AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Renault Kiger SUV : रेनॉल्टची नवीन बजेट एसयूव्ही लाँच… किंमतीसह, लूक आणि फीचर्स ठरतोय आकर्षण

ज्या ग्राहकांना आपल्या बजेटमध्ये एसयुव्ही खरेदी करायची आहे, त्यांच्यासाठी Renault Kiger हा एक चांगला पर्याय आहे, या कारची सुरुवातीची किंमत 6 लाखांपेक्षा कमी आहे. आकर्षक फीचर्स आणि दमदार लूकमुळे रेनॉल्ट किगर ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहे.

Renault Kiger SUV : रेनॉल्टची नवीन बजेट एसयूव्ही लाँच... किंमतीसह, लूक आणि फीचर्स ठरतोय आकर्षण
रेनॉल्टImage Credit source: social
| Edited By: Shubham Kulkarni | Updated on: Jul 09, 2022 | 8:40 PM
Share

मुंबई : रेनॉल्ट किगर एसयुव्हीने (Renault Kiger SUV) भारतातील सब कॉम्पॅक्ट (Sub compact) 4 मीटर कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जून 2022 च्या एसयुव्ही सेलिंग रिपोर्टमध्ये ही बाब अधिक ठळकपणे अधोरेखित झालेली आहे. गेल्या महिन्यात रेनॉल्ट किगरच्या 3411 युनिट्सची विक्री झाली होती. 6 लाखांपेक्षा कमी किमतीत रेनॉल्ट किगर त्याच्या दमदार लुकमुळे आणि अनेक फीचर्समुळे (features) ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. जर तुम्ही बजेट SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी रेनॉल्ट किगरचा उत्तम पर्याय आहे. या लेखात आपण या एसयुव्हीच्या फीचर्स, किंमत आणि लूकबाबत माहिती घेणार आहोत.

अनेक खास फीचर्स

Renault Kiger भारतात RXE, RXL, RXT, RXT(O) आणि RXZ या विविध सेगमेंटमध्ये 5.99 लाखांपासून ते 10.62 लाख रुपयांच्या एक्सशोरूम किमतींसह 5 ट्रिम लेव्हलवर 20 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ही 5 सीटर SUV 2 इंजिन पर्यायांसह तसेच मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. यात 8 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पुश स्टार्ट/स्टॉप बटण, वायरलेस चार्जिंग, ऑटो क्लायमेट कंट्रोल, मल्टिपल एअरबॅग्ज, रिअर पार्किंग सेंसर्ससह अनेक स्टॅंडर्ड आणि सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार किगरचा मायलेज 20 kmpl पर्यंत आहे.

5.99 लाखांपासून सुरुवाती किंमत

व्हेरिएंट आणि त्यांच्या किमतींबद्दल बोलायचे झाल्यास बेस मॉडेल Renault Kiger RXE मॅन्युअल पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 5.99 लाख रुपये आहे. Renault Kiger RXL मॅन्युअल पेट्रोल व्हेरिएंटची किंमत 6.95 लाख रुपये आहे. Renault Kiger RXT मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटची किंमत 7.50 लाख रुपये आहे. Renault Kiger RXT Opt मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटची किंमत 7.82 लाख रुपये आहे. Renault Kiger RXL AMT पेट्रोल व्हेरियंटची किंमत 8.04 लाख रुपये आहे. Renault Kiger RXT Opt DT मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटची किंमत 8.05 लाख रुपये आहे. Renault Kiger RXT AMT Opt पेट्रोल व्हेरियंटची किंमत 8.37 लाख लाख रुपये आहे. Renault Kiger RXZ मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटची किंमत 8.39 लाख रुपये आहे. Renault Kiger RXT AMT Opt DT पेट्रोल व्हेरियंटची किंमत 8.60 लाख रुपये आहे. Renault Kiger RXT DT मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटची किंमत 8.62 लाख रुपये आहे. Renault Kiger RXT Opt Turbo Manual Petrol व्हेरियंटची किंमत 8.92 लाख रुपये आहे. Renault Kiger RXZ AMT पेट्रोल प्रकाराची किंमत 8.94 लाख रुपये आहे. Renault Kiger RXT Opt Turbo DT मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटची किंमत 9.15 लाख रुपये आहे.

Follow Us
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?
मुंबईत पावसाचा कहर! बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जनक बंगल्याबाहेर पाणीच
Viral Video | मुंबईत पावसाचा कहर! बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जनक बंगल्याबाहेर पाणीच पाणी
Subway नाही, खळखळ वाहती नदीच! अंधेरी सबवे'तील धक्कादायक दृश्य, पहा
Subway नाही, खळखळ वाहती नदीच! अंधेरी सबवे'तील धक्कादायक दृश्य, पहा व्हिडीओ
फडणवीसांचा मोठा इशारा; घराबाहेर पडण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहाच
Devendra Fadnavis | 6 तारखेपर्यंत धोका! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा इशारा; घराबाहेर पडण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहाच