AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Toyota Hilux आणि Isuzu d Max ला टक्कर देण्यासाठी इलेक्ट्रिक पिकअप ट्रक सज्ज, जाणून घ्या फीचर्स

भारतासह जगभरातील बहुतांश वाहन कंपन्या सध्या इलेक्ट्रिक वाहनांवर काम करत आहेत. जिथे कारपासून बस आणि ट्रकपर्यंत इलेक्ट्रिक वाहने विकसित केली जात आहेत. सध्या भारतात इसुझू डी मॅक्स व्ही क्रॉस (Isuzu d max v cross) हा पिकअप ट्रक उपस्थित आहे, तर टोयोटा हिलक्स (Toyota Hilux) देखील काही दिवसांनी बाजारात उपलब्ध होणार आहे.

Toyota Hilux आणि Isuzu d Max ला टक्कर देण्यासाठी इलेक्ट्रिक पिकअप ट्रक सज्ज, जाणून घ्या फीचर्स
Rivian R1T Electric-truck
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 02, 2022 | 11:09 AM
Share

मुंबई : भारतासह जगभरातील बहुतांश वाहन कंपन्या सध्या इलेक्ट्रिक वाहनांवर काम करत आहेत. जिथे कारपासून बस आणि ट्रकपर्यंत इलेक्ट्रिक वाहने विकसित केली जात आहेत. सध्या भारतात इसुझू डी मॅक्स व्ही क्रॉस (Isuzu d max v cross) हा पिकअप ट्रक उपस्थित आहे, तर टोयोटा हिलक्स (Toyota Hilux) देखील काही दिवसांनी बाजारात उपलब्ध होणार आहे. पण आता यांसारख्या मिनी ट्रकला टक्कर देण्यासाठी इलेक्ट्रिक मिनी ट्रक (Electric mini Truck) येत आहे. यामुळे ट्रक प्रदूषण होणार नाही आणि युजर्सचा पेट्रोल-डिझेलवरील खर्चदेखील कमी होण्यास मदत होईल. रिव्हियान (Rivian) कंपनी मिनी पिकअप इलेक्ट्रिक ट्रक घेऊन येत आहे. या ट्रकचा अधिकृत व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याचे फीचर्स सादर करण्यात आले आहेत.

Rivian चा इलेक्ट्रिक ट्रक R1T हा आकर्षक आहे. कंपनीने त्याचा अधिकृत व्हिडिओ देखील जारी केला आहे, जो त्याची ड्रायव्हिंग क्षमता दर्शवतो. या मिनी ट्रकमध्ये 8 ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहेत, जे युजर्सच्या सोयीसाठी डिझाइन केले गेले आहेत, त्यापैकी चार रस्त्यासाठी आहेत आणि इतर चार ऑफ-रोडिंगसाठी आहेत. रिव्हियानने आपल्या लेटेस्ट व्हिडिओमध्ये या कारचे 8 मोड दाखवले आहेत.

Rivian Mini Electric Truck चे फीचर्स

    • रिव्हियान R1T प्रत्येक मोडला क्वाड मोटर बॅटरी इलेक्ट्रिक पॉवर ट्रेन सपोर्ट मिळतो. जे प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीत उत्तम ड्रायव्हिंग पर्याय देण्याचा प्रयत्न करते.
    • कंपनीने या मिनी ट्रकची माहिती देणारा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ स्पोर्ट्स मोडने सुरू होतो. या मिनी इलेक्ट्रिक ट्रकला 835 hp पॉवर मिळते. याची राइडिंग हाईट 10.5 इंच आहे, ज्यामध्ये एअर सस्पेंशन देण्यात आले आहे. यात इलेक्ट्रोनिक स्टेबिलिटी कंट्रोल्स सिस्टम देण्यात आली आहे.
    • Rivian R1T ऑफ-रोड ड्रिफ्ट मोडमध्ये जातो तेव्हा सस्पेंशन 11 इंचांपर्यंत पोहोचते. याच्या ब्रेक सिस्टिममध्येही थोडा बदल करण्यात आला आहे.
    • ऑफ रोड ऑटो मोडमध्ये कारची उंची 13.5 इंच आहे. याला सॉफ्ट रायडिंग क्वालिटी मिळते. यामध्ये स्टेबेलिटी कंट्रोल्स सिस्टम देण्यात आली आहे, म्हणजेच हा मिनी ट्रक खडबडीत रस्त्यांपासून ते लहान-मोठ्या टेकड्यांवर सहज चालवता येतो.
    • यात एक कंजर्व मोड आहे, जो बॅटरी चार्ज करण्यास देखील मदत करतो. याची सॉफ्ट रायडिंग क्वालिटी 9.9 इंच आहे. यात टो मोड देखील देण्यात आला आहे.

इतर बातम्या

Budget 2022: केंद्र सरकार EV चार्जिंग स्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी मोठी गुंतवणूक करणार!

Maruti Ertiga ला टक्कर देणारी Kia ची नवी कार या महिन्यात लाँच होणार, काय असेल खास?

Kia ते Toyota, पाहा पुढील दोन महिन्यांत भारतात लाँच होणाऱ्या गाड्या

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?