AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Car : जूनमध्ये ‘या’ कार ठरल्या टॉप-5 बेस्ट सेलिंग कार… कोणी कोणाला दिला धोबीपछाड?

 मारुती सुझुकीने या वर्षी जून महिन्यामध्ये 12597 युनिट्‌सची विक्री केली आहे. तर गेल्या वर्षी याच महिन्यात मारुतीने जून 2021 मध्ये डिझायरची 12639 युनिटची विक्री केली होती. या यादीमध्ये दुसर्या स्थानावर टाटा टिगोरचा क्रमांक लागतो. जून 2022 मध्ये या कारचे 4931 युनिट्‌सची विक्री झालेली होती. तर गेल्या वर्षी 1076 युनिट्‌सची विक्री करण्यात आली होती.

Car : जूनमध्ये ‘या’ कार ठरल्या टॉप-5 बेस्ट सेलिंग कार... कोणी कोणाला दिला धोबीपछाड?
देशात सर्वाधिक सेल झाल्या ‘या’ टॉप 5 कार
| Edited By: | Updated on: Jul 09, 2022 | 5:56 PM
Share

मुंबई : जूनमधील एकूण विक्री झालेल्या कार्सचे आकडे समोर आले आहेत. यात पहिल्या टॉप 5 बेस्ट सेलिंग कार (Top 5 best selling cars) या सेडन कार ठरल्या आहेत. बेस्ट सेलिंग कारमध्ये मारुती सुझुकीने तसेच टाटा आदींनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. मे महिन्यामध्येही मारुती सुझुकीच्य वेगनआर, बलेनो, स्वीफ्ट, टाटा टिगोर, ह्युंदाईची क्रेटा आदी हॅचबॅक (Hatchback) सेगमेंटच्या गाड्यांची चलती होती. आतादेखील जूनच्या कार सेलिंग अहवाल समोर आला असून त्यातही मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) कार विक्रीतील आपली पकड घट्ट ठेवली आहे. या वेळी यादीत टॉपवर मारुती सुझुकीची डिझायर कारने आपले स्थान कायम ठेवले आहे. तर दुसर्या क्रमांकावर टाटाच्या कारचा समावेश करण्यात आला आहे.

  • 1) मारुती सुझुकीने या वर्षी जून महिन्यामध्ये 12597 युनिट्‌सची विक्री केली आहे. तर गेल्या वर्षी याच महिन्यात मारुतीने जून 2021 मध्ये डिझायरची 12639 युनिटची विक्री केली होती. मारुती सुझुकीच्या गाड्या नेहमी विक्रीमध्ये अव्वल असतात कंपनीच्या व्हल्यूचा कारच्या विक्रीवर मोठा परिणाम दिसून येत असतो.
  • 2) या यादीमध्ये दुसर्या स्थानावर टाटा टिगोरचा क्रमांक लागतो. जून 2022 मध्ये या कारचे 4931 युनिट्‌सची विक्री झालेली होती. तर गेल्या वर्षी 1076 युनिट्‌सची विक्री करण्यात आली होती. टाटा टिगोर एक छोट्या आकाराची कार असून कंपनीने या वर्षी कारचे सीएनजी व्हेरिएंट सादर केले आहे.
  • 3) ह्युंदाई ओराची जून 2022 मध्ये 4102 युनिट्‌सची विक्री झाली होती. तर मागील वर्षी या महिन्यात हाच आकडा 3126 इतका होता. ही कार एका आकर्षक डिझाईनमध्ये उपलब्ध असून यात ग्राहकांना चांगला मायलेजही मिळतो. शिवाय कारमध्ये अधिक फीचर्स देण्यात आले आहेत.
  • 4) होंडा कंपनीने जून 2022 मध्ये अमेझची 3350 युनिट्‌ची विक्री केली. गेल्या वर्षी जून 2021मध्ये कंपनीने 1487 युनिट्‌सची विक्री केली होती. होंडा अमेझ चांगल्या आकर्षक लूकमध्ये उपलब्ध आहे. यात अतिशय चांगले इंटीरियर देण्यात आलेले आहे.
  • 5) होंडा सिटी, ही एक लोकप्रिय कार आहे. जून महिन्यात कंपनीने याचे 3292 युनिट्‌सची विक्री केली होती. तर गेल्या वर्षी याच महिन्यात 2571 युनिट्‌सची विक्री करण्यात आली होती.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.