
मारुती सुझुकी कंपनीने भारतात हुंडई क्रेटाला टक्कर देण्यासाठी आपली नवीन एसयुव्ही लाँच करण्याची तयारी पूर्ण केली आहे. परंतू मारुती सुझुकी कंपनीने या आगामी नव्या कारबाबत जास्त माहिती दिलेली नाही. परंतू ही नवीन कार येत्या 3 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात लाँच केली जाणार आहे. अलिकडेच वाहन निर्मिती कंपनीने या एसयूव्हीचा एक टीझर देखील जारी केला आहे. त्यात एक फूल एलईडी टेल लँप दाखवण्यात आला आहे.
टेल लँप डिझाईनमध्ये एक 3D लूक सोबत एक स्लीक ब्रेक लँप देखील दिसत आहे. ब्रेक लँपच्या दोन्ही बाजूला टर्न इंडिकेटर्स लावलेले दिसत आहेत. पहिल्या नजरेत टेल लँपचा आकार मारुती सुझुकी स्विफ्ट सारखा दिसत असला तरी हा त्याहून अधिक स्टायलिश दिसत आहे.
मारुती सुझुकी कंपनीने आगामी एसयुव्ही देशातील मास मार्केट एसयुव्ही सेगमेंटमध्ये आपला बाजारातील हिस्सा वाढविण्याच्या दिशेतील एक प्रयत्न आहे. ही नवीन एसयुव्ही सध्याच्या मारुती सुझुकी ग्रँड विटारावर आधारित असण्याची आशा आहे. मात्र, मारुतीच्या पोर्टफोलिओमध्ये या नव्या कारला ग्रँड विटारा आणि मारुती सुझुकी ब्रेजाच्या दरम्यान स्थान असे म्हटले जात आहे.
अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार मारुती सुझुकी कंपनी ही नवीन एसयुव्ही तिच्या एरिना डीलरशिपच्या माध्यमातून विकणार आहे. याचा अर्थ मारुती सुझुकी एक असा प्रोडक्ट आणण्याचे योजत आहे जे लोकांना खूपच पसंद पडावे. या नवीन कारद्वारे विक्रीच्या बाबतीत हुंडई क्रेटाला मागे टाकू इच्छित आहे.
मारुती सुझुकीच्याजवळ आधीपासून अन्य प्रोडक्ट्ससाठी अनेक पॉवरट्रेन आहे. यासाठी ती या नवीन एसयुव्हीचा देखील वापर करु शकते. या नवीन एसयुव्हीमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिनाचा समावेश आहे. जे 101 बीएचपीच्या कमाल पॉवर आणि 139 एनएमचा कमाल टॉर्क जनरेट करु शकते. याशिवाय यात पेट्रोल-सीएनजी पॉवरट्रेन देखील आहे. तसेच, ग्रँट विटारासारखी नवीन एसयुव्ही देखील पेट्रोल-हायब्रिड पॉवरट्रेनसह येऊ शकते.
मारुती सुझुकीने अलिकडेच आपल्या भारतीय कारखान्यात लिथियम-आयर्न बॅटरीचे प्रोडक्शन करण्याची घोषणा केली आहे. वाहन निर्माता कंपनी ग्रँड विटारासह नवीन एसयुव्हीचे हायब्रिड पॉवरट्रेनसाठी या घरगुती बॅटरीचा वापर करु शकते. यामुळे एसयुव्हीची किंमत कमी होऊ शकते.