AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mercedes Benz : मर्सिडीज बेन्झची G-Wagon इलेक्ट्रिक कार लॉन्च, किंमत प्रचंड पण फिचर्सही तितकेच खास

Mercedes Benz G-Class Electric Launch : प्रसिद्ध पंजाबी सिंगर दिलजीत दोसांझची Mercedes G-Wagon ही फेवरेट कार आहे. या कारच इलेक्ट्रिक अवतार आता भारतात आला आहे. भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो (ऑटो एक्सपो-2025) ची सुरुवात होण्याआधी या कारला लॉन्च करुन मर्सडीज बेंजने आपल्या भविष्यातील प्लानिंगची कल्पना दिली आहे.

Mercedes Benz : मर्सिडीज बेन्झची G-Wagon इलेक्ट्रिक कार लॉन्च, किंमत प्रचंड पण फिचर्सही तितकेच खास
Mercedes G Class ElectricImage Credit source: Mercedes Benz
| Updated on: Jan 10, 2025 | 1:14 PM
Share

पंजाबी सिंगर दिलजीत दोसांझ अलीकडेच त्याच्या ‘दिल-इलुमिनाटी इंडिया टूर’वर होता. त्यावेळी त्याच्या G-Wagon कारची भरपूर चर्चा झालेली. अशीही बातमी होती की, दिलजीतने त्याच्या एका इमोशनल फॅनला मर्सडीजची ही कार गिफ्टमध्ये दिली. आता या कारचा इलेक्ट्रिक अवतार भारतात आला आहे. मर्सडीज-बेंजने आपल्य इलेक्ट्रिक कार्सचा पोर्टफोलियो वाढवताना Mercedes Benz G-Class Electric लॉन्च केली आहे. या कारची अशी काय खासियत आहे? त्या बद्दल जाणून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे दिलजीत दोसांझने आपल्या फॅनला जी-वॅगन दिल्याची जी बातमी व्हायरल झाली, फॅक्ट चेकमध्ये त्यात अजिबात तथ्य आढळलं नाही. आता या कारच्या इलेक्ट्रिक वर्जनमध्ये असं काय खास आहे? ते जाणून घेऊया.

Mercedes Benz G-580 Electric ची किंमत 3 कोटी रुपये आहे. या कारची AMG G-63 facelift वर्जनपेक्षा किंमत 64 लाखाने कमी आहे. ही SUV 587 hp पावर जनरेट करते. याचं मॅक्सिमम टॉर्क 1,164 Nm आहे. ही SUV फक्त 4.7 सेकंदात 0-100 किमी प्रति तास वेग प्राप्त करते. या कारचा टॉप स्पीड 180 kmph आहे. कंपनी ही कार ऑटो एक्सपो-2025 मध्ये शोकेस करणार आहे.

32 मिनटात किती चार्जिंग?

या कारच अधिकृत नाव Mercedes Benz G-580 आहे. सर्वसामान्यांमध्ये ही कार जी-वॅगन नावाने प्रसिद्ध आहे. या कारच्या इलेक्ट्रिक वर्जनमध्ये कंपनीने 116kWh बॅटरी पॅक दिलं आहे. सिंगल चार्जमध्ये ही कार 473 किलोमीटरची रेंज देईल असा कंपनीचा दावा आहे. इतकच नाही फास्ट चार्जरने ही कार 32 मिनिटात 10 ते 80 टक्के चार्ज होईल.

अजून काय सुविधा?

Mercedes Benz G-580 च्या फिचर्समध्ये मर्सिडीज MBUX मल्टीमीडिया सिस्टम देण्यात आाली आहे. ही सिस्टिम 12.3 इंचाच्या टचस्क्रीनसोबत येते. यात तुम्हाला 555 लीटरचा बूट स्पेस मिळतो. या SUV चे पेट्रोल आणि डीजल वर्जन कमी आहेत. या कारमध्ये तुम्हाला एसी वेंट्सपासून हीटिंग कंट्रोल आणि क्रूज कंट्रोल सारखे फिचर्स दिले आहेत.

ऑफ-रोडिंगमध्ये तितकीच सक्षम

जी-वॅगनची खरी ओळख ऑफ-रोडिंग कॅपेबलिटी म्हणजे रस्ता सोडून गाडी चालवण्यात आहे. कंपनीने या कारमध्ये 850mm च वॉटर वेडिंग दिलं आहे. ज्यामुळे उथळ पाण्यात ही कार चालू शकते. यात Mercedes Benz G-580 च पॉपुलर फीचर जी-टर्नही देण्यात आलय. हे फिचर कारला एकाच जागी 360 डिग्रीमध्ये फिरवू शकतं. जी-स्टीयरिंग आणि ऑफ-रोड क्रॉल सारखे फिचर्सही यामध्ये आहेत.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.