AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दमदार परफॉर्मन्स, मॉडर्न डिजिटल फीचर्स, किंमत अन् बरंच काही; बहुप्रतिक्षित ‘सिएरा.इव्ही’ भारतात लाँच

बहुप्रतिक्षित 'सिएरा.इव्ही' भारतात लाँच झाली आहे. या कारचे डिजिटल फिचर्स भन्नाट आहेत. या कारविषयी जाणून घ्या सविस्तर माहिती

दमदार परफॉर्मन्स, मॉडर्न डिजिटल फीचर्स, किंमत अन् बरंच काही; बहुप्रतिक्षित 'सिएरा.इव्ही' भारतात लाँच
| Updated on: Jul 05, 2026 | 6:44 PM
Share

टाटा.इव्ही या कंपनीने ऑल-न्‍यू सिएरा.इव्ही लाँच केलीये. कंपनीने जुन्या लोकप्रिय कारला नव्या बोल्ड आणि इलेक्ट्रिक रूपात सादर केलंय. खरंतर कंपनीने लोकप्रिय कारचा इतिहास पुन्हा नव्याने लिहिलाय. ही नवीन सिएरा.इव्ही तिच्या जुन्या आणि प्रसिद्ध डिझाईनला नेक्‍स्‍ट-जनरेशन ईव्ही तंत्रज्ञानाशी जोडतेय. ग्राहकांना डिजिटल अनुभव आणि आधुनिक वैशिष्‍ट्यांसह दमदार एसयूव्हीचा अनुभव मिळेल.

सिएरा.इव्ही रस्त्यांवर बादशाहत सिद्ध करण्यासाठी सज्ज झालीये. या कारची 665 किमीची एमआयडीसी रेंज आणि 510-530 किमीची वास्तविक रेंज आहे. तर इव्हीसोबत लाइफटाइम एचव्ही बॅटरी वॉरंटी मिळते. कारचे एक्सप्रेस चार्जिंग तंत्रज्ञान अवघ्या 15 मिनिटांमध्ये 263 किमीपर्यंतचा प्रवास सुलभ करते. तर कारमध्ये 504 एनएम टॉर्क आणि 306 पीएसच्या दमदार पॉवर आहे. त्यामुले ही कार अवघ्या 5.8 सेकंदांत 0 ते 100 किमी/तास असा वेग पकडू शकते.

कारमध्ये ‘गो एनीव्हेअर, डू एनीथिंग’चा अनुभव देखील मिळणार आहे. त्यासाठी ड्युअल-मोटर क्यूडब्ल्यूडी आणि अल्ट्रा ग्लाइड सस्पेंशनसह फ्रिक्वेन्सी डिपेंडंट डॅम्पिंग देण्यात आलंय. गाडीच्या केबिनमध्ये लक्झरी लाइफस्पेसचा फीलसाठी सेगमेंटमधील सर्वात मोठे ‘पॅनोरामॅक्स सनरूफ’, थिएटर प्रो अनुभवासह ट्रिपल स्क्रीन्स, डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि सोनिकशाफ्ट सिस्टीम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित आणि सोपे करण्यासाठी हायपएआर एचयूडी, 5400 एचडी कॅमेरासह 4 साईट ब्लाइंड स्पॉट व्ह्यू देण्यात आले आहेत. तसेच विनासायास प्रवेशासाठी डिजि अ‍ॅक्सेस आणि ऑटो पार्क, समन व रिव्हर्स असिस्ट फीचर्स असलेला ‘ई-वालेट सूट’ यांसारखे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देखील समाविष्ट करण्यात आला आहे.

रोजच्या वापरासाठी सोयीस्कर कार शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही कार खास आहे. खरंतर एैसपैस जागा, उत्कृष्ट क्षमता मिळते. सिएरा.इव्हीच्या माध्यमातून टाटा.इव्हीने आधुनिक एसयूव्हीसाठी एक नवा मापदंड निर्माण केलाय. त्याचबरोबर ही एसयूव्‍ही गतीशील, क्षमतापूर्ण आणि अद्वितीयरित्‍या आयकॉनिक आहे. या कारचे बुकिंग 1 जुलैपासून सुरू झालंय. या कारची 15 जुलै 2026 पासून डिलिव्‍हरी मिळण्यास सुरुवात होईल, अशी माहिती मिळतेय. सिएरा.इव्हीची सुरुवातीची किंमत १८.७९ लाख रुपये आहे, असं सांगण्यात आलं आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ