मारुतीपासून टाटापर्यंत, 15 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या ‘या’ 5 कार मुलांसाठी सुरक्षित, जाणून घ्या
कार खरेदी करण्यापूर्वी आजकाल लोक त्याच्या सेफ्टी रेटिंगवरही लक्ष देतात. पण तुमची गाडी तुमच्या मुलांसाठीही सुरक्षित आहे का, हा मोठा प्रश्न आहे. अशाच 5 गाड्यांबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो ज्या 15 लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये येतात आणि लहान मुलांसाठीही सुरक्षित असतात.

तुम्ही कार खरेदी करणार असाल आणि तुम्ही त्याचे सेफ्टी रेटिंगही तपासले आहे. ती गाडी तुमच्या कुटुंबासाठी आणि विशेषत: मुलांसाठी सुरक्षित आहे का? जेव्हा जेव्हा कारचे सेफ्टी रेटिंग जाहीर केले जाते, तेव्हा ती कार मुलांसाठी किती सुरक्षित आहे याचे रेटिंग स्वतंत्रपणे सांगितले जाते. आम्ही तुम्हाला 15 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या अशा कार सांगत आहोत ज्या मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही जबरदस्त आहेत.
टाटा नेक्सॉन
टाटाची ही कार भारतातील पहिली फाइव्ह स्टार सेफ्टी रेटिंग कार आहे. टाटाची कॉम्पॅक्ट एसयूव्ही अॅडल्ट आणि चाइल्ड अशा दोन्ही कॅटेगरीत फाइव्ह स्टार सिक्युरिटीसोबत येते. याची एक्स शोरूम किंमत 8.99 लाख रुपयांपासून सुरू होते.
मारुती सुझुकी डिझायर
देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीची ही पहिली सेफ्टी रेटिंग कार आहे. सेडान श्रेणीतील या कारला प्रौढांसाठी 5 स्टार आणि लहान मुलांसाठी 4 स्टार सेफ्टी रेटिंग देण्यात आले आहे. याची एक्स शोरूम किंमत 6.84 लाख रुपयांपासून सुरू होते.
ह्युंदाई वरना
ह्युंदाईच्या सेडानला अॅडल्ट आणि चाइल्ड कॅटेगरीत 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. एक प्रीमियम सेगमेंटची कार आहे. याची सुरुवातीची किंमत 11.05 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
टाटा पंच
टाटा मोटर्सची एंट्री लेव्हल एसयूव्ही टाटा पंचला अॅडल्ट कॅटेगरीत फाइव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. बालसुरक्षेबाबत 4 स्टार रेटिंग देण्यात आले आहे. मात्र, ही देशातील सर्वात स्वस्त फाइव्ह स्टार सेफ्टी रेटिंग कारपैकी एक आहे. याची एक्स शोरूम किंमत 6.20 लाख रुपयांपासून सुरू होते.
स्कोडा कुशाक
स्कोडाच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही कुशाकला प्रौढ आणि बाल अशा दोन्ही प्रकारात 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. या कारची किंमत 10.99 लाख रुपयांपासून सुरू होते. अलीकडे या कारला चांगली मागणी आहे.
कारमधील मुलांची सुरक्षा
जेव्हा जेव्हा एखाद्या कारचे ‘चाइल्ड सेफ्टी रेटिंग’ जाहीर केले जाते. त्यानंतर ‘चाइल्ड सेफ्टी सीट हार्नेस’ने केलेल्या चाचणीवर आधारित आहे. त्यामुळे मुलांसोबत कारमधून प्रवास करताना त्यांच्या उत्तम सुरक्षिततेसाठी ही सीट हार्नेस असायला हवी. याची सुरुवातीची किंमत 3-4 हजार रुपयांच्या आसपास आहे.
आम्ही तुम्हाला तुमच्या मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असलेल्या वाहनांची माहिती सांगितली आहे. पण, लक्ष्यात घ्या मुलांकडे जोपर्यंत वाहन लायसन येत नाही, तोपर्यंत त्यांच्या हातात गाडी देऊ नका. तसेच नुकताच वाहनाचे लायसन मिळाले असेल तरीही एकदम मुलांना गाडी चालवायला देणे धोक्याचे ठरू शकतो. त्यासाठी पुरेसा सराव देखील आवश्यक आहे.
