AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

33.73 KM मायलेज, सनरूफ..किंमत 6,25,600! देशाची सर्वात विक्री झालेली कार, मध्यमवर्गीयांच्या उड्या…

इंडियन ऑटो मार्केटसाठी जुलै २०२६ चा महिना कारच्या विक्रीसाठी खूपच शानदार राहिला आहे. या काळात टॉप 10 मध्ये सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कारची एकूण विक्री २,००,८६८ युनिट झाली. जुलै २०२५ मध्ये १,४६,०२९ युनिट कारची विक्री झाली होती. त्या तुलनेत यंदा ३७.५५ टक्के वाढ झाली आहे. यंदा कंपन्यांनी ५४,८३९ कार जास्त विकल्या आहेत.

33.73 KM मायलेज, सनरूफ..किंमत 6,25,600! देशाची सर्वात विक्री झालेली कार, मध्यमवर्गीयांच्या उड्या...
maruti car sale
| Updated on: Aug 08, 2026 | 7:20 PM
Share

कार विक्रीत पुन्हा एकदा मारुती सुझुकी कंपनीच्या कारचा दबदबा पाहायला मिळाला आहे. या कंपनीच्या चार कारनी टॉप-५ मध्ये स्थान मिळवले आहे. याशिवाय टाटा मोटर्सच्या पंच कारच्या पेट्रोल आणि ईव्ही दोन्ही व्हेरिएंटची जबरदस्त विक्री नोंदली गेली आहे. चला तर पाहूयात.. जुलै २०२६ मध्ये देशाची टॉप-५ कारची कामगिरी कशी झाली आणि उर्वरित कारच्या विक्रीचे आकडे काय हे पाहूयात…

Maruti Dzire

मारुती सुझुकी कंपनीची सेडान कार डिझायर ( Maruti Dzire ) जुलै २०२६ मध्ये देशाची सर्वात जास्त विक्री होणारी कार ठरली आहे. कंपनीने या कारच्या २३,७९१ युनिट्स विकल्या आहेत. जी जुलै २०२५ च्या २०,८९५ युनिट्सच्या तुलनेत १३.८६ टक्के जास्त आहे. बाजारात याचा हिस्सा ११.८४ टक्के आहे. चांगला मायलेज, कम्फर्ट आणि कमी मेन्टेनन्स कॉस्टमुळे डिझायर भारतीय ग्राहकांची पहिली पसंदी बनली आहे.

डिझायरची एक्स शोरुम किंमत ६,२५,६०० रुपयांनी सुरु होते. हीचा मॉडर्न डिझाईन आकर्षक LED हेडलॅम्प, ट्रिनिटी टेल-लाईट्स आणि शार्क-फिन एंटीनावाला आहे.

हा ड्युअल-टोन, स्पेसियस आणि ९ इंचाचा टचस्क्रीनने सुसज्ज आहे. फिचर्समध्ये सनरुफ, ३६० डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जिंग आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी सामील आहे. सेफ्टीत ६ एअर बॅग, ESP, हिल-होल्ड आणि फाईव्ह स्टार GNCAP रेटिंग आहे. 1.2 लिटर Z-सिरीज पेट्रोल इंजिन (82 PS) मॅन्युअल/AMT मध्ये उपलब्ध आहे. पेट्रोलमध्ये मायलेज 24.79-25.71 किमी-लिटर आणि सीएनजीमध्ये 33.73 KMPG आहे.

दुसऱ्या क्रमांकावर मारुती सुझुकीची प्रसिद्ध हॅचबॅक वॅगन आरचा क्रमांक आहे. जुलै २०२६ मध्ये वॅगनआरची २३,३३८ युनिट्स विक्री झाल्या आहेत. तर जुलै २०२५ मध्ये हा आकडा १४,७१० युनिट्स असा होता. वॅगनआरने वार्षिक आधारावर ५८.६५ टक्क्यांची वाढ नोंदली आहे. टॉप-१० कारच्या एकूण विक्रीत वॅगनआरचा मार्केट शेअर ११.६२ टक्के राहीला आहे. जी या कारची टॉल-बॉय डिझाईन आणि उपयोगिता सिद्ध करते.

Maruti Ertiga

फॅमिली ७-सिटर सेगमेंटमध्ये आपला दबदबा कायम राखत मारुती एर्टिगा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. जुलै २०२६ मध्ये एर्टींगाच्या २१,६०६ युनिट्स विकल्या आहेत. गेल्या वर्षी याच महिन्यात १६,६०४ युनिट्स विकल्या गेल्याने यंदा ३०.१३ टक्के जास्त विक्री झाली आहे. १०.७६ टक्के मार्केट शेअर सोबत एर्टिंगाने दाखवले की मोठ्या फॅमिली कारची मागणी भारतीय बाजारात सतत वाढत आहे.

Maruti Swift

मारुती स्विफ्ट कार २१,५३८ युनिट्सच्या विक्री सह चौथ्या क्रमांकावर आहे. जुलै २०२५ मध्ये या कारच्या १४,१९० युनिट्सची विक्री झाली होती. यंदा विक्रीत ५१.७८ टक्के वाढ झाली आहे. स्विफ्टचा मार्केट शेअर १०.७२ टक्के आहे. तिच्या स्पोर्टी लुक्स, नवी तंत्रज्ञान आणि दमदार परफॉर्मन्समुळे तरुणात स्विफ्ट तरुणात सर्वाधिक लोकप्रिय पर्यायापैकी एक आहे.

Tata Punch / EV

पाचव्या स्थानावर टाटा मोटर्सची मायक्रो-एसयूवी पंच (पेट्रोल आणि ईव्ही दोन्ही ) ने बाजी मारली आहे. टाटा पंचची जुलै २०२६ ची विक्री २१,३१३ इतकी असून गेल्या वर्षी याच काळात ९७.६२ टक्के अधिक आहे. या लिस्टमध्ये सर्वात जास्त ग्रोथ या कारने नोंदली गेली आहे. १०.६१ टक्के शेअरसह पंचने हे सिद्ध केले की कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये टाटा पंचचा दबदबा आहे.

टॉप-5 कारच्या शिवाय सहाव्या ते दहाव्या स्थानाचे बोलायचे तर गेल्या महिन्यात मारुती फ्रोक्सच्या १९,४७३ युनिट, मारुती बलेनोच्या १८,२४१ युनिट, हुंडई क्रेटा- ईव्ही च्या १८,०८८ युनिट, टाटा नेक्सॉन-ईव्हीच्या १७,४७१ युनिट आणि महिंद्र स्कॉर्पिओ-एनच्या १६,००९ युनिटची विक्री झाली आहे.

Follow Us
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?