AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

85% इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर आली रे, देशाची पहिली फ्लेक्स-फ्युअल कार,किंमती किती ?

पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त असलेल्या फ्लेक्स-फ्युअलवर धावणारी देशाची पहिली फ्लेक्स-फ्युअल कार सोमवारी लाँच झाली आहे. या कारच्या लाँच होण्याने पेट्रोल महागाईपासून थोडा दिलासा मिळणार आहे.

85% इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर आली रे, देशाची पहिली फ्लेक्स-फ्युअल कार,किंमती किती ?
Flex Fuel maruti waganR
| Updated on: Jun 15, 2026 | 7:48 PM
Share

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर मारुती सुझुकी कंपनीने सोमवारी भारतात पहिली फ्लेक्स-फ्युअल कार वॅगन-आर बायोफ्लेक्सला लाँच केले आहे. नवीन वॅगन आर पूर्णपणे E85 फ्यूअल ( 85% इथेनॉल मिक्स पेट्रोल ) इंधनावर धावणार आहे. वॅगन-आर बायोफ्लेक्सला दोन व्हेरिएंटमध्ये उतरवण्यात आले आहे. या कारला सध्या टॅक्सी आणि फ्लीटसारख्या कमर्शियल सेक्टरचे लोक खरेदी करु शकणार आहेत.

नव्या वॅगन-आर बायोफ्लेक्समध्ये कोणताही बदल केलेला नाही. यात E85 फ्यूअलवर चालवण्यासाठी इंजिन आणि अन्य पार्ट्सच्या तंत्रात बदल करण्यात आले आहेत या कारणाने ही कार स्टँडर्ड मॉडेलहून 86 हजार रुपयांनी महाग आहे. या कारची सुरुवातीची किंमत 7.24 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

तसेच कमर्शियल सेगमेंटमध्ये मिळणारी वॅगनआर टूर H3 च्या तुलनेत हीचे फ्लेक्स फ्युअल व्हर्जन 1.35 लाख ते 2.25 लाख रुपयांपर्यंत महाग आहे. वॅगनआर टुर H3 किंमत 4.99 लाख ते 5.89 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

परफॉर्मेन्स: 1.2-लिटर फ्लेक्स-फ्यूअल पेट्रोल इंजिन

फ्लेक्स फ्यूअल वॅगन-आरमध्ये परफॉर्मेन्समध्ये एक नवीन 1.2-लिटर फ्लेक्स-फ्यूअल इंजिन देण्यात आले आहे. जे E85 इथेनॉल ब्लेंडेड फ्यूअलवर चालते. E85 फ्लेक्स फ्यूअलवर चालण्यासाठी या इंजिनात अनेक मॅकेनिकल बदल करण्यात आले आहेत. कार कंपनीने यात अनेक मॅकनिकल बदल केले आहेत. कंपनीने यात अपग्रेडेड फ्युअल इंजेक्टर्स, नवीन फ्युअल पंप, नवीन फ्युअल लाईन्स , री-कॅलिब्रेटेड ECU आणि एक स्पेशल इथेनॉल सेंसॉर लावण्यात आला आहे.

या बदलामुळे स्पेसिफिकेशन्स मध्ये थोडासा फरक पडला आहे. रेग्युलर 1.2 – लिटर पेट्रोल इंजिन थोडे जास्त पॉवर आणि टॉर्क देत होते. मात्र, कंपनीने सध्या याचे कामगिरी जाहीर केलेली नाही. या इंजिनाच्या सोबत 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स दिलेला आहे.

मायलेजचे आकडे देखील अधिकृतपणे जाहीर केलेले नाहीत. परंतू अलिकडे झालेल्या चाचणीत E85 फ्यूअल वर चालवल्याने मायलेजमध्ये सुमारे 24% टक्क्यांपर्यंत घसरण होऊ शकते. स्टँडर्ड पेट्रोल वॅगन-आर मॅन्युअलमध्ये 23.56kmpl चे मायलेज मिळते.

Follow Us
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद