REPUBLIC DAY 2021 : निसानकडून आज तब्बल 720 Magnite कार्सची रेकॉर्डब्रेक डिलीव्हरी

शोरुममध्ये या गाडीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दररोज लोक या गाडीला पाहायला आणि तिचे फिचर्स जाणून घेण्यासाठी शोरुममध्ये गर्दी करत आहे.

REPUBLIC DAY 2021 : निसानकडून आज तब्बल 720 Magnite कार्सची रेकॉर्डब्रेक डिलीव्हरी
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 4:33 PM

मुंबई : भारतात गेल्या काही वर्षांपासून एसयूव्ही आणि कॉम्पॅक्ट एसयूव्हींना चांगलीच पसंती मिळत आहे. त्यामुळे अनेक कार कंपन्या भारतीयांची मागणी आणि पसंती लक्षात घेत गाड्या डिझाईन करुन भारतीय मार्केटमध्ये लाँच करत आहेत. निसान कंपनीने 3 डिसेंबर रोजी Nissan Magnite ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतात लाँच केली होती. ही कार भारतीयांच्या पसंतीस उतरली आहे. लाँचिंगनंतर अवघ्या 15 दिवसात या कारने 15 हजार बुकिंग्सचा टप्पा पार केला होता. त्यानंतर आता अशी माहिती मिळाली आहे की, या कारच्या काही व्हेरियंट्ससाठी इतकी मागणी आहे की, त्या कारसाठी तब्बल 8 महिन्यांचा वेटिंग पीरियड आहे. याचाच अर्थ या कारला भारतीय मार्केटमध्ये मोठी डिमांड आहे. दरम्यान, निसान इंडियाने आज देशाच्या 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त घोषणा केली आहे की, कंपनीने आज मॅग्नाईट एसयूव्हीच्या तब्बल 720 हून अधिक युनिट्सची डिलीव्हरी केली आहे. (Nissan Magnite: Over 720 deliveries across India to celebrate 72nd Republic Day)

निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव म्हणाले की, निसान इंडिया सध्या दर महिन्याला मॅग्नाईटच्या 2 हजार 500 युनिट्सचे उत्पादन करत आहे. हे उत्पादन अजून वाढवलं जाणार आहे. येत्या काळात कंपनी मॅग्नाईट एसयूव्हीच्या 3 हजार 500 ते 4 हजार 500 युनिट्सचे उत्पादन करणार आहे. या कारचा वेटिंग पिरियड खूपच जास्त आहे. तो वेटिंग पिरियड 2-3 महिन्यांपर्यंत कमी करणे हेच आमचे उद्दीष्ट आहे. दरम्यान, शोरुममध्ये या गाडीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दररोज लोक ही गाडी पाहण्यासाठी आणि तिचे फिचर्स जाणून घेण्यासाठी शोरुममध्ये गर्दी करत आहे, अशी माहिती दिल्लीतल्या काही डिलर्सनी दिली आहे. या कारच्या टॉप व्हेरियंटला सर्वाधिक मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.

मॅग्नाईटसाठी 8 महिन्यांचा वेटिंग पीरियड

दरम्यान, लाँचिंगनंतर अवघ्या 15 दिवसात या कारने 15 हजार बुकिंग्सचा टप्पा पार केला होता. त्यानंतर आता आता अशी माहिती मिळाली आहे की, या कारच्या काही व्हेरियंट्ससाठी इतकी मागणी आहे की, त्या कारसाठी तब्बल 8 महिन्यांचा वेटिंग पीरियड आहे. याचाच अर्थ या कारला भारतीय मार्केटमध्ये मोठी डिमांड आहे. शोरुममध्ये या गाडीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दररोज लोक ही गाडी पाहण्यासाठी आणि तिचे फिचर्स जाणून घेण्यासाठी शोरुममध्ये गर्दी करत आहे, अशी माहिती दिल्लीतल्या काही डिलर्सनी दिली आहे. या कारच्या टॉप व्हेरियंटला सर्वाधिक मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. (Nissan Magnite waiting period Stretches to 8 months)

कशी आहे मॅग्नाईट?

कंपनीने ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही चार ट्रिममध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये XE, XL, XV आणि XV प्रिमियमसह एकूण 8 व्हेरिएंटचा समावेश असेल. मॅग्नाइटचे मायलेज 1.0 लीटर पेट्रोल 18.75kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (MT) वर 20kmpl, 1.0 लीटर टर्बो पेट्रोल (CVT) वर 17.7kmpl चे मायलेज देते. भारतात Nissan Magnite ची सुरूवातीची किंमत 4 लाख 99 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. निसान मॅग्नाइट ही एसयूव्ही 11 हजार रुपयांच्या टोकन अमाउंटवर बुक करता येईल.

निसान मॅग्नाईटच्या सर्व (10) व्हेरियंट्सच्या किंमती

1. Magnite XE – 4.99 लाख रुपये 2. Magnite XL – 5.99 लाख रुपये 3. Magnite XV – 6.68 लाख रुपये 4. Magnite XV Premium – 7.55 लाख रुपये 5. Magnite Turbo XL – 6.99 लाख रुपये 6. Magnite Turbo XV – 7.68 लाख रुपये 7. Magnite Turbo XV Premium – 8.45 लाख रुपये 8. Magnite Turbo XL CVT – 7.89 लाख रुपये 9. Magnite Turbo XV CVT – 8.58 लाख रुपये 10. Magnite Turbo XV Premium CVT – 9.35 लाख रुपये

दोन इंजिनांचा पर्याय

Nissan Magnite मध्ये दोन इंजिन ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यापैकी पहिलं नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असेल तर दुसरं टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहे. या SUV चं नॅचुरली एस्पिरेटेड इंजिन 999cc आहे, जे 6,250rpm वर 71 बीएचपी इतकी पॉवर जनरेट करु शकेल आणि 3,500rpm वर 96nm इतकं पीक टॉर्क जनरेट करु शकतं. हे इंजिन मॅन्युअल गियरबॉक्स आणि एएमटी ट्रान्समिशनसह सादर करण्यात आलं आहे. दुसरं इंजिन 1.० लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 5,000 आरपीएम वर 99 बीएचपीची पॉवर आणि 2,800 आरपीएम वर 160 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं.

या एसयूव्हीच्या फिचर्समध्ये 8 इंचांची फ्लोटिंग टच स्क्रिन, 7 इंच टीएफटी मीटर, व्हॉइस रेकग्निशन, पुश बटन स्टार्ट, क्रुज कंट्रोल, 360 डिग्री अराऊंड व्ह्यू मॉनिटर, टायर प्रेशर मॉनिटर, 6 स्पीकर ऑडियो, ऑटोमॅटिक एसी, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल आणि फोल्डेबल ओआरव्हीएमचा समावेश आहे.

Nissan Magnite मधील इतर खास फिचर्स

⦁ Nissan Magnite मध्ये Bi Projector LED हेडलँम्प्स देण्यात आले आहेत.

⦁ LED DRL, LED इंडिकेटर

⦁ 16 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील्स

⦁ व्हाइस रेकग्निशन, ऑटोमॅटिक एसी, क्रूज कंट्रोल, हाइट अडजस्टेबल ड्राइवर सीट, क्रूज कंट्रोल, वायरलेस चार्जर आणि एयर प्यूरिफायर सह जबरदस्त फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहेत.

‘या’ गाड्यांना टक्कर 

Nissan Magnite मार्केटमध्ये मारुती सुझुकी विटारा ब्रेझा (Maruti Suzuki Vitara Brezza), ह्युंदाई वेन्यू (Hyundai Venue), टाटा नेक्सॉन (Tata Nexon), फोर्ड इकोस्पोर्ट (Ford Ecosport), महिंद्रा एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV 300), टोयोटा अर्बन क्रुझर (Toyota Urban Cruiser), होंडा WR-V (Honda WR-V) आणि नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या किया सोनेट (Kia Sonet) या कारशी थेट टक्कर होत आहे.

हेही वाचा

भारतीयांच्या मनात भरलेली Nissan Magnite क्रॅश टेस्टमध्ये पास की नापास?

15 हजार बुकिंग्सनंतर Nissan Magnite चा सर्वात कमी सर्विस कॉस्टचा दावा

(Nissan Magnite: Over 720 deliveries across India to celebrate 72nd Republic Day)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.