इलेक्ट्रिक वाहनं चार्ज करणं सोपं होणार, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरसाठी Tata ची ‘या’ कंपनीसोबत भागीदारी

टाटा पॉवरने (Tata Power) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) कंपनीबरोबर पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन सुरू करण्याच्या करारावर स्वाक्षरी केल्याची घोषणा केली आहे.

इलेक्ट्रिक वाहनं चार्ज करणं सोपं होणार, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरसाठी Tata ची 'या' कंपनीसोबत भागीदारी
Tata Power Charging Stations
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 3:57 PM

मुंबई : टाटा पॉवरने (Tata Power) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) कंपनीबरोबर पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन सुरू करण्याच्या करारावर स्वाक्षरी केल्याची घोषणा केली आहे. कराराअंतर्गत टाटा पॉवर देशातील अनेक शहरे व प्रमुख महामार्गांवरील एचपीसीएलच्या पंपांवर ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर स्थापित करणार आहे. (Tata Power made Partnership With HPCL To Set Up EV Charging Stations At their Petrol Pumps)

कंपनीचे म्हणणे आहे की, इलेक्ट्रिक वाहन मालकांसाठी अधिकाधिक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची उभारणी केल्यास ते शहरांमध्ये आणि इंटरसिटीमध्ये अखंडपणे प्रवास करू शकतील. टाटा पॉवर इझी चार्ज मोबाइल अनुप्रयोगाद्वारे (अॅप्लिकेशन) ग्राहक चार्जरचा वापर करू शकतील.

टाटा पॉवरचे म्हणणे आहे की, नवीन भागीदारी ईव्ही मालकांना विविध पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी मजबूत भूमिका बजावेल. याव्यतिरिक्त, ही भारत सरकारच्या राष्ट्रीय इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन स्कीमच्या (एनईएमएमपी) अनुषंगाने आहे. इलेक्ट्रिक वाहनं चार्जिंग पॉईंट्सपर्यंत सहजपणे पोहोचतील याची काळजी घेतली जाईल. लेटेस्ट टेक्निकल प्लॅटफॉर्म वापरुन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करणे हे कंपनीचे ध्येय आहे.

कंपनीचे असे म्हणणे आहे की, चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चरसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा विकास व उपलब्धता ही भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढीसाठी महत्वपूर्ण बाब आहे. टाटा पॉवरकडे सध्या 100+ शहरांमध्ये 500 पेक्षा जास्त सार्वजनिक चार्जिंग पॉईंट्सचं विस्तृत नेटवर्क आहे ज्यामध्ये पेट्रोल पंप, मेट्रो स्टेशन, शॉपिंग मॉल्स, थिएटर आणि महामार्ग व्यापलेले आहेत. ईव्ही इको-सिस्टमच्या सर्व विभागांमध्ये कंपनी उपस्थित आहे, ज्यात पब्लिक चार्जिंग, कॅप्टिव्ह चार्जिंग, होम, वर्क प्लेस चार्जिंग आणि बसेससाठी अल्ट्रा-रॅपिड चार्जर्सचा समावेश आहे.

राष्ट्रीय महामार्गावर चार्जिंग स्टेशन सुरू करण्याची एनएचएआयची योजना

इलेक्ट्रिक वाहनांच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी नॅशनल अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) येत्या काही दिवसांत इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा विचार करीत आहे. ही योजना देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर रियल इस्टेट विकासाचा भाग आहे. अहवालानुसार महामार्गाची पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी एनएचएआयने 22 राज्यात 650 मालमत्तांची ओळख करुन दिली आहे.

एनएचएआय पुढील पाच वर्षांत खासगी क्षेत्राच्या सहकार्याने विकास कार्यक्रमांची सुरूवात करेल. यात आगामी दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गालगत 94 जागा, नवीन महामार्ग व निर्माणाधीन द्रुतगती महामार्गालगत 376 आणि देशभरातील महामार्गाच्या विद्यमान नेटवर्कच्या जवळपास 180 स्थळांची ओळख पटविण्यात आली आहे. एनएचएआयने यापूर्वीच निवडलेल्या 650 साइटपैकी 138 साइटसाठी निविदा मागविल्या आहेत. या विकास प्रकल्पात मदत करण्यासाठी खासगी संस्थांकडून यापूर्वीच अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

इतर बातम्या

31 ऑगस्टपर्यंत स्वस्त बाईक खरेदी करण्याची संधी, केटीएम 250 अ‍ॅडव्हेंचरच्या किंमतीत 25000 रुपये कपात

फक्त 25 हजार रुपयांमध्ये घरी आणा हिरोची ही आलिशान स्कूटर, 65 किमीच्या मायलेजसह मिळवा ही जबरदस्त ऑफर

OLA इलेक्ट्रिक स्कूटरचा लाँचिंगआधीच बाजारात धुमाकूळ, 24 तासात 1 लाख बुकिंग्सचा टप्पा पार

(Tata Power made Partnership With HPCL To Set Up EV Charging Stations At their Petrol Pumps)

Non Stop LIVE Update
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.