AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KTM RC 125 vs Suzuki Gixxer SF 250 कोणती बाइक वरचढ? जाणून घ्या एका क्लिकवर

KTM RC 125 vs Suzuki Gixxer SF 250 या दोन्ही बाइकची आपण तुलनात्मक माहिती घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला तुमच्या बाइकची निवड करणं सोपं ठरणार आहे. आज आपण दोन्ही बाइकची किंमत, इंजिन आणि लूकबाबत जाणून घेणार आहोत.

KTM RC 125 vs Suzuki Gixxer SF 250 कोणती बाइक वरचढ? जाणून घ्या एका क्लिकवर
KTM RC 125 आणि Suzuki Gixxer SF 250 मध्ये निवड करायची आहे? मग ही बातमी वाचा
| Updated on: Feb 11, 2023 | 6:55 PM
Share

मुंबई- भारतात मोठ्या प्रमाणात दुचाकींना मागणी आहे. त्यामुळे ऑटो कंपन्या ग्राहकांची मागणी पाहता एकापेक्षा एक अशा सरस बाइक लाँच करतात. तरुणांमध्ये तर स्पोर्ट बाइकची जबरदस्त क्रेझ आहे. या गाड्यांची किंमत जास्त असली तरी आपल्याकडे स्पोर्ट बाइक असावी असा अट्टाहास असतो. पण काही स्पोर्ट्स बाइकची किंमत आपल्या खिशाला परवडणारी देखील असते. पण निवड योग्य असणं गरजेचं आहे. जर तुम्हीही स्पोर्ट्स बाइक घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. यासाठी आमच्याकडे केटीएम इंडियाची स्वस्त आणि मस्त सुपर स्पोर्ट्स बाइक आरसी 125 आहे. ट्रॅक रायडिंगसाठी ही जबरदस्त बाइक आहे. दुसरीकडे भारतीय बाजारात सुझुकीची गिक्सर एसएफ 250 इतर स्पोर्ट बाइकशी स्पर्धा करते. कंपनीने नुकतंच या बाइकमध्ये अपडेट केले आहेत. आज आम्ही KTM RC 125 आणि Suzuki Gixxer SF 250 या दोन बाइकबाबत सविस्तर माहिती देणार आहोत. यामुळे तुम्हाला गाडीची निवड करणं सोपं जाईल.

KTM RC 125 vs Suzuki Gixxer SF 250 लूक आणि किंमत

केटीएम आरसी 125 आणि सुझुकी गिक्सर एसएफ 250 या दोन्ही स्पोर्ट्स बाइक आहेत.या दोन्ही बाइकचा लूक एकदम जबरदस्त आहे. आरसी 125 ही आरसी 390 चं छोटं वर्जन आहे, असंच म्हणावं लागेल. तर गिक्सर एसएफ 250 गिक्सर एसएफसारखीच दिसते. दोन्ही गाड्यांमध्ये एलसीडी डिस्प्ले, एलईडी टेल लँप, टर्न इंडिकेटर आणि सुपरमोटो एबीएस आहे. गिक्सर एसएफ 250 मध्ये नुकतंच अपडेट केलं होतं. यात ब्लूटूथसह डिजिटल कंसोल, सुझुकी इजी स्टार्ट सिस्टम आणि एलईडी लँप आहेत.

KTM RC 125 vs Suzuki Gixxer SF 250 गाड्यांची किंमत

भारतीय बाजारात केटीएम आरसी 125 किंमत 1.87 लाख रुपये, तर सुझुकी गिक्सर एसएफ 250 ची किंमत 1.93 लाख रुपये इतकी आहे. सुझुकी गिक्सर एसएफसाठी 9600 हजार रुपये अतिरिक्त मोजावे लागतील.

KTM RC 125 आणि Suzuki Gixxer SF 250 इंजिन

आरसी 125 मध्ये 124.99 सीसी, लिक्विड कूल इंजिन आहे. हे इंजिन 14.69 बीएचपी आणि 12 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6 स्पीड गियरबॉक्सशी जोडलेलं आहे. दुसरीकडे, गिक्सर एसएफ 250 मध्ये 249 सीसी ऑईल कूल्ड इंजिन दिलं आहे. हे इंजिन 26.13 बीएचपी आणि 22 एनएम टॉर्क जनरेट करते. यातही 6 स्पीड गिअरबॉक्स आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.