AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skoda Slavia 10 फेब्रुवारीला शोरुम्समध्ये दाखल होणार, कशी असेल नवीन सेडान?

स्कोडा ऑटो इंडियाची (Skoda Auto India) प्रसिद्ध कार स्कोडा स्लाव्हिया (Skoda Slavia) 10 फेब्रुवारी रोजी शोरूममध्ये दाखल होईल, कंपनीचे सेल्स, सर्व्हिस आणि मार्केटिंग डायरेक्टर झॅक हॉलिस (Zac Hollis) यांनी याबाबत खुलासा केला आहे.

Skoda Slavia 10 फेब्रुवारीला शोरुम्समध्ये दाखल होणार, कशी असेल नवीन सेडान?
Skoda Slavia
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 04, 2022 | 4:51 PM
Share

मुंबई : स्कोडा ऑटो इंडियाची (Skoda Auto India) प्रसिद्ध कार स्कोडा स्लाव्हिया (Skoda Slavia) 10 फेब्रुवारी रोजी शोरूममध्ये दाखल होईल, कंपनीचे सेल्स, सर्व्हिस आणि मार्केटिंग डायरेक्टर झॅक हॉलिस (Zac Hollis) यांनी याबाबत खुलासा केला आहे. मात्र, तुम्ही सध्या टेस्ट ड्राइव्ह घेऊ शकणार नाही कारण याच्या प्रेस ड्राइव्ह संपल्यानंतरच या कारच्या टेस्ट ड्राईव्ह सुरु होतील. स्लाव्हियाच्या लाँचिंगबाबतची माहिती आणि किंमत मार्चच्या पहिल्या आठवड्यात उघड होईल. या काळात ग्राहकांना कारची डिलिव्हरीही सुरू होईल. एका ट्विटर युजरने स्लाव्हियाच्या लॉन्च टाइमलाइनबद्दल विचारल्यानंतर जॅक हॉलिस यांनी ही माहिती ट्विट केली आहे. स्कोडाच्या इंडिया 2.0 धोरणांतर्गत नवीन मध्यम आकाराची सेडान हे कंपनीने भारतातील दुसरे उत्पादन आहे. पहिले उत्पादन म्हणजे Kushaq ही मध्यम आकाराची SUV आहे, ज्या कारला भारतीय बाजारात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

वीन स्लाव्हिया हे कंपनीच्या लोकलाइज्ड MQB A0-IN प्लॅटफॉर्मवर आधारित दुसरे मॉडेल आहे. याआधी कंपनीने स्कोडा कुशाक (Skoda Kusahq) कॉम्पॅक्ट SUV कार या प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. स्लाव्हियाचे उत्पादन स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाच्या महाराष्ट्रातील चाकण प्लांटमध्ये केले जाईल आणि कार 95 टक्के लोकलायजेशनसह येईल. स्लाव्हिया भारतीय बाजारपेठेला नजरेसमोर ठेवून विकसित करण्यात आल्याचे स्कोडाचे म्हणणे आहे. स्कोडाने या वर्षी नोव्हेंबरमध्ये स्लाव्हियावरुन पडदा हटवला होता. लॉन्च केल्यावर, ही कार Honda City, Hyundai Verna, Maruti Suzuki Ciaz आणि मिडसाईज सेडान सेगमेंटमधील इतर कारशी स्पर्धा करेल. स्कोडा स्लाव्हियाची किंमत 10 लाख रुपये ते 17 लाख (एक्स-शोरूम) रुपयांच्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे.

कशी आहे Skoda Slavia?

Skoda Slavia ची लांबी 4,541 mm, रुंदी 1,752 mm आणि उंची 1,487 mm आहे. स्कोडा रॅपिडच्या तुलनेत, ऑल-न्यू स्लाव्हिया 128 मिमी लांब, 53 मिमी रुंद आणि 21 मिमी लांब आहे. Skoda आणि Volkswagen ने भारत 2.0 प्रकल्पाचा भाग म्हणून एक अब्ज युरोपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे आणि परिणामी, कंपनी भारतात नवनव्या कार्सचा धडाका सुरु करणार आहे. VW देखील 2022 मध्ये व्हेंटोच्या जागी Vertus-आधारित सेडान सादर करेल.

दमदार इंजिन

Skoda Slavia मध्ये दोन प्रकारचे इंजिन पर्याय दिले जाऊ शकतात. ही कार 1.0 लीटर TSI पेट्रोल इंजिनसह सुसज्ज असेल जे मॅक्सिमम 114 एचपी पॉवर आणि 178 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडले जाईल. दुसरे इंजिन 1.5 लीटर TSI पेट्रोल इंजिन असेल, जे 148 hp पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. तसेच, यात 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड डीएसपी ट्रान्समिशन मिळेल.

Skoda Slavia चे फीचर्स

Skoda च्या आगामी कारमध्ये Apple CarPlay आणि Android Auto कंपॅटिबिलिटी, वायरलेस चार्जिंग पॅड, 6 एअरबॅग्ज, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, पॉवर सीट्स, माउंटेड कंट्रोल्ससह मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, आणि मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाईल, असा दावा करण्यात आला आहे.

इतर बातम्या

तुमच्या मनात कारचं स्वप्न असेल तर तुमची गाडी तुम्हाला म्हणतेय ‘गाडी बुला रही है…’; किंमत फक्त…

ऑटो इंडस्ट्रीत कहीं खुशी कहीं गम, जानेवारी 2022 मधील विक्रीचे आकडे जाहीर, Mahindra, Tata ची शानदार सुरुवात

लोकप्रिय Tata Nexon आता CNG सह येणार, Maruti Brezza चं सीएनजी व्हेरिएंटदेखील सज्ज

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?