50 हजारांहून कमी किमतीत मिळतात ‘या’ 5 स्कूटर, एकापेक्षा एक दमदार फीचर्स

सध्या इलेक्ट्रिक बाईकचे मार्केट तेजीत आहे. वाढत्या इंधनाच्या किंमतींमुळे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. भारतात अनेक दुचाकी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या ई-स्कूटर बाजारात आणल्या आहेत. परंतु सध्या ई-स्कूटरची किंमत आवाक्याबाहेर आहेत. मात्र काही कंपन्यांकडून बजेटमध्ये ई-स्कूटर विकल्या जात आहेत.

50 हजारांहून कमी किमतीत  मिळतात ‘या’ 5 स्कूटर, एकापेक्षा एक दमदार फीचर्स
अजय देशपांडे

|

Jun 27, 2022 | 11:12 AM

मुंबई : भारतीय टू व्हीलर बाजारामध्ये गेल्या एक ते दोन वर्षांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी (Electric scooters) सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला दिसून येत आहे. पहिल्यांदा या सेगमेंटमध्ये येत असलेल्या दुचाकींची किंमत जास्त होती. परंतु आता बाजारात अनेक दुचाकी निर्मिती कंपन्यांनी बजेट आणि चांगले फीचर्स, लूक व इतर स्पेसिफिकेशन्स (Specifications) असलेल्या दुचाकी ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. या सेगमेंटमध्ये बाउंस इनफिनिटीपासून अनेक पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. भारतीय बाजारामध्ये ओला, एथर आणि ओकिनावासह विविध कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री करीत आहेत. परंतु यांची किंमत (Price) एक लाख रुपये किंवा त्यापेक्षाही अधिक आहे. त्यामुळे आज आम्ही या लेखातून तुम्हाला 50 हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक बाइक्सची माहिती देणार आहोत.

1) Bounce Infinity E1 : ही दुचाकी स्वॅपेबल बॅटरीसह उपलब्ध आहे, म्हणजेच कंपनीने यासाठी अनेक ठिकाणी चार्जिंग स्टेशन सेट केले आहेत. त्या ठिकाणी जावून युजर्स सहजपणे डिसचार्ज झालेली बॅटरी बदलू शकणार आहेत. कंपनीच्या एका दाव्यानुसार, ही बाईक सिंगल चार्जवर 65 किमीची ड्राइव्हिंग रेंज देउ शकते. ही बाईक विनाबॅटरी साधारणत: 50 हजार रुपयांपर्यंत खरेदी केली जाउ शकते.

2) Evolet Derby : या इलेक्ट्रिक स्कूटरला 250 वाट्‌सच्या मोटरसह उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ब्रेकिंग सिस्टमबाबत बोलायचे झाल्यास, यात पुढच्या साइडला डिस्क ब्रेक आणि मागील बाजूला ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. यात इलेक्ट्रोनीकली ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे. या बाईकची किंमत कमीत कमी 46 हजार रुपये आहे.

3) Ampere Reo Elite : या स्कूटरमध्ये दोन हेडलाइटचा वापर करण्यात आला आहे. या लूकमुळे ही दुचाकी इतर बाईक्सपेक्षा वेगळी दिसते. याची सुरुवातीची किंमत 43 हजार रुपये आहे. ॲडव्हान्स फीचर्सबाबत यात एलईडी डिजिटल डॅशबोर्डचा वापर करण्यात आला आहे. हा एक फ्रंट फार्मक ड्युअल कॉईल स्पिंगसह येतो. यात, युएसबी चार्जिंग पोर्ट्‌स देण्यात आला आहे.

4) Avon E-SCOOT 504 : स्कूटरला साधारणत 45 हजार रुपयांमध्ये खरेदी केली जाउ शकते. यात टॉप स्पीड 45 किमी प्रतितासाचा देण्यात आला आहे. शॉर्ट डिस्टेंस जाण्यासाठी ही बाईक एक उत्तम पर्याय ठरु शकते.

हे सुद्धा वाचा

5) Yo Edge : ही बाईक 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. कमी अंतरावर जाण्यासाठी ही बाईक एक चांगला पर्याय आहे. यात एक ब्रेशलेस डीसी मोटर्स मिळणार आहे. याची टॉप स्पीड 25 किमी प्रतितास आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें