Royal Enfield : गाडी अचानक रस्त्यात बंद पडली, चिंता नको…रॉयल एनफील्डचा ‘हा’ मोठा निर्णय…
रोडसाइड असिस्टेंसअंतर्गत येण्या-जाण्याचा खर्च आणि लेबरचा खर्चदेखील रॉयल एनफील्डच्या माध्यमातूनच करण्यात येणार आहे. युजर्सला केवळ वॉरंटी किंवा कंपनीच्या ॲन्युअल मेंटेनेंस कान्ट्रेक्टमध्ये सहभागी नसलेल्याच पार्ट्सचे पेसे द्यावे लागणार आहेत.

मुंबई : रेट्रो क्लासिक मोटरसायकल सेगमेंटमध्ये रॉयल एनफील्डचा (Royal Enfield) दबदबा आहे. येजदी, जावा आणि होंडा सारखे ब्रँड रॉयल एनफील्डला टक्कर देत स्पर्धा करत असले तरीही रॉयल एनफील्डने ग्राहकांमध्ये आपली क्रेझ कायम ठेवली आहे. त्यासाठी रॉयल एनफील्डकडून नवनवीन निर्णय व सोयीसुविधाही देण्यात येत असतात. नुकतेच कंपनीने डिजिटल रोडसाइड असिस्टेंस (Roadside assistance) सर्विस लाँच केली आहे. ही सर्विस रॉयल एनफील्ड बुलेट, मेटियोर, क्लासिक, इलेक्ट्रा, 650 ट्विन्स, हिमालयन बाइकच्या त्याच युजर्सना मिळेल ज्यांच्याकडे व्हॅलिड आरएसए (RSA) आहे, त्याच युजर्सना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. बाइक खराब झाल्यावर वरील युजर्सनाच मदत मिळणार आहे. या लेखातून जाणून घ्या, रोडसाइड असिस्टेंस सेवेचा लाभ कशा पध्दतीने घेउ शकाल?
RE ॲपपासून मिळणार RSA सुविधा
रस्त्यातच बाईक खराब झाल्याच्या स्थितीमध्ये रॉयल एनफील्ड युजर्स आरई ॲपच्या माध्यमातून रोडसाइड असिस्टेंसची रिक्वेस्ट पाठवू शकणार आहेत. लहान-मोठा बिघाड असल्यावर एक टेक्निशियन घटनास्थळी येउन युजर्सची मदत करणार आहे. जर जास्तच मोठा बिघाड असल्यास बाईकला सर्व्हिस स्टेशनला घेउन जाण्याची सुविधादेखील यात उपलब्ध असणार आहे. रॉयल एनफील्डतर्फे ही डिजिटल आरएसए सर्व्हिस पूर्ण भारतामध्ये उपलब्ध असणार आहे.
संपूर्ण भारतात पोहोचणार मदत
रोडसाइड असिस्टेंसअंतर्गत येण्या-जाण्याचा खर्च आणि लेबरचा खर्चदेखील रॉयल एनफील्डच्या माध्यमातूनच करण्यात येणार आहे. युजर्सला केवळ वॉरंटी किंवा कंपनीच्या ॲन्युअल मेंटेनेंस कान्ट्रेक्टमध्ये सहभागी नसलेल्याच पार्ट्सचे पेसे द्यावे लागणार आहेत. आरएसएअंतर्गत संपूर्ण भारतामध्ये कुठल्याही नॅशनल हायवे, स्टेट हायवे किंवा मोटरेबल रोडवर होत असलेल्या मॅकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा क्रेशसारख्या घटनांमध्ये ही मदत उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
या सर्व्हिसचाही असणार समावेश
जर कुठले युजर्स आपल्या घरी किंवा ऑफिसमध्ये सर्व्हिस मागत असतील तर, प्रति कॉन्ट्रेक्टवर केवळ 2 वेळा आरएसए सर्व्हिसचा फायदा घेतला जाणार आहे. रॉयल एनफील्ड आरएसए फ्लॅट टायर असिस्टेंस, बॅटरी ड्रेन, चुकीचे फ्युअलिंग, फ्यूअल डिलिव्हरी आदी सुविधादेखील यात समाविष्ठ होणार आहेत. दरम्यान, या सुविधांसाठी युजर्सना त्याची किंमतही मोजावी लागणार आहे. दरम्यार, डिजिटल आरएसए सध्या केवळ भारतासाठी उपलब्ध आहे. युजर्स 1000 रुपये वार्षिक देउन हा कॉन्ट्रेक्ट रिन्यू देखील करु शकतील.
