AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रतीक्षा संपली! Kia Carens 15 फेब्रुवारीला बाजारात, Alcazar आणि Safari ला टक्कर

किया (Kia) कारप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे, दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल कंपनी Kia लवकरच भारतात आणखी एक नवीन कार बाजारपेठेत आणणार आहे. किया (Kia India) ने घोषणा केली आहे की, त्यांची कॅरेन्स (Carens MPV) भारतात 15 फेब्रुवारी 2022 रोजी लॉन्च होईल.

प्रतीक्षा संपली! Kia Carens 15 फेब्रुवारीला बाजारात, Alcazar आणि Safari ला टक्कर
Kia Carens
| Updated on: Feb 08, 2022 | 12:14 PM
Share

मुंबई : किया (Kia) कारप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे, दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल कंपनी Kia लवकरच भारतात आणखी एक नवीन कार बाजारपेठेत आणणार आहे. किया (Kia India) ने घोषणा केली आहे की, त्यांची कॅरेन्स (Carens MPV) भारतात 15 फेब्रुवारी 2022 रोजी लॉन्च होईल. ही थ्री रो एमपीव्ही डिसेंबर 2021 मध्ये सादर करण्यात आली होती. या कारची बुकिंग गेल्या महिन्यात सुरू झाली होती. ग्राहक 25000 रुपये भरुन ही कार बुक करु शकतात. मार्च महिन्यात भारतात या कारचे वितरण सुरु होईल. भारतीय बाजारपेठेत Carens ला Hyundai Alcazar आणि Tata Safari या गाड्यांशी स्पर्धा करावी लागेल.

कॅरेन्स गाडीची कमी असणारी किंमत बाजारपेठेत महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकते. या कारमध्ये पॅनोरमिक सनरुफ, 360 डिग्री सराऊंड व्ह्यू सिस्टम आणि 2.0 लीटर पेट्रोल इंजिन नसल्यामुळे (जे तिची स्पर्धक ह्युंडई अल्काझारमध्ये देण्यात आलं आहे.) या कारची किंमत जास्त ठेवता येणार नाही. त्यामुळे ही कार कमी किंमतीसह सादर केली जाईल. त्यामुळे या कारला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो.

Carens पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पॉवर ट्रेनसह ऑफर केली आहे. कॅरेन्स 15 फेब्रुवारीपासून भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होईल. कंपनीने अद्याप या कारची किंमत जाहीर केलेली नाही. लाँचिंगवेळीच किंमत जाहीर केली जाईल.

Carens MPV भारतात वेगवेगळ्या पॉवरट्रेन आणि गियरबॉक्स पर्यायांसह लाँच केली जाईल. ही कार 1.5-लीटर नॅचरली-अ‍ॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, 1.4-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन पर्यायासह सादर केली जाईल. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये सिक्स-स्पीड मॅन्युअल, सेव्हेन-स्पीड डीसीटी किंवा सिक्स-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असतील.

सेफ्टी फीचर्स

कॅरेन्सच्या फीचर्समध्ये एलईडी हेडलॅम्प, 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इलेक्ट्रिक सनरूफ, वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, रूफ माउंटेड एअरकॉन व्हेंट्स, वन-टच इलेक्ट्रिक टंबल फंक्शन यांचा समावेश आहे. या कारमधील सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, सहा एअरबॅग्ज, एबीएस, ईएससी, रियर पार्किंग सेन्सर्स, डाउनहिल ब्रेक कंट्रोल आणि चारही चाकांवर डिस्क ब्रेक यांचा समावेश आहे.

इतर बातम्या

मोठी बॅटरी, 64MP कॅमेरासह Vivo चा किफायतशीर 5G स्मार्टफोन बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

3D अवतार, स्क्रीन शेअरिंगसह भन्नाट फीचर्स, Instagram वापरणं अधिक मजेदार होणार, पाहा नवीन फीचर्सची यादी

Tata Play Fiber कडून एक महिना मोफत 1000GB हाय-स्पीड इंटरनेट, जाणून घ्या ऑफर क्लेम करण्याची पद्धत

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.