AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tata ची मायक्रो एसयूव्ही HBX लाँचिंगसाठी सज्ज, कंपनीकडून अधिकृत टीझर रिलीज

टाटा मोटर्सने चालू आर्थिक वर्षात दोन नवीन वाहने बाजारात आणण्याची योजना आखली आहे आणि यात बहुप्रतिक्षित हॉर्नबिलचा (Hornbill) समावेश आहे, जी नियमित हॅचबॅकपेक्षा थोडी मोठी म्हणजेच मायक्रो एसयूव्ही असेल.

Tata ची मायक्रो एसयूव्ही HBX लाँचिंगसाठी सज्ज, कंपनीकडून अधिकृत टीझर रिलीज
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 22, 2021 | 6:01 PM
Share

मुंबई : जुलै महिन्यात टाटा मोटर्सने भारतीय बाजारात दोन अंकी हिस्सेदारी मिळवली आहे. भारतीय कार निर्मात्या कंपनीने नऊ वर्षांच्या कालावधीनंतर ही कामगिरी केली आहे. टाटा मोटर्सची गती कायम ठेवण्याची योजना आहे आणि त्यासाठी अनेक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. मागणीतील वाढीचा फायदा घेण्यासाठी कंपनी आपलं विक्री नेटवर्क वाढवण्याची तसेच नवीन वाहने सादर करण्याची योजना आखत आहे. (Tata will launch micro SUV HBX soon, official teaser release, know details)

एका अहवालानुसार, टाटा मोटर्सने चालू आर्थिक वर्षात दोन नवीन वाहने बाजारात आणण्याची योजना आखली आहे आणि यात बहुप्रतिक्षित हॉर्नबिलचा (Hornbill) समावेश आहे, जी नियमित हॅचबॅकपेक्षा थोडी मोठी म्हणजेच मायक्रो एसयूव्ही असेल. कोडनेम HBX सह टाटा हॉर्नबिल (Tata Hornbill) पहिल्यांदा 2019 जिनेव्हा मोटर शो दरम्यान पाहायला मिळाली होती.

या कारची सर्वात खास गोष्ट म्हणजे या कारची किंमत. ही कार अवघ्या 5 लाख ते 7.5 लाख रुपयांच्या किंमतीत भारतीय मार्केटमध्ये लाँच केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. या कारचे काही फीचर्स हे टाटाच्याच नेक्सॉनप्रमाणे असतील. परंतु या कारचा प्रिमियम लुक ग्राहकांना स्वतःकडे आकर्षित करेल, यात शंका नाही.

टीझर रिलीज

कंपनीने नुकताच या कारबद्दल टीझर जारी केला आहे. या शॉर्ट व्हिडीओ टीझरमध्ये HBX चे हेडलाइट्स पाहायला मिळाले आहेत. तसेच सफारीसारख्या लेटेस्ट टाटा मॉडेल्सवर दिसणाऱ्या LEDs चा संच असल्याचे दिसते. भारतीय रस्त्यांवर HBX टेस्टिंगच्या स्पाय शॉट्सनुसार, रफ लुकसाठी व्हील आर्च आणि साइड्सवर ब्लॅक क्लॅडिंग मिळण्याची शक्यता आहे.

कधी होणार लाँच

कंपनीने म्हटलं आहे की, जी कार लाँच होणार आहे त्या कारचं 90 टक्के डिझाईन हे एक्सपोमध्ये दाखवण्यात आलेल्या कारप्रमाणेच असेल. टाटा HBX केवळ एका कॉन्सेप्टचं नाव आहे, परंतु ही गाडी टाटा हॉर्नबिल या नावाने सादर केली जाऊ शकते. Tata HBX तिचे प्रतिस्पर्धी Mahindra KUV100 आणि Maruti Suzuki Ignis ला टक्कर देणार आहे.

जबरदस्त इंजिन

एचबीएक्स ही कार 1.2-लीटर पेट्रोल इंजिनद्वारे धावेल, हे इंजिन टाटाच्या अल्ट्रॉझ या कारमध्ये देण्यात आलं आहे. हे इंजिन 6000rpm वर 84bhp पॉवर तर 3300rpm वर 113Nm टॉर्क जनरेट करु शकेल. ही गाडी 5 स्पीड मॅनुअल आणि एएमटीसह सादर केली जाऊ शकते. Tata HBX ही कार लोकप्रिय ठरली तर Tata या कारसह Altroz चं टर्बो पेट्रोल इंजिनही लाँच करु शकते.

इतर बातम्या

मारुती स्विफ्ट आणि डिझायरच्या सीएनजी मॉडेल्सची ही आहेत खास वैशिष्ट्ये; लॉन्चपूर्वीच झाला हा मोठा खुलासा

7-सीटर जीप कमांडर दहा दिवसात भारतीय बाजारात, जाणून घ्या SUV मध्ये काय असेल खास?

‘ही’ आहे भारताची पहिली इलेक्ट्रीक सुपरकार; फिचर्स, लूक पाहून तुम्हीही थक्क व्हाल

(Tata will launch micro SUV HBX soon, official teaser release, know details)

Follow Us
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर मुख्यंमत्र्यासोबतच्या विमान प्रवासाबाबत दिली मोठी अपडेट
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
Omraje Nimbalkar | इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा डाव; पदाधिकाऱ्यांना...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून... उद्धव ठाकरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....