AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिंद्राच्या अपकमिंग इलेक्ट्रिक कारचं लाँचिंग 15 ऑगस्टला

महिंद्राची इलेक्ट्रिक कारचे अधिकृत लाँचिंग 15 ऑगस्टला ब्रिटनमध्ये होणार असून त्यात कंपनीकडून यातील लेटेस्ट फीचर्स आणि टेक्नोलॉजीबद्दलची माहिती देण्यात येणार आहे. यानंतर कंपनी एक्सयुव्ही 400 ची माहिती शेअर करणार आहे. 2027 पूर्वी दरवर्षी 2 ते 3 इलेक्ट्रिक एसयुव्ही कार लाँच करण्याचे धोरण कंपनीकडून आखण्यात आले आहे.

महिंद्राच्या अपकमिंग इलेक्ट्रिक कारचं लाँचिंग 15 ऑगस्टला
EV CarImage Credit source: mahindra
| Updated on: Jul 23, 2022 | 12:14 PM
Share

महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindras) लवकरच आपल्या पाच इलेक्ट्रिक कार्सला (Eelectric car) समोर आणणार आहे. या सर्व कार्स 15 ऑगस्टला लाँच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर दुसरीकडे इलेक्ट्रिक फोर व्हीलरच्या सेगमेंटमध्ये टाटाचा दबदबा कायम असून त्याच्यासमोर टिकून राहण्यासाठी महिंद्रा आणि दुसर्या कंपन्यांचे प्रयत्न सुरु आहेत. महिंद्राने आपली अपकमिंग एसयुव्ही कारचा (SUV car) लूक सर्वांसमोर आणला आहे. याबाबत कंपनीने स्वत: एक टीझरदेखील शेअर केले आहे. महिंद्राची ही अपकमिंग कार पाहून असे दिसतेय, की ही कार कुपे स्टाइलमध्ये ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. तर काही रिपोर्ट्‌सनुसार, ही कार एक प्रकारची क्रोसओव्हर बॉडी टाइप सारखी कार असण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. अपकमिंग कारचा लूक एसयुव्ही 700 सारखा असणार आहे. अद्याप या कारबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरवर्षी 2 ते 3 इलेक्ट्रिक एसयुव्ही

या इलेक्ट्रिक कारचे अधिकृत लाँचिंग 15 ऑगस्टला ब्रिटनमध्ये होणार असून त्यात कंपनीकडून यातील लेटेस्ट फीचर्स आणि टेक्नोलॉजीबद्दलची माहिती देण्यात येणार आहे. यानंतर कंपनी एक्सयुव्ही 400 ची माहिती शेअर करणार आहे. 2027 पूर्वी दरवर्षी 2 ते 3 इलेक्ट्रिक एसयुव्ही कार लाँच करण्याचे धोरण कंपनीकडून आखण्यात आले आहे.

ईव्हीसाठी वेगळ्या कंपनीची चाचपणी

इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी नुकतेच भारतीय वाहन निर्माता कंपनीने ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंटसोबत भागीदारी केली आहे. ब्रिटेनच्या कंपनीने महिंद्राला 1925 कोटींचे इन्व्हेस्टमेंट मिळाली आहे. महिंद्रा इलेक्ट्रिक व्हीकलसाठी नवीन कंपनीचे सेटअप उभारण्याच्या तयारीमध्ये असल्याचे समजते. महिंद्रा आपल्या इलेक्ट्रिक व्हीकलला तयार करणार्या कंपनीमध्ये एकूण 8000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक 2024 पासून 2027 पर्यंत असणार आहे. महिंद्राची नवीन इलेक्ट्रिक कार्सना इग्लंडमधील महिंद्रा ॲडव्हान्स डिझाईन युरोपमध्ये डिझाईन केले जाणार आहे.

भविष्यातील मागणी

पेट्रोल व डिझेलचे दर आवाक्याबाहेर जात आहे. अशात ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना दिसत आहे. ग्राहकांचा कल ओळखून अनेक कार निर्मात्या कंपन्या आता आपली मोठी गुंतवणूक ईव्हीमध्ये करताना दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यातील मागणी पाहून कार निर्मात्या कंपन्यांनी आपले विविध व्हेरिएंट इलेक्ट्रिक कार्समध्ये बाजारात आणले आहेत.

Follow Us
आयोगाने सांगितलं तरी...ठाकरे गटाने केली मोठी चूक? युक्तिवाद...
आयोगाने सांगितलं तरी...ठाकरे गटाने केली मोठी चूक? कौल यांचा टेन्शन वाढवणारा युक्तिवाद!
ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद;
ठाकरे गटाची धाकधूक वाढली? शिंदे गटाच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद; थेट निवडणूक आयोग....
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंच्या वकिलांनी...
शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट! शिंदेंचे वकिल फिरवणार डाव? नेमक्या मुद्यावर युक्तिवाद
1600 हून अधिक शिक्षकांच्या पदांसाठी भरती; सविस्तर जाणून घ्या
Mega Bharti | 1600 हून अधिक शिक्षकांच्या पदांसाठी भरती; सविस्तर जाणून घ्या माहिती
वाशिममध्ये पावसाने दडी मारली; सोयाबीन-तूर सुकू लागली! शेतकऱ्यांवर...
वाशिममध्ये पावसाने दडी मारली; सोयाबीन-तूर सुकू लागली! शेतकऱ्यांवर मोठं संकट, 4-5 दिवसांत पाऊस नाही तर...
हैदराबादचं गॅझेट नाही, बाबासाहेबांचं संविधान चालणार!
Laxman Hake | हैदराबादचं गॅझेट नाही, बाबासाहेबांचं संविधान चालणार! लक्ष्मण हाकेंनी GR जाळून सरकारला सुनावलं
ठाकरेंचे नगरसेवक आमच्या संपर्कात... एकीकडे कोर्टात सुनावणी दुसरीकडे
ठाकरेंचे नगरसेवक आमच्या संपर्कात... एकीकडे कोर्टात सुनावणी दुसरीकडे पुन्हा ठाकरे गटाला खिंडार पडणार? भाजपा नेत्याचा दावा काय?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा निकाल कधी? असीम सरोदे यांचं भाकीत काय?
Asim Sarode | शिवसेना पक्ष-चिन्हाचा निकाल कधी? असीम सरोदे यांचं भाकीत काय?
भुजबळांसह 3 मंत्र्यांचा ओबीसी उपसमितीच्या बैठकीतून बहिष्कार
OBC Reservation | ओबीसी उपसमितीच्या बैठकीत मोठा राडा! भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बैठकीतून बहिष्कार; निधीवरून सरकारला घेरलं
शिवसेना कुणाची? आज शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार; थेट...
शिवसेना कुणाची? आज शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार; थेट...