सिंगल चार्जवर 500KM रेंज, Kia EV6 कार खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा

किआ कंपनीच्या (Kia Motors) या इलेक्ट्रिक कारने दक्षिण कोरियन बाजारात एक वेगळा विक्रम नोंदवला आहे. (Kia EV6)

सिंगल चार्जवर 500KM रेंज, Kia EV6 कार खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा
Kia EV6

मुंबई : ह्युंदायची इलेक्ट्रिक कार Ioniq 5 ला एका दिवसात 24,000 रिझर्व्हेशन्स मिळाल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली होती. या कारला टक्कर देणारी अजून एक कार मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. किआ कंपनीच्या (Kia Motors) या इलेक्ट्रिक कारने दक्षिण कोरियन बाजारात एक वेगळा विक्रम नोंदवला आहे. किआच्या ईव्ही 6 (Kia EV6) या इलेक्ट्रिक कारला एका दिवसात 21,000 रिझर्व्हेशन्स मिळाले आहेत. (Kia EV6 gets 21,000 reservations in single day)

बुकिंगसाठी ही कार ऑनलाइन उपलब्ध झाल्याच्या पहिल्याच दिवशी किआने हा रेकॉर्ड केला आहे. ईव्ही 6 ही कार 30 मार्च रोजी सादर करण्यात आली होती. ही किआ कार इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर एसयूव्ही आहे जी कंपनीने आपल्या नवीन प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. यात तुम्हाला 577 hp पॉवर मिळते आणि एकदा चार्ज झाल्यावर ही कार 500 किमीपर्यंत धावते. किआने असा दावा केला आहे की, त्यांची कार EV Porsche Taycan 4S हून वेगवान आहे.

किआ ईव्ही 6 इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म (ई-जीएमपी) वर आधारित आहे, हा प्लॅटफॉर्म विशेषत: इलेक्ट्रिक वाहनांसाठी विकसित केला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की आगामी काळात या प्लॅटफॉर्मचा इतर मॉडेल्समध्येही विस्तार होईल. 2026 पर्यंत 7 इलेक्ट्रिक मॉडेल्स सादर करण्याची किआची योजना आहे. ईव्ही 6 या ऑर्डरमधील पहिले मॉडेल आहे.

शानदार डिझाईन

कारचं फ्रंट पॅनल आधुनिक पद्धतीने डिझाईन करण्यात आलं आहे. ईव्ही 6 मध्ये एक शॉर्ट ओव्हरहँग आहे, असं फोटोंवरुन समजतंय. या कारची हेडलाईट बारीक असून एलईडी पॅटर्नमुले या कारला एक अनोखा लुक मिळाला आहे. नवीन इंटीरियरबद्दलची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल आणि नेव्हिगेशन (AVN) स्क्रीन जी हायटेक आणि हाय डेफिनेशन क्वालिटीसह येते. Kia EV6 ची बॅटरी पॉवर या कारला विशेष बनवते आणि नवीन फिलॉसफीसह या करचं डिझाइन तयार केलं आहे. कंपनी आता लवकरात लवकर अजून काही इलेक्ट्रिक व्हिकल सादर करणार आहे.

3.5 सेकंदात 100 किमी वेग

ही कार 4680 मिमी लांब, 1880 मिमी रूंद आणि 1550 मिमी उंच आहे. किआ ईव्ही 6 ही कार दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये विकली जाते, ज्यात 58kWh आणि 77.4kWh चा समावेश आहे. या बॅटरीच्या मदतीने ही ईव्ही अवघ्या 3.5 सेकंदात 100 किमी प्रतितास इतका वेग पकडते. त्याच वेळी, केबिनमध्ये अधिक जागा असलेली बरेच दमदार फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत.

मार्केटमध्ये दमदार कामगिरीची अपेक्षा

या वर्षाच्या अखेरीस किआ हे वाहन विक्रीसाठी उपलब्ध करुन देईल. बाजारात आपली वेगळी ओळख निर्माण करायची आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे. इलेक्ट्रिक व्हिकल्सच्या सेगमेंटमध्ये ही कार चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे. ही कार दक्षिण कोरिया आणि युरोपियन मार्केटमध्ये दमदार कामगिरी करेल, असा विश्वास कंपनीला आहे.

टेस्लाला टक्कर देणार?

इलेक्ट्रिक वाहन बाजारातील कंपन्यांमध्ये सतत स्पर्धा होत असतात. अशा परिस्थितीत होंडा, किआ आणि इतर कंपन्यांना टेस्लासारख्या तगड्या कंपनीला टक्कर द्यायची आहे. परंतु या कंपन्या टेस्लाला टक्कर देऊ शकतील का? हे येणारा काळच ठरवेल.

इतर बातम्या

एकदा चार्ज केल्यावर 452KM धावणार, 1.5 लाखांच्या डिस्काऊंटसह ‘ही’ इलेक्ट्रिक कार विक्रीस उपलब्ध

ह्युंदायचा इलेक्ट्रिक SUVs चा धडाका, भारतात 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

अवघ्या 10 हजारात बुक करा किफायतशीर इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जवर 200km धावणार

(Kia EV6 gets 21,000 reservations in single day)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI