AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता कारमधील इंधनाचा खर्च फक्त 25 रुपये, ऑक्टोबरमध्ये भारतात घडणार मोठा चमत्कार, गडकरींनी दाखवले नवे स्वप्न!

गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापराचाही उल्लेख केला. इलेक्ट्रिक कार, बस आणि स्कूटरनंतर आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टरही उपलब्ध झाले आहेत. माझ्या शेतात पाच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर असून ते सुमारे दीड तासांत चार्ज होतात आणि जवळपास आठ तास काम करू शकतात, असा दावा त्यांनी केला.

आता कारमधील इंधनाचा खर्च फक्त 25 रुपये, ऑक्टोबरमध्ये भारतात घडणार मोठा चमत्कार, गडकरींनी दाखवले नवे स्वप्न!
ethanol fuel carImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 27, 2026 | 6:00 PM
Share

Ethanol Fuel Vehicle : भारतात अगोदर फक्त पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी वाहने होती. कार, ट्रक, दुचाकी अशी वाहने फक्त याच इंधनांवर धावायची. आता मात्र भारतात इलेक्ट्रीक स्कुटर, इलेक्ट्रीक कार आलेली आहे. भारताने या क्षेत्रात आणखी प्रगती केली असून आता थेट इथेनॉलवर चालणारी वाहने तयार केली जात आहेत. सध्या पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळले जाते. भविष्यात तर या क्षेत्रात मोठे बदल घडवून आणणारी क्रांती घडण्याची शक्यता आहे. ही क्रांती खरंच घडून आली तर आपल्याला 25 रुपये प्रति लिटर इंधनावर धावणारी कार, दुचाकी पाहायला मिळू शकते. तसे संकेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे 25 रुपये प्रति लिटरप्रमाणे मिळणाऱ्या इंधनावर धावणारी वाहने याच वर्षी बाजारात येण्याची शक्यता असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

पेट्रोलच्या तुलनेत खर्च होणार फक्त…

नितीन गडकरी मध्य प्रदेशात ‘मुख्यमंत्री सुगम परिवहन सेवा’च्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी इथेनॉल इंधनावर धावणाऱ्या वाहनांविषयी मोठं भाकित केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार येत्या ऑक्टोबरपासून टाटा, मारुती सुझुकी, टोयोटा आणि महिंद्रा यांसारख्या कंपन्यांकडून 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्स-फ्युएल कार बाजारात येऊ शकततात. 100 टक्के इथेनॉल वापरणाऱ्या कारचा इंधन खर्च पेट्रोलच्या तुलनेत सुमारे 25 रुपये प्रति लिटर इतका पडू शकतो, अशी माहितीही त्यांनी दिली. विशेष म्हणजे माझ्याकडे टोयोटा कंपनीची इनोव्हा कार असून ती 100 टक्के इथेनॉलवर चालते, असेही त्यांनी सांगितले.

माझ्याकडे हायड्रोजनवर चालणारी कार आहे

गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापराचाही उल्लेख केला. इलेक्ट्रिक कार, बस आणि स्कूटरनंतर आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टरही उपलब्ध झाले आहेत. माझ्या शेतात पाच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर असून ते सुमारे दीड तासांत चार्ज होतात आणि जवळपास आठ तास काम करू शकतात, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे इंधनावरील खर्च कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय हायड्रोजनवर चालणारी कारही माझ्याकडे अहे असे गडकरी यांनी नमूद केले. भविष्यात हायड्रोजनवर चालणाऱ्या बस आणि ट्रक सुरू करण्याच्या दिशेने काम सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

इथेनॉलच्या वापरामुळे शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही फायदा होऊ शकतो. देशाने इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी केल्यास मोठ्या प्रमाणात परकीय चलनाची बचत होऊ शकते, असे मत गडकरींनी व्यक्त केले. तसेच मक्यापासून इथेनॉल निर्मितीसाठी खरेदी सुरू केल्यानंतर मक्याचा दर 1,200 रुपयांवरून 3,600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढल्याचा दावाही त्यांनी केला.

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...