AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Electric Scooter : जुलैमध्ये ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स शब्दश: गाजल्या! यातील तुमची फेवरेट कोणती?

इंधनाचे वाढते दर, वाढती महागाई आदी विविध कारणांमुळे भारतीय दुचाकी बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटरच्या सेगमेंटमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. Okinawa Praise Pro, TVS iQube Electric, Bajaj Chetak, Ather 450X आणि Okinawa Ridge Plus आदी स्कूटरची मार्केटमध्ये चलती राहिली आहे.

Electric Scooter : जुलैमध्ये ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स शब्दश: गाजल्या! यातील तुमची फेवरेट कोणती?
ईव्हीImage Credit source: सोशल मीडिया
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Aug 28, 2022 | 2:04 PM
Share

भारतीय टू-व्हीलर मार्केट सध्या गरम आहे. त्यातच पेट्रोलचे वाढते दर पाहता, आता इलेक्ट्रिक स्कूटर्सचे (Electric Scooter) मार्केट शेअर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये कमी किमतीत अनेक चांगले पर्याय ग्राहकांसमोर निर्माण झालेले आहेत. या स्कूटरच्या माध्यमातून युजर्स केवळ डेली युजच नाही तर अगदी व्यावसायिक (Professional) सामान वाहून नेण्यासाठीही तिचा वापर करीत आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यापाराचे सामान वाहून नेण्यासाठी या स्कूटर उपयोगी पडत आहेत. आज या लेखात आपण अशाच काही स्कूटरबाबत माहिती घेणार आहोत, ज्या जुलै महिन्यात सर्वाधिक विकल्या (Sale) गेल्या होत्या. या यादीत 5 स्कूटर्सचा समावेश आहे.

  1. Okinawa Praise Pro : ओकिनावाची ही स्कूटर एक बजेट सेगमेंटमधील स्कूटर आहे. स्कूटरची किंमत 84747 रुपये (एक्सशोरूम) आहे. ही स्कूटर फक्त एकाच प्रकारात खरेदी केली जाउ शकते. ही स्कूटर जुलैमध्ये सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक स्कूटर ठरली आहे.
  2. TVS iQube : ही TVS स्कूटर आकर्षक लूक आणि मजबूत बिल्ट क्वालिटीसह येते. जुलै 2022 मध्ये या स्कूटरच्या एकूण 6304 युनिट्सची विक्री झाली आहे. TVS ची ही इलेक्ट्रिक स्कूटर सध्या तीन प्रकारात सादर केली जात आहे.
  3. Bajaj Chetak : जुलै महिन्यातील विक्रीत बजाज चेतकचे 3000 युनिट्स विकले गेले आहेत विक्रीमध्ये ही स्कूटर तिसऱ्या स्थानावर आहे. या स्कूटरमध्ये अनेक चांगले फीचर्स देण्यात आले असल्याने ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहे.
  4. Ather 450X : ही इलेक्ट्रिक स्कूटर जुलैमध्ये विक्रीच्या बाबतीत चारव्या क्रमांकावर आहे. यात नवीन पॉवर ट्रेन आहे. यासोबतच यामध्ये मोठी बॅटरी आणि अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. हे तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. नवीन प्रकारात इको मोडवर 105 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देण्याचा दावा करण्यात आला आहे.
  5. Okinawa Ridge Plus : Okinawa ची ही स्कूटर पाचव्या स्थानावर आहे स्कूटरची सुरुवातीची किंमत 66787 रुपये (एक्सशोरूम) आहे. तसेच यामध्ये 800 वॅटच्या मोटर्सचा वापर करण्यात आला आहे. ते एका चार्जवर 120 किमी अंतर कापू शकते. जुलै महिन्यात स्कूटरच्या 1302 युनिट्सची विक्री झाली आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं