AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata Sunroof : टाटाची कमाल, बाजारात आणली स्वस्त सनरुफ कार!

Tata Sunroof : टाटा मोटर्स बाजारात नवनवीन प्रयोग करते. आता टाटाने पुन्हा कमाल केली आहे. बाजारात सर्वात स्वस्त सनरुफ कार आणल्याचा दावा केला आहे. या कारची किंमती तरी काय आहे..

Tata Sunroof : टाटाची कमाल, बाजारात आणली स्वस्त सनरुफ कार!
| Updated on: Jun 01, 2023 | 5:00 PM
Share

नवी दिल्ली : सध्या फ्युचरिस्टिकच नाही तर फिचरची रेलचेल असणाऱ्या कारचा जमाना आहे. विविध फिचर असलेल्या कारकडे ग्राहकांचा ओढा आहे. त्यातच सनरुफ कारची (Sunroof Car) तर बच्चेकंपनीपासून सर्वांनाच क्रेझ आहे. हेच हेरुन अनेक कंपन्यांनी सनरुफ कार बाजारात उतरविल्या. सर्वात स्वस्त सनरुफ कार बाजारात येत आहेत. टाटा मोटर्स सातत्याने नवनवीन प्रयोग करते. आता टाटाने पुन्हा कमाल केली आहे. ही कंपनी बाजारात स्वस्त सनरुफ कार घेऊन आली आहे. Tata Altroz च्या CNG Variant ला कंपनीने नुकतेच बाजारात उतरवले आहे. सध्या बाजारात अल्ट्रोजच्या सनरुफ कारच्या किंमतीची जोरदार चर्चा आहे. ही कार किफायतशीर असल्याचा दावा करण्यात येत आहे. नेमकी किंमत आणि फिचर आहेत तरी काय?

13 नवीन व्हेरिंएट्स अल्ट्रोज कार आता पेट्रोल आणि डिझेल इंजिनासह एकूण 13 नवीन व्हेरिंएट्समध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. टाटा मोटर्सने Altroz मध्ये मिड-स्पेक XM+ट्रिम सनरुफचा समावेश केला आहे. ही पेट्रोल, टर्बो-पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पॉवरट्रेनसह एकूण 16 व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. पठडीतील, नेहमीच्या अल्ट्रोजपेक्षा सनरुफ सुविधा असणारी कार जवळपास 45,000 रुपयांनी महाग आहे. अल्ट्रोजच्या डार्क एडिशनमध्ये पण सनरुफ मिळते.

Tata Altroz

किंमत किती सनरुफ सह अल्ट्रोजच्या व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 7.90 लाख रुपयांनी सुरु होते. ही एक्स शोरुम किंमत आहे. या कारच्या इंजिनमध्ये कुठल्याही प्रकारचा बदलाव करण्यात आला नाही. ही कार पूर्वीसारखीच 86hp च्या 1.2 लिटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, 110 हॉर्स पॉवरच्या 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 90 हॉर्स पॉवरच्या 1.5 लिटर डिझेल इंजिनसह येते. हे इंजिन स्टँडर्ड-5 स्पीड मॅन्युअल ट्रासमिशन गिअरबॉक्सला जोडण्यात आले आहे. या कारमध्ये 1.2 लिटर नॅचरल एस्पिरेटेडमध्ये 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो.

फिचर्सचा डंका

  1. हुंदाई आय20 च्या टॉप व्हेरिएंट्स एस्टा आणि एस्टा(ऑपशनल) ट्रिममध्ये सनरुफ फिचर
  2. या कारची किंमत 9.03 लाख रुपयांनी सुरु होते
  3. त्यामुळे अल्ट्रोज या सेगमेंटमध्ये फिचरसह भाव खाऊन जाते
  4. ती किफायतशीर किंमतीत असल्याचा दावा करण्यात येत आहे
  5. या कारमध्ये वायरलेस चार्जर, एक एअर प्युरिफायर आणि लेटरेट अपहोल्स्ट्री असे फिचर्स
  6. तसेच इतर पण अनेक फिचरचा समावेश
  7. या कारला 5 स्टार सेफ्टी रेटिंग
  8. 7 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम
  9. एम्बिएंट लायटिंग आणि क्रुझ कंट्रोची सुविधा
  10. अल्ट्रोज देशातील सर्वात सुरक्षित हॅचबॅक कारमधील एक

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.