AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेड इन इंडिया जीप रेंगलर (Jeep Wrangler)मार्चमध्ये लॉन्च होणार, कंपनीची मार्केटमध्ये 180 कोटी रुपयांची गुंतवणूक

मेड इन इंडिया जीप रेंगलर (Jeep Wrangler)मार्चमध्ये लॉन्च होणार, कंपनीची मार्केटमध्ये 180 कोटी रुपयांची गुंतवणूक (Made in India Jeep Wrangler will be launched in March)

मेड इन इंडिया जीप रेंगलर (Jeep Wrangler)मार्चमध्ये लॉन्च होणार, कंपनीची मार्केटमध्ये 180 कोटी रुपयांची गुंतवणूक
जीप रेंगलर (Jeep Wrangler)मार्चमध्ये लॉन्च होणार
| Updated on: Feb 18, 2021 | 2:45 PM
Share

नवी दिल्ली : जीप इंडियाचे मेड इन इंडिया मॉडेल जीप रेंगलर लाँचसाठी सज्ज झाली आहे. पुढच्या महिन्यात 15 मार्च रोजी या जीप इंडिया ही लोकली असेंबल्ड जीप रेंगलर लाँच करणार असून याची भारतात कंप्लिटली नॉक्ड डाऊन(CKD) युनिटप्रमाणे विक्री केली जाईल. जीप रेंगलरला रंजनगाव फॅसिलिटीमध्ये असेंबल केले जाईल. जीप इंडियाने दिलेल्या माहितीनुसार कंपनी मार्केटमध्ये 180 कोटी रुपये गुंतवणूक करणार असून यामुळे लोकल मॅन्युफॅक्चरिंगला चालना मिळेल. (Made in India Jeep Wrangler will be launched in March)

गतवर्षी गाडीची पहिली बॅच विकली

जीप रेंगलर 2020 मध्ये 63.94 लाख (एक्स-शोरूम, भारत) किंमतीमध्ये लाँच केली होती आणि मागील वर्षी फक्त पहिली बॅच विकण्यात आली होती. जीप रेंगलर एक अपडेटेड आणि रिवाईज्ड डॅशबोर्डसह येते. मध्यभागी युकनेक्ट 4 सी एनएव्ही 8.4 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे. ही प्रणाली नेव्हिगेशन, अॅपल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटोसह येते. यामध्ये तुम्हाला ड्युअल झोन स्वयंचलित हवामान नियंत्रण व इतर वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

काय आहेत जीपची वैशिष्टे?

नवीन रेंगलर जीपमध्ये पॅसिव किलेस एन्ट्री, पुश बटन स्टार्ट आणि बाकी महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. रेंगलरमध्ये तुम्हाला 5 सीटर कॅबिन लेआउट मिळते जे प्रीमियम लेदर आणि डॅशबोर्डसह येत असून सॉफ्ट फिल देते. एसयूव्हीमध्ये आपणास डिफ लॉक देखील मिळतात जे आपण इलेक्ट्रॉनिक स्विचसह सक्रिय करू शकता. हे स्विच सेंटर कन्सोलमध्ये दिले जाईल. या कारमध्ये तुम्हाला हाय आणि लो मोडसह 4 व्हील ड्राईव्ह मोड मिळेल. कारला 2.0 लिटरचे वॉर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाईल जे आठ स्पीड स्वयंचलित गिअरबॉक्ससह असेल जे 268 बीएचपी पॉवर आणि 400 न्यूटन मीटर टॉर्क प्रदान करते. हे ऑफरोडींग व्हेईकल असल्यामुळे कंपनीने यात 10.8 इंचचे ग्राऊंड क्लिअरन्स दिले आहे. रोड चाचणीदरम्यान अनेकदा गाडीची झलक पहायला मिळाली आहे. (Made in India Jeep Wrangler will be launched in March)

इतर बातम्या

ह्युंदायचा इलेक्ट्रिक SUVs चा धडाका, भारतात 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

पुढील आठवड्यात लाँच होणार रिअलमीचे दोन स्मार्टफोन, जाणून घ्या काय आहे खास?

Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला