AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahindra 2025 पर्यंत 5 लाख इलेक्ट्रिक वाहनं तयार करणार, 3000 कोटींची गुंतवणूक

प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे.

Mahindra 2025 पर्यंत 5 लाख इलेक्ट्रिक वाहनं तयार करणार, 3000 कोटींची गुंतवणूक
Mahindra And Mahindra
| Edited By: | Updated on: Apr 12, 2021 | 10:04 AM
Share

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. (Mahindra to invest 3000 crore in electric vehicle business, will sell 5 lakh electric vehicles by 2025)

पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, मंहिंद्रा अँड महिंद्रा कंपनी इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात 3,000 कोटी रुपयांची नवी गुंतवणूक करणार आहे.

देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने अशी माहिती दिली आहे की, कंपनी येत्या तीन वर्षांत इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात 3,000 कोटी रुपयांची नवी गुंतवणूक करणार आहे. तसेच या क्षेत्रात अधिकाधिक सहभाग घेण्याबाबत कंपनी विचार करत आहे.

3000 कोटींची नवी गुंतवणूक

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी जागतिक स्तरावर आपल्या क्षमतेचा वापर करुन ईव्ही प्लॅटफॉर्मच्या विकासावर जोमाने काम करीत आहे. महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिष शाह म्हणाले की, आम्ही इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत. आम्ही पूर्वी जे सांगितले होते, त्याव्यतिरिक्त ही गुंतवणूक असेल. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने आधी सांगितले होते की, येत्या पाच वर्षांत कंपनी वाहन आणि कृषी क्षेत्रात 9,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

5 लाख इलेक्ट्रिक वाहनं लाँच करण्याची तयारी

कंपनीने 2025 पर्यंत भारतीय रस्त्यांवर 5 लाख इलेक्ट्रिक वाहने उतरवण्याचे ध्येय ठेवले आहे. कंपनीने यापूर्वीच भारतात ईव्ही व्यवसायात 1,700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याशिवाय नवीन संशोधन आणि विकास केंद्रात (आर अँड डी) 500 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.

बंगळुरुत इलेक्ट्रिक टेक्नोलॉजी प्लान्ट सुरु

महिंद्रा आणि महिंद्राने यापूर्वीच बंगळुरूमध्ये इलेक्ट्रिक टेक्नोलॉजी प्लान्ट सुरु केला आहे. येथे बॅटरी पॅक, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोटर्सचे उत्पादन केले जाते. याशिवाय महाराष्ट्रात पुण्याजवळील चाकण प्लांटमध्ये नवीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करण्यासाठीही कंपनीने गुंतवणूक केली आहे.

कंपनी अनेक मॉडल्स लाँच करणार

अलीकडेच कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारलेल्या शाह यांनी सांगितले की, गुंतवणूकीची रक्कम नव्या प्लॅटफॉर्म आणि इतर संबंधित कामांच्या विकासासाठी वापरली जाईल. प्लॅटफॉर्मद्वारे कंपनीच्या विविध क्षमतांचा वापर करून वेगवेगळे मॉडल्स तयार केले जातील.

येणारा काळ इलेक्ट्रिक वाहनांचा

याशिवाय ते म्हणाले की कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या भागीदारीवरही विचार करणार आहे. येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असेल. शाह म्हणाले की, “आम्ही यापूर्वीच एक युती केली आहे. आम्ही इस्रायलची कंपनी आरईई (ऑटोमोटिव्ह) सोबत सामंजस्य करार केल्याची घोषणा केली आहे. हा करार लहान ट्रक आणि व्यावसायिक वाहनांसाठी आहे. तसेच आम्ही ईव्ही क्षेत्रात इतर काही भागीदाऱ्या करणार आहोत. अशा प्रकारच्या युत्यांसाठी आम्ही तयार आहोत.

संबंधित बातम्या

भारतातील इलेक्ट्रिकल व्हेईकल सेगमेंटमध्ये Siemens ची एंट्री, हिंदुजा ग्रुपशी हातमिळवणी

सिंगल चार्जमध्ये 563 किमी धावणार, Hummer EV च्या लूकची चाहत्यांना भुरळ

सिंगल चार्जवर 500KM रेंज, Kia EV6 कार खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा

(Mahindra to invest 3000 crore in electric vehicle business, will sell 5 lakh electric vehicles by 2025)

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.