Audi Q3 : डिझाईन, इंटिरियर्स अन्‌ इंजिन सगळं एकदम ओक्के… नवीन ऑडीत ‘हे’ फीचर्स आहेत खास

नवीन Audi Q3 भारतात दोन प्रकारात सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये एक्सटिरियर आणि इंटिरियर्समध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. कंपनी वॉरंटी आणि सर्व्हिसवर ऑफरही देत आहे. या लेखातून जाणून घेऊया या कारचे खास 5 फीचर्स

Audi Q3 : डिझाईन, इंटिरियर्स अन्‌ इंजिन सगळं एकदम ओक्के... नवीन ऑडीत ‘हे’ फीचर्स आहेत खास
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 12:22 PM

ऑडी क्यू 3 (Audi Q3) भारतात लॉन्च करण्यात आली आहे. भारतात कारची सुरुवातीची किंमत 44.89 लाख रुपये (एक्सशोरूम, दिल्ली) आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन कारमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे नवीन कार अधिक खास दिसत आहे. त्याच सोबत कंपनीने नवीन कारच्या एक्सटिरियर (Exterior) आणि इंटिरियरमध्येही अनेक बदल करुन नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. यातील काही फीचर्स (Feature) पहिल्यांदाच ग्राहकांना देण्यात आले आहेत. या लेखाच्या माध्यमातून काही खास फीचर्सची माहिती घेणार आहोत.

1) एक्सटिरियर डिझाइन : नवीन कारचे फ्रंट डिझाइन केवळ मोठे नाही तर जुन्या मॉडेलपेक्षा ते अधिक आकर्षक दिसते. त्याला एक लांब व्हीलबेस देण्यात आला आहे. जुन्या मॉडेल्सप्रमाणे यामध्ये हेडलॅम्पचा वापर करण्यात आला आहे. या एसयुव्ही कारमध्ये 18 इंची व्हील्सचा वापर करण्यात आला आहे. ही कार पाच कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे.

2) इंटिरियर्स: नवीन ऑडी कारमध्ये आतील बाजूस प्रीमियम सेगमेंटचा डॅशबोर्ड डिझाइन केलेला आहे. तसेच, यामध्ये 10.1 इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम वापरण्यात आली असून तिला अॅल्युमिनियमने सजवलेले आहे. यात 10.25 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. पार्किंग असिस्टंट आणि रिव्हर्स पार्किंग सेंसर देण्यात आले आहेत.

3) पॉवरट्रेन : कारमध्ये 2.9 लीटर चार सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 190 hp पॉवर आणि 320 Nm टॉर्क जनरेट करू शकते. ही कार 7 स्पीड DTT क्लचसह येते. यात ऑल व्हील ड्राइव्हचा पर्याय आहे. कंपनीचा दावा आहे की कार केवळ 7.3 सेकंदात 0-100 किमीचा वेग पकडते.

4) व्हेरिएंट आणि किंमत : ही ऑडी कार प्रीमियम प्लस आणि टेक्नॉलॉजी या दोन प्रकारांमध्ये भारतात लॉन्च करण्यात आली आहे. प्रीमियम प्लसची एक्सशोरूम किंमत 44.89 लाख रुपये आहे. तर टेक्नॉलॉजी व्हेरियंटची किंमत 50.39 लाख रुपये आहे. दोन्ही किंमती एक्सशोरूम, दिल्लीतील आहेत.

5) वॉरंटी : ऑडी सध्या 5 वर्षांची एक्सपांडेबल वॉरंटी देत आहे, तर पहिल्या 500 ग्राहकांसाठी, कंपनी अतिरिक्त तीन वर्षे किंवा 50 हजार किलोमीटरपर्यंतचे सर्व्हिस पॅकेज देईल. ही ऑडी कार मर्सिडीज-बेंझ GLA, BMW X1, Mini Countryman आणि Volvo XC40 बरोबर स्पर्धा करेल.

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.