टाटाच्या नव्या कारची देशात हवा, Tata Sierra चे फीचर्स वाचून थक्क व्हाल; किंमत फक्त…
Tata Sierra Price: Tata Sierra ही एसयूव्ही 25 नोव्हेंबर 2025 रोजी लाँच होणार आहे. त्यापूर्वीच कंपनीने या कारमधील फीचर्सची माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारतातील आघाडीची कार कंपनी टाटाने आपल्या Tata Sierra ची सविस्तर माहिती जाहीर केली आहे. ही एसयूव्ही 25 नोव्हेंबर 2025 रोजी लाँच होणार आहे. कंपनीने याबाबतची माहिती देताना सांगितले की ही एसयूव्ही पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक अशा अनेक पॉवरट्रेन पर्यायांमध्ये बाजारात दाखल होणार आहे. पेट्रोल व्हेरियंटमध्ये 1.5 लिटर नॅचरली एस्पिरेटेड आणि 1.5 लिटर TGDi इंजिन मिळणार आहे. डिझेल मॉडेलमध्ये Curvv कडून घेतलेले 1.5 लिटर इंजिन असेल. सिएरा EV मध्ये 55kWh आणि 65kWh बॅटरी पॅकसह मिळणार आहे. या एसयुव्हीचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.
टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळणार
टाटाच्या या एसयुव्हीमध्ये ट्रिपल-स्क्रीन सेटअप मिळणार आहे, यात टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि पॅसेंजर-साइड टचस्क्रीनचा समावेश आहे. ही स्क्रीन 12.3 इंच लांबीचे असेल. टाटा सिएरामध्ये ड्युअल-टोन केबिन थीम आहे, यात सेंट्रलला टाटा लोगो असलेली 4 स्पोक स्टीअरिंग व्हील देण्यात आले आहे.
काय आहेत फीचर्स
टाटाने सिएरामध्ये ऑटो-डिमिंग IRVM, 360 डिग्री कॅमेरा, पॅनोरॅमिक सनरूफ, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स, वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, वायरलेस फोन चार्जर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग आणि इतरही अनेक खास फीचर्स मिळतात. या एसयुव्हीमध्ये 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबेलिटी कंट्रोल, EBD सह ABS, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि लेव्हल 2 ADAS देखील मिळते.
डिझाइन कशी आहे?
टाटा सिएरा अधिक आधुनिक आणि मजबूत आहे. यात नवीन फ्रंट ग्रिल, स्लिमर आणि स्प्लिट हेडलॅम्प सेटअप, स्मॉल फ्रंट आणि रियर ओव्हरहॅंग्स, स्क्वेअर व्हील आर्च, 19-इंच अलॉय व्हील्स, रूफलाइन मिळते. यामुळे एसयुव्हीचा लूक खूप खास मिळतो.
किंमत किती?
टाटा सिएरा हुंडई क्रेटा, किया सेल्टोस, स्कोडा कुशाक, फोक्सवॅगन तैगुन, होंडा एलिव्हेट, मारुती ग्रँड विटारा आणि व्हिक्टोरिस आणि टोयोटा हाय रायडर या एसयुव्हीसोबत स्पर्धा करणार आहे. या एसयुव्हीची एंट्री-लेव्हल पेट्रोल व्हर्जनची किंमत 11 लाख रूपये असण्याची शक्यता आहे. टॉप-एंड आयसीई ट्रिमची किंमत सुमारे 20 लाख रूपये असू शकते. तसेच टाटा सिएरा ईव्हीची किंमत 20 लाख ते 25 लाख रूपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.
