
तुम्ही नवीन SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. 2025 च्या अखेरीस लाँच झालेली नवीन ह्युंदाई व्हेन्यू ग्राहकांना पसंत मिळत आहे. आतापर्यंत 80 हजारांहून अधिक लोकांनी या एसयूव्हीची बुकिंग केली आहे. भारतीय बाजारात तिची टक्कर टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा आणि किआ सोनेट या वाहनांशी आहे. चला तर मग या एसयूव्हीविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
ह्युंदाईच्या नुकत्याच लाँच झालेल्या नवीन व्हेन्यूला भारतीय बाजारात जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या जोरदार मागणीमुळे हे सर्व घडत आहे. ह्युंदाई मोटर इंडियाला नव्याने लाँच झालेल्या व्हेन्यूसाठी जवळपास 80,000 बुकिंग प्राप्त झाले आहेत. क्रेटानंतर ह्युंदाईसाठी व्हेन्यू हे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल बनले आहे.
ह्युंदाईच्या म्हणण्यानुसार, नव्याने लाँच झालेल्या व्हेन्यूला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे, ज्यामुळे सुमारे 80,000 युनिट्सची जोरदार बुकिंग झाली आहे. यावरून असे दिसून येते की, कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये या मॉडेलची चांगली पकड आहे. जानेवारी 2026 मध्ये, व्हेन्यूची विक्री 12,000 युनिट्सच्या पुढे गेली. हे आतापर्यंतचे त्याचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे आणि हे स्पष्ट आहे की ग्राहकांना त्याचे नवीन अपडेट्स आवडत आहे. व्हेन्यूचे नवीन मॉडेल 2025 च्या उत्तरार्धात लाँच करण्यात आले. त्याच्या डिझाइन आणि फीचर्समध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले.
नवी ह्युंदाई व्हेन्यू नोव्हेंबरमध्ये 7.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीसह लाँच करण्यात आली होती. हे मॉडेल एकूण आठ व्हेरिएंट आणि आठ रंगांमध्ये उपलब्ध आहे. नवीन एसयूव्ही देखील पूर्वीप्रमाणेच 3 इंजिन पर्यायांसह येते. व्हेन्यूमध्ये नवीन फ्रंट आणि रियर बंपर, नवीन एलईडी हेडलॅम्प्स, डीआरएल, टेल लॅम्प्स, पूर्णपणे नवीन ग्रिल, नवीन 17-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स आणि टेलगेटवर वेन्यू लिहिलेला एलईडी लाइट बार आहे.
सेकंड-जनरेशन व्हेन्यूच्या इंटिरियरमध्ये एक नवीन डॅशबोर्ड मिळतो, ज्यामध्ये दोन 12.3-इंच कर्व्ड स्क्रीन मिळतात. इतर फीचर्समध्ये नवीन सेंटर कन्सोल डिझाइन, लेव्हल-2 एडीएएस, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, इलेक्ट्रिक सनरूफ, नवीन थ्री-स्पोक स्टीयरिंग व्हील, ओटीए अपडेट्स, ड्राइव्ह आणि ट्रॅक्शन मोड, सहा एअरबॅग्स, 360-डिग्री कॅमेरा, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, ब्लूलिंक कनेक्टिव्हिटी आणि वायरलेस ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोचा समावेश आहे. या कारचे एकूण आठ व्हेरिएंट आहेत: HX2, HX4, HX5, HX6, HX6T, HX7, HX8 आणि HX10.