सिंगल चार्जमध्ये 200KM रेंज, किंमत 1 लाखापेक्षा कमी, नवीन इलेक्ट्रिक बाईक बाजारात

सिंगल चार्जमध्ये 200KM रेंज, किंमत 1 लाखापेक्षा कमी, नवीन इलेक्ट्रिक बाईक बाजारात
Oben Rorr भारतात लाँच. कमाल वेग 100किमी/तास
Image Credit source: Obenev.Com

भारतीय इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये (Electric Two Wheeler Segment) ओबेन रोर (Oben Rorr) नावाच्या नवीन मोटरसायकलने दणक्यात एंट्री घेतली आहे. या बाईकची बुकिंग 18 मार्चपासून सुरू होणार आहे.

अक्षय चोरगे

|

Mar 16, 2022 | 11:54 AM

मुंबई : भारतीय इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये (Electric Two Wheeler Segment) ओबेन रोर (Oben Rorr) नावाच्या नवीन मोटरसायकलने दणक्यात एंट्री घेतली आहे. या बाईकची बुकिंग 18 मार्चपासून सुरू होणार आहे. केवळ 999 रुपये भरून या बाईकचं बुकिंग करता येईल. EV स्टार्टअपने ऑफर केलेल्या इलेक्ट्रिक मोटरसायकलची (Electric Bike) किंमत 99,999 रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. बंगळुरू-आधारित EV स्टार्टअपचा दावा आहे की Rorr इलेक्ट्रिक मोटरसायकल सिंगल चार्जवर 200 किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते.

ओबेन रोर मोटरसायकल सुरुवातीच्या टप्प्यात 7 राज्यांमध्ये लाँच करण्यात आली आहे. या मोटरसायकलची टेस्ट ड्राइव्ह लवकरच सुरू होणार आहे. तसेच, बाईकची डिलिव्हरी जुलै 2022 पासून सुरू होऊ शकते. या मोटारसायकलच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर ती खूपच आकर्षक दिसते. या इलेक्ट्रिक मोटरसायकलला सर्व एलईडी हेडलॅम्प मिळतील जे एलईडी डेटाइम रनिंग लाईट्ससह येतील. ही मोटरसायकल ट्रिपल टोन कलरमध्ये येते.

ओबेन ईव्हीचा दावा आहे की ही लेटेस्ट इलेक्ट्रिक मोटरसायकल पूर्णपणे भारतात बनविली गेली आहे आणि त्यात एरोडायनॅमिक डिझाइन आहे. या मोटरसायकलमध्ये ऑल -डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Oben Rorr मध्ये 4.4kWh क्षमतेची बॅटरी

Oben Rorr इलेक्ट्रिक मोटरसायकलला पॉवर देण्यासाठी, 4.4kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 10kW इलेक्ट्रिक मोटर्स देण्यात आल्या आहेत. हे पॉवरट्रेन 62 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करू शकते. कंपनीने या बाईकसह 6 महिन्यांनी नवीन उत्पादन लाँच करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

3 सेकंदात 0-40 किमी/तास स्पीड

ही इलेक्ट्रिक मोटरसायकल 3 सेकंदात 0-40 किमी इतका वेग गाठते. या हायस्पीड इलेक्ट्रिक मोटरसायकलचा टॉप स्पीड 100 किमी प्रतितास इतका असल्याचा दावा करण्यात आला आहे. यात इको, सिटी आणि हॅवॉक असे तीन रायडिंग मोड देण्यात आले आहेत. या मोटरसायकलची बॅटरी अवघ्या 2 तासात पूर्ण चार्ज होते.

ही मोटरसायकल बाजारात रिव्हॉल्ट RV 400 शी स्पर्धा करेल. या बाईकची ड्रायव्हिंग आणि लूक अनेकांना आवडला आहे. या बाईकची किंमत 1.24 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.

इतर बातम्या

जुनी वाहनं 8 पट शुल्क भरुन Re register करा, अन्यथा भंगारात काढण्याशिवाय पर्याय नाही

शानदार लूक, ॲडव्हान्स फीचर्ससह Renault Kwid MY22 लाँच, किंमत…

100 फुट लांब कार, हेलिपॅड, गोल्फ कोर्स आणि स्विमिंग पूलसह अनेक सुविधांनी सुसज्ज, गिनीजमध्ये नोंद

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें