Tesla : टेस्ला कारची लवकरच भारतात एण्ट्री होणार, काय म्हटले इलोन मस्क

भारतात टेस्ला कारचे उत्पादन करण्याची सरकारची मागणी टेस्ला कंपनीचे सीईओ यांच्या गळी उतरविण्यात भारताला यश आले आहे. त्यामुळे लवकरच भारतीय रस्त्यावर टेस्ला धावताना दिसणार आहेत.

Tesla : टेस्ला कारची लवकरच भारतात एण्ट्री होणार, काय म्हटले इलोन मस्क
Tesla_Model_X_Elon_MuskImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 5:14 PM

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध इलेक्ट्रीक कार टेस्लाची भारतीय बाजारपेठेत लवकरच प्रवेश होण्याची शक्यता आहे. एका मुलाखतीत टेस्ला कंपनीचे प्रमुख इलोन मस्क यांनी या कारच्या भारतीय बाजारपेठेतील प्रवेशाबाबत महत्वाची माहीती दिली आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत आंतरराष्ट्रीय दर्जाची इलेक्ट्रीक कार लवकरच पाहायला मिळणार आहे. मिडीया आलेल्या बातम्यानूसार अमेरिकन इलेक्ट्रीक कार बनविणारी कंपनी टेस्ला लवकरच भारतीय बाजारपेठेत प्रवेश करू इच्छीत आहे. टेस्ला कंपनीचे सीईओ इलोन मस्क यांनी याबाबत माहीती दिली आहे. इलोन मस्क याबाबत काय म्हणाले ते पाहूया..

भारतात आले होते अधिकारी

अलिकडेच टेस्लाच्या काही अधिकाऱ्यांनी भारतीय बाजारपेठेतील टेस्लाच्या मागणीचा आढावा आणि अभ्यास करण्यासाठी धावता दौरा केला होता. या दौऱ्यात टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी भारतातील सरकारी अधिकाऱ्यांनी भेटही घेतली होती. बातमीनूसार अधिकाऱ्यांनी भारतात मॅन्युफॅक्चरींग प्लांट आणि आर अॅण्ड डी युनिट लावण्याचे मान्य केले होते.

भारताचा हा होता प्रस्ताव

भारतात टेस्ला कंपनीला त्यांच्या कार विक्री करण्यापूर्वी एक प्रस्ताव ठेवण्यात आला होता. जर कंपनीला तिची वाहने भारतात विकायची असतील तर तिने आपला मॅन्यूफॅक्चरींग प्लांटची उभारणी भारतात करायला हवी असे बंधन टाकण्यात आले आहे.

मस्क यांनी काय म्हटलं

मिडीयात आलेल्या वृत्तानूसार भारतीय बाजारात टेस्ला लवकरच प्रवेश करू शकते. टेस्ला कंपनीचे सीईओ इलोन मस्क यांनी एका मुलाखतीत सांगितले की भारतीय बाजारपेठेत टेस्ला कार लवकरच येऊ शकते. मुलाखतीत मस्क यांना विचारले की टेस्ला भारतात नविन फॅक्ट्री लावण्यास इच्छुक आहे का ? यावर त्यांनी या मुलाखतीत होकारार्थी उत्तर दिले आहे.

भारतातील टेस्ला कारची किंमत किती ?

टेस्ला कंपनीकडे भारतीय बाजारपेठेत टेस्ला मॉडेल एस आणि मॉडेल 3 चा एंट्री मॉडेल म्हणून समावेश करु शकतात. ज्या मॉडेलची अंदाजे किंमत 70 लाख रुपयांपर्यंत आहे. हे मॉडेल ऑडी आणि बीएमडब्ल्यूच्या सेडानशी स्पर्धा करू शकतील अशी अपेक्षा आहे. गेल्यावर्षी, भारतात कार आयात करण्यासाठी त्यावरील कर कमी करण्याचा प्रस्ताव सरकारने कंपनी समोर ठेवला होता. टेस्ला कंपनीने सीबीयू मार्गाने भारतात कार आणण्यासाठी ड्युटीवर 40 टक्के सूट मागितली होती. मात्र त्यास भारताने नकार दिला होता. आता टेस्ला कंपनी भारतातच कारचे उत्पादन करण्याच्या नवीन प्रस्तावासह बाजारात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.