मारुती सुझुकी ‘नो प्रॉब्लेम’! या गाडीला ग्राहकांकडून जबरदस्त मागणी, जाणून घ्या किंमत आणि मायलेज

| Updated on: Feb 27, 2023 | 5:47 PM

मारुतिच्या गाड्यांचा भारतीय बाजारात बोलबाला आहे. कंपनीची एकमेव एसयुव्ही गाडीची खूपच मागणी आहे. इतकंच काय तर एक लाखांची प्रतीक्षा यादीही आहे.

मारुती सुझुकी नो प्रॉब्लेम! या गाडीला ग्राहकांकडून जबरदस्त मागणी, जाणून घ्या किंमत आणि मायलेज
मायलेज एक नंबर असलेल्या मारुतीच्या 'या' गाडीसाठी ग्राहकांची झुंबड, 1 लाख ऑर्डर पेंडिंग
Follow us on

मुंबई : मारुति सुझुकीच्या गाड्यांना भारतात मोठी मागणी आहे. टॉप गाड्यांची आकडेवारी पाहिली की, याबाबतचा अंदाज येतो. मागच्या काही वर्षात भारतात एसयुव्हीची मागणी वाढली आहे. तसं पाहिलं तर या सेगमेंटमध्ये टाटाचा दबदबा जास्त आहे. मारुती सुझुकीही आता या सेगमेंटमध्ये आपले घट्ट रोवण्यासाठी सज्ज झाली आहे. यासाठी मारुतीने गेल्या वर्षी टोयोटा हायराइडरसोबत ग्रँड विटारा एसयुव्ही लाँच केली होती. या गाडीला ग्राहकांकडून जबरदस्त मागणी आहे. या गाडीसाठी जवळपास 1 लाख ऑर्डर पेंडिंग आहे. ही प्रतीक्षा यादी पाहिल्यावर गाडीच्या डिमांडबाबत अंदाज येतो. इतकी प्रतीक्षा यादी असूनही या गाडीचं बुकिंग सुरुच आहे.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच केली होती.ही गाडी ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टॉस, टोयोटा अर्बन क्रुझर हायराइडर या एसयुव्ही सेगमेंटमधील गाड्यांशी स्पर्धा करते. मारुती सुझुकीजवळ आतापर्यंत 90,350 पेक्षा जास्त ऑर्डर पेंडिंग आहेत. असं असूनही लोकं या गाडीसाठी थांबण्यास तयार आहेत. कंपनीने हायब्रिड मिड साइज एसयुव्ही आकर्षक लूक आणि फीचर्ससह लाँच केली होती. कंपनीने जानेवारी 2023 मध्ये ग्रँड विटाराचे 32 हजारांहून अधिक युनिट्सची डिलिव्हरी केली आहे. वाढत्या मागणीसह प्रतीक्षा यादीही लांबत चालली आहे.

ग्रँड विटाराचा 27.97 किमी मायलेज

कंपनीकडून या एसयुव्हीत इंटेलिजेंट इलेक्ट्रिक हायब्रिड इंजिन दिलं गेलं आहे.त्यामुळे ही गाडी जवळपास 27.97 किमीचा मायलेज देण्यास सक्षम आहे. या गाडीमध्ये 45 लीटर क्षमतेची इंधन टाकी आहे.

ग्रँड विटारा सीएनजी व्हेरियंटची डिमांड

मारुती सुझुकी ग्रँड विटाराची किंमत 10.45 लाख (एक्स शोरुम) ते 19.49 लाख रुपयांपर्यंत जाते. यासह कंपनीने दोन सीएनजी व्हेरियंट लाँच केले आहेत. ग्रँड विटारा सीएनजी मॉडेलची किंमत 12.85 लाखे ते 14.84 लाख रुपये आहे.

मारुती नव्या जनरेशनच्या के सीरिज गाड्यांमध्ये 1.5 लिटर, ड्युअल जेट, ड्युअल व्हीव्हीटी पेट्रोल इंजिन दिलं आहे. यामुळे 99 बीएचपी पॉवर आणि 136 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन पाच स्पीड मॅन्युअल आणि सहा स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलं आहे. त्याचबरोबर ई-सीव्हीटी ट्रान्समिशन स्ट्राँग हायब्रिड मॉडेलमध्ये देण्यात आली आहे. सीएनजीमध्ये मॅन्युअल गिअरबॉक्स असून 86.63 बीएचपी पॉवर आणि 121.5 एनएम पीक टॉर्क जनरेट करते.