AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Royal Enfield : दिमाखात धावणार इलेक्ट्रिक ‘बुलेट’! चाहत्यांना आतापासूनच गुदगुल्या

Royal Enfield : बुलेट प्रेमींसाठी आनंदवार्ता आहे. रॉयल एनफिल्ड लवकरच इलेक्ट्रिक बुलेट बाजारात उतरविणार आहे. त्यासंबंधीची घोषणा कंपनी लवकरच करेल. या बातमीमुळे इलेक्ट्रिक बाजारात आतापासूनच उत्साह संचारला आहे.

Royal Enfield : दिमाखात धावणार इलेक्ट्रिक 'बुलेट'! चाहत्यांना आतापासूनच गुदगुल्या
| Updated on: Aug 04, 2023 | 4:13 PM
Share

नवी दिल्ली | 04 ऑगस्ट 2023 : बुलेटची (Bullet) धडधड अनेकांची जीव की प्राण असते. एका खास वर्ग बुलेटवर मनापासून प्रेम करतो. बुलेटची ऐटदार सवारी अनेकांना सुखावणारी असते. तर आता ही जानदार, शानदार सवारी आणखी कात टाकणार आहे. काळानुरुप या कंपनीने अनेक बदल केले आहेत. बदलत्या जगाचा पासवर्ड आत्मसात केल्याने कंपनीला मोठा फायदा झाला. सध्या इलेक्ट्रिक मार्केट सर्वांनाच खूणावत आहे. अनेक दुचाकी कंपन्या इलेक्ट्रिक बाजारात दमदारपणे उतरल्या आहेत. त्यात रॉयल एनफिल्ड (Royal Enfield) पण मागे नाही. आयशर मोर्टसने इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये पाऊल ठेवण्याचा इरादा पक्का केला आहे. चाहत्यांना लवकरच इलेक्ट्रिक बुलेटवर (Electric Bullet) रपेट मारता येईल.

रॉयल एनफिल्डचा प्लॅन काय

रॉयल एनफिल्ड मोटारसायकल आयशर मोटर्स तयार करते. गुडगाव येथे कंपनीचे मुख्यालय आहे. कंपनी त्यांची पहिली इलेक्ट्रिक बाईकची तयारी करत आहे. या कंपनीचा बाजारातील हिस्सा जवळपास 90% आहे. भारतातील प्रीमियम मोटरसायकल सेगमेंटवर कंपनीचा वरचष्मा आहे. कब्जाच आहे म्हणा ना.

कामगारांची भरती

इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये अनेक कंपन्या उतरल्या आहेत. स्कूटरच नाही तर बाईक पण या सेगमेंटमध्ये दिसू लागल्या आहेत. बुलेट पण या सेगमेंटमध्ये उतरल्यास मोठा धमाका होईल. आयशर मोटर्सने जून तिमाहीत जबरदस्त निकाल दिले. त्यामुळे टू व्हिलर पोर्टफोलिओत विस्तार करण्याची घोषणा कंपनीने केली आहे. त्यासाठी कुशल मनुष्यबळासोबतच व्यावसायिक कामगारांची भरती करण्यात आली आहे.

दोन वर्षांत बुलेट बाजारात

आयशर मोटर्सचे एमडी आणि सीईओ सिद्धार्थ लाल यांनी ईटीला या प्रकल्पाविषयी माहिती दिली. रॉयल एनफिल्ड येत्या दोन वर्षात पहिली इलेक्ट्रिक बाईक उतरविणार असल्याचे त्यांनी सांगितले. 2025 पर्यंत इलेक्ट्रिक बाईक बाजारात उतरविण्याची तयारी करण्यात आली आहे.

इलेक्ट्रिक बुलेटचा पोळा

इलेक्ट्रिक बुलेट बाजारात उतरविण्याची तयारी जोरात आणि जोमात सुरु आहे. कंपनी 150,000 इलेक्ट्रिक बुलेट बाजारात उतरविण्यासाठी उत्पादन क्षमता वाढविण्यावर जोर देत आहे. वेगवेगळ्या टप्प्यात या बुलेट बाजारात दाखल होतील.

जून तिमाहीत जोरदार कामगिरी

जून तिमाहीत कंपनीने जोरदार कामगिरी बजावली. आयशर मोटर्सने जवळपास 1.6 टक्क्यांची वृद्धी नोंदवली. सिद्धार्थ लाल यांनी जून तिमाही निकाल आतापर्यंतची चांगली कामगिरी असल्याचे स्पष्ट केले.

काय सांगते आकडेवारी

आयशर मोटर्सने आर्थिक वर्ष 2023-24 पहिल्या जून तिमाहीत वार्षिक आधारावर नफा कमावला. 50.4 टक्के वृद्धीसह 918.3 कोटींचा नफा कमावला. तर कंपनीच्या महसूलात मोठी वाढ झाली. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीपेक्षा महसूलात 17.3 टक्के वाढ झाली. महसूल 3,986.4 कोटी रुपयांवर पोहचला.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.