौदा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

October Car Festival : बजेट ठेवा तयार, ऑक्टोबरमध्ये येतील या कार दमदार
| Updated on: Oct 03, 2023 | 7:31 PM
Share

नवी दिल्ली | 3 ऑक्टोबर 2023 : तुम्ही या फेस्टिव्ह सीझनमध्ये कार घेण्याचा विचार करत असाल तर सध्या सर्वात चांगला कालावधी आहे. कार खरेदी करण्यापूर्वी ग्राहक दहा ठिकाणी चौकशी करतो. त्याच्या आवडीची कार पसंतीस उतरली तरी बजेटचा (Car Budget) विचार करतो. काही जण थोडाफार बदल करतात. काहीजण मॉडेल निवडताना चोखंदळ असतात. त्यांना कारमध्ये आवश्यक फीचर हवे असते. त्यासाठी ते अधिक पैसा पण मोजायला तयार असतात. तुम्ही या महिन्यात नवीन कार खरेदीचा विचार करत असाल तर बाजारात अनेक नवीन कार येत आहे. त्यासाठी तुमचे बजेट तयार ठेवा. या दमदार कार कोणत्या आहेत?

Nissan Magnite

Reports नुसार, निसानची सब-फोर मीटर एसयूव्ही मॅग्नाइटचा AAMT ही कार लॉन्च करू शकते. सध्या बाजारात SUV ही CVT ट्रान्समिशनसह विक्री होते. नवीन ट्रान्समिशनशिवाय या नवीन कारमध्ये अनेक दमदार फीचर दिसतील. यामध्ये इंटिरिअर आणि आणखी काही फीचर पण दिसतील. कंपनी या एसयुव्हीची नवीन एडिशन कुरो पण बाजारात आणण्याची शक्यता आहे. नवीन एडिशनची बुकिंग सुरु आहे.

Tata Punch Electric

टाटा कंपनीची एसयुव्ही पंचची इलेक्ट्रिक व्हेरिएंट या महिन्यात बाजारात दाखल होईल. या वर्षाच्या अखेरपर्यंत तीन इलेक्ट्रिक SUV बाजारात येतील. या कार बाजारात दाखल होत असल्याचा अंदाज कंपनीने सप्टेंबर महिन्यातच वर्तवला होता. नेक्सन EV फेसलिफ्टसह येऊ शकते.

Lexus LS

लक्झरी कार तयारी करणारी लेक्सस या महिन्यात त्यांची एलएम एमपीव्ही लाँच करु शकते. या MPV ला टोयोटा वेलफायर प्लॅटफॉर्म वर तयार करण्यात आले आहे. या कारचे बुकिंग कंपनीने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच सुरु केले होते.

Force Gurkha

कंपनी पाच डोअर व्हर्जनची ही कार या महिन्यात बाजारात उतरवू शकते. रिपोर्ट्सनुसार या SUV ची रस्त्यावर अनेकदा चाचपणी करण्यात आली आहे. त्यानुसार, आवश्यक बदल करण्यात येत आहे. या कारमध्ये तीन रो सीट येऊ शकते.

BYD Seal

ही इलेक्ट्रिक कार थायलंडमध्ये 30 ते 37 लाख रुपयात लाँच करण्यात आली आहे. एका अंदाजानुसार, ही कार या महिन्यात अथवा लवकरच भारतात दाखल होऊ शकते. जर ही कार भारतात आली तर तिची अंदाजित किंमत 60 लाख रुपये असू शकते. पण याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक.
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका.
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत.
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल.