Maruti Suzuki WagonR : मारुती सुझुकी वॅगनआर, गेल्या 2 महिन्यांपासून सर्वाधिक विक्री, का मिळेतय पसंती? जाणून घ्या…

| Updated on: May 13, 2022 | 2:25 PM

मायलेजच्या बाबतीत जबरदस्त असल्यानं मारुती वॅगनआर, डिझायर, स्विफ्ट आणि अल्टोसह इतर गाड्या लोकांना आवडतात.

Maruti Suzuki WagonR : मारुती सुझुकी वॅगनआर, गेल्या 2 महिन्यांपासून सर्वाधिक विक्री, का मिळेतय पसंती? जाणून घ्या...
मारुती सुझुकी वॅगनआर
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : मारुती सुझुकी वॅगनआरच्या (Maruti Suzuki WagonR) भारतात (India) सर्वाधिक कार (Car) विकल्या जातात. मात्र, दुसरीकडे सुरक्षेच्या दृष्टीनं मारुतीच्या गाड्या अधिक चांगल्या नाहीत अशी बरीच टीका होत असते. आता मायलेजच्या बाबतीत जबरदस्त असल्यानं मारुती वॅगनआर, डिझायर, स्विफ्ट आणि अल्टोसह इतर गाड्या लोकांना आवडतात. लोकांची या गाड्यांना अधिक पसंती असते. मारुती सुझुकीनं आपली लोकप्रिय हॅचबॅक वॅगनआर अधिक चांगल्या लूक आणि फीचर्ससह बाजारात आणली होती. त्यानंतर या कारची क्रेझ इतकी वाढली की मार्च आणि एप्रिल 2022 मध्ये ती सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली. नवीन मारुती वॅगनआरमध्ये 12 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. ही वैशिष्ट्ये अडचणीच्या वेळी लोकांना वाचवण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. आज आपण मारुती वॅगनआरच्‍या सेफ्टी फीचर्सबद्दल जाणून घेऊया…

 वॅगनआरमध्ये किती फीचर्स?

मारुती WagonR च्या सुरक्षा वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झाल्यास भारतातील सर्वात जास्त विकली जाणारी आणि परवडणारी फॅमिली कार म्हणून तीच्याकडे पाहिलं जातं. 12 पेक्षा जास्त सुरक्षा फीचर्स या कारमध्ये दिसतात. मारुती वॅगनआरमध्ये ड्रायव्हर एअरबॅग, पॅसेंजर एअरबॅग, EBD सह ABS, बजरसह सीट बेल्ट रिमाइंडर, सीट बेल्ट प्री-टेन्शनर, स्पीड अलर्ट सिस्टम, स्पीड सेन्सिटिव्ह ऑटो डोअर लॉक, सिक्युरिटी अलार्म, रिअर पार्किंग सेन्सर, सेंटर डोअर लॉकिंग, चाइल्ड प्रूफ असे फीचर्स आहेत. मागील दरवाजा लॉक, फ्रंट फॉग लॅम्प आणि हिल होल्ड असिस्ट यांसारखी सुरक्षा फीचर्स देखील आहेत. ही सर्व सुरक्षा वैशिष्ट्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या त्रासापासून वाचवण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. अलीकडच्या काळात मारुती सुझुकी आपल्या कारमधील सुरक्षा वैशिष्ट्यांवर भर देत आहे.

हे सुद्धा वाचा

सुझुकी वॅगनआरची किंमत

मारुती सुझुकी वॅगनआरची किंमत LXi, VXi, ZXi आणि ZXi+ या 4 ट्रिम लेव्हलमध्ये 11 प्रकारांमध्ये ऑफर केली जाते. पेट्रोल प्रकार येणारी  5.47 लाख ते 7.10 लाख रुपये कारची (एक्स-शोरूम) किंमत आहे. त्याचवेळी मारुती वॅगनआरच्या सीएनजी प्रकारातील कारची किंमत 6.42 लाख ते 6.86 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. मारुती वॅगनआर केवळ दिसायलाच चांगली नाही तर तिची वैशिष्ट्येही जबरदस्त आहेत. मायलेजच्या बाबतीत वॅगनआर सुपर आहे. नवीन मारुती WagonR चे मायलेज 1 लिटर पेट्रोल मॅन्युअलसाठी 23.56 किलोमीटर प्रति लिटर आहे, 1 लिटर पेट्रोल ऑटोमॅटिकसाठी 24.43 किलोमीटर प्रति लिटर, 1.2 लिटर पेट्रोल मॅन्युअलसाठी 24.35 किलोमीटर प्रति लिटर, 1.2 लिटरसाठी 25.19 किलोमीटर प्रति लिटरपर्यंत आहे.