AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या एसयुव्हीचा लुक पाहून विसरून जाल क्रेटा आणि सेलटाॅस, जबरदस्त ऑफरोडींग फिचर्स

रेनाॅल्ट कंपनीने डस्टर 4 जुलै 2012 रोजी भारतीय बाजारपेठेत प्रथमच लाँच केली होती आणि ही SUV जवळपास 10 वर्षे भारतीय बाजारपेठेत विकली गेली होती.

या एसयुव्हीचा लुक पाहून विसरून जाल क्रेटा आणि सेलटाॅस, जबरदस्त ऑफरोडींग फिचर्स
नवीन डस्टरImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 02, 2023 | 10:05 PM
Share

मुंबई : प्रसिद्ध एसयूव्ही डस्टर भारतीय बाजारपेठेत पुन्हा एकदा दाखल होणार आहे. अलीकडेच ही SUV चाचणी दरम्यान दिसली आहे आणि यावेळी नवीन रेनाॅल्ट डस्टर (New Renault Duster) अधिक शक्तिशाली आणि उत्तम ऑफ-रोडिंग स्टान्ससह बाजारात उतरेल. रेनाॅल्ट आणि त्याचा सहकारी ब्रँड डेसीया पुढील वर्षी 2024 पर्यंत डस्टरचे तिसरे जनरेशन मॉडेल जागतिक बाजारपेठेत सादर करेल. रेनाॅल्ट कंपनीने डस्टर 4 जुलै 2012 रोजी भारतीय बाजारपेठेत प्रथमच लाँच केली होती आणि ही SUV जवळपास 10 वर्षे भारतीय बाजारपेठेत विकली गेली होती. कंपनीने 2022 मध्ये भारतीय बाजारपेठेत ते बंद केले होते.  ही SUV लॅटिन अमेरिका, रशिया, युक्रेन, आशिया, मध्य पूर्व, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड सारख्या देशांमध्ये देखील प्रसिद्ध आहे. आता त्याचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल बाजारात आणण्याची तयारी सुरू आहे, जी भारतातही लॉन्च केली जाणार आहे.

कशी असेल नवीन डस्टर?

नवीन डस्टरची युरोपमध्ये चाचणी होत आहे आणि ती मागील मॉडेलपेक्षा मोठी दिसत आहे. नवीन डस्टर मुख्यत्वे देसिया बिगस्टर संकल्पनेवर आधारित असेल.  त्याचे स्वरूप आणि डिझाइनबद्दल काही माहिती समोर आली आहे.

नवीन डस्टरला स्लिक हेडलॅम्प, फुल-रुंदीचा LED बार, स्क्वेरिश व्हील आर्च, इंटिग्रेटेड टर्न सिग्नल्ससह बॉडी-रंगीत रियर व्ह्यू मिरर, रुंद एअर इनटेक, स्कल्प्टेड बोनेट डिझाइन, रूफ रेल, स्पोर्टी अलॉय व्हील, सी-पिलर माउंटेड रियर हँडल मिळतात. , AG टेल लॅम्प आणि लेयर्ड स्पॉयलर सारखी वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात. याशिवाय, या एसयूव्हीचे बाह्य डिझाइन खूपच खडबडीत आहे.

नेक्स्ट-जनरल डस्टरला केबिनमध्ये प्रीमियम वैशिष्ट्ये मिळण्याची अपेक्षा आहे. ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, लार्ज टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, डेडिकेटेड कनेक्टिव्हिटी सूट आणि प्रीमियम साउंड सिस्टीम यांसारखी वैशिष्ट्ये यामध्ये दिली जाऊ शकतात. याशिवाय, ही SUV सुरक्षेच्या दृष्टीनेही खूप चांगली असेल, ज्यामध्ये 6-एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, पार्किंग सेन्सर आणि अॅडव्हान्स्ड ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टम (ADAS) सारख्या वैशिष्ट्यांचा नव्या डस्टरमध्ये समावेश केला जाऊ शकतो.

ऑफरोडिंग फिचर

कंपनीने याला अधिक बॉक्सी डिझाइन दिले आहे, त्याचा फ्लॅटर फ्रंट आणि लांब ओव्हरहॅंग्स हे आणखी आकर्षक बनवतात. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की नवीन डस्टरची केबिन पूर्वीपेक्षा अधिक प्रशस्त असेल आणि त्यामध्ये मॉड्युलर रूफ स्टोरेज सिस्टम देखील दिली जाऊ शकते, ज्यामध्ये बाहेरच्या प्रवासादरम्यान वापरल्या जाणार्‍या तंबूंची व्यवस्था केली जाईल. ऑफरोडिंग आणि साहसी प्रेमींसाठी हे वैशिष्ट्य उत्तम ठरेल.

नवीन डस्टर संयुक्त Renault-Nissan CMF-B मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर तयार केले जाईल, जसे की इतर अनेक मॉडेल्समध्ये देखील पाहिले गेले आहे. यामध्ये, कंपनी त्या ऑफरोडिंग फीचर्सचा समावेश करण्याचा प्रयत्न करेल जे जागतिक बाजारात सध्या डस्टर 4×4 मध्ये दिसत आहेत. ही आंतरराष्‍ट्रीय बाजारात उपलब्‍ध असलेली सर्वात परवडणारी फोर-व्हील ड्राइव्ह एसयूवी आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....