वाहन उद्योगाची भरारी, अक्षय तृतीया पावली, दुचाकीसह ई-वाहनांनी रेकॉर्ड मोडले

Akshaya Tritiya Two Wheeler : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला वाहन उद्योगाची मोठी भरारी दिसून आली. वाहन उद्योगाला मोठी उभारी आल्याचे दिसून आले. ई-बाईकच्या विक्रीतही मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. काय आहे अपडेट?

वाहन उद्योगाची भरारी, अक्षय तृतीया पावली, दुचाकीसह ई-वाहनांनी रेकॉर्ड मोडले
वाहन बाजार बहरला
Image Credit source: गुगल
| Updated on: Apr 30, 2025 | 10:29 AM

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला वाहन उद्योगाची मोठी भरारी दिसून आली. वाहन उद्योगाला मोठी उभारी आल्याचे दिसून आले. ई-बाईकच्या विक्रीतही मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. मुंबईत आज अक्षय्य तृतीयाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या साप्ताहिक काळात कारच्या नोंदणीत ५% वाढ झाली असून दुचाकी नोंदणीत तब्बल ६१% वाढ झाली आहे, अशी माहिती परिवहन विभागाच्या आकडेवारीतून समोर आली आहे.

आरटीओममध्ये वाहनांची मोठी नोंद

ताडदेव RTO मध्ये सर्वाधिक ४०३ कार नोंदवण्यात आल्या, तर बोरीवली RTO मध्ये सर्वाधिक १,५३६ दुचाकी नोंदवण्यात आल्या. मुंबईत गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा आणि दिवाळी या चार दिवसांदरम्यान वाहन खरेदीचे प्रमाण सर्वाधिक असते. इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत, ७३ नवीन ई-वाहने बुक करण्यात आली, तर गेल्या आठवड्यात चार RTO कार्यालयांत एकूण ८६७ CNG वाहनांची नोंदणी झाली.
वडाळा RTO मध्ये सर्वाधिक २३४ CNG वाहनांची नोंद झाली, तर ताडदेव RTO मध्ये सर्वाधिक ई-कार आणि ई-बाईक नोंदवण्यात आल्या.

वाहन घनता वाढली

वाहनांची झपाट्याने वाढती संख्या, विशेषतः दुचाकींची, शहरी वाहतुकीसाठी मोठं आव्हान ठरत आहे. मुंबईतील वाहन घनतेचा दर सध्या प्रति किलोमीटर २,५०० असून, तो पुढील काही वर्षांत ३,००० वर जाऊ शकतो. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करून खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

अक्षय तृतीयेला ऑफर्सचा पाऊस

अक्षय तृतीयेला ऑफर्सचा पाऊस पडला आहे. कपडे, ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक सामान, मॉल, वाहन बाजारात अक्षय तृतीयेला बाजारात अनेक ऑफर्स दिसत आहे. ग्राहक अक्षय तृतीयेला खरेदी शुभ मानत असल्याने त्यांना आकर्षीत करण्यासाठी अनेक ऑफर्सचा भडिमार करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांचा फायदा तर होतच आहे, पण दुकानदारांची सु्द्धा विक्री होत आहे. आज अजून मोठी विक्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात कोट्यवधींची विक्री होण्याची आशा दुकानदारांना आहे. महागाईचा आलेख कमी झाल्याचा फायदा होईल, असे दुकानदारांना वाटते.