Kawasaki Ninja: काय रंग, काय डिझाईन, काय इंजिन… 5 लाखांत कावासाकीची दमदार बाईक

कावासाकी निंजाला भारतामध्ये 4.99 लाख रुपयांमध्ये लाँच करण्यात आली आहे. या नवीन बाईकमध्ये कंपनीने अनेक नवीन अपग्रेड आणि आकर्षक डिझाईन दिली आहे. त्यामुळे या बाईकला एक दमदार लूक मिळालेला आहे.

Kawasaki Ninja: काय रंग, काय डिझाईन, काय इंजिन... 5 लाखांत कावासाकीची दमदार बाईक
Kawasaki Ninja 400 BS 6
Image Credit source: Facebook
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jun 26, 2022 | 11:51 AM

आपल्यातील अनेकांना सुपरबाईक (Superbike) घेण्याची मनोमन इच्छा असते. परंतु सुपरबाईकच्या वाढत्या किंमतींमुळे आपल्याला ही इच्छा बाजूला ठेवावी लागत असते. परंतु आता बजेटमध्ये सुपरबाईक खरेदी करण्यार्यांसाठी काहीसा दिलासादायक बातमी आहे. अशा ग्राहकांसाठी कावासाकीने आपल्या एक न्यू बाईकला बाजारात आणले आहे. या न्यू बाईकचे नाव कावासाकी निंजा 400 बीएस 6 (Kawasaki Ninja 400 BS 6) असे ठेवण्यात आले आहे. याची किंमत देखील 5 लाखांहून कमी आहे. या बाईकमध्ये करण्यात आलेल्या बदलांबाबत बोलायचे झाल्यास, यात जुन्या मॉडेलच्या तुलनेमध्ये अपग्रेड इंजिन (Upgrade engine) आणि अनेक आकर्षक एलिमेंटचा वापर करण्यात आला आहे. खरतर, कंपनीने 2020 या वर्षी एप्रिलमध्ये नवीन एमिशन नॉर्म्स आल्यानंतर आपल्या मोटरसायकलला भारतामध्ये डिसकंटीन्यू केले होते. आता कंपनीने बीएस 6 कंप्लाइंटसोबत पुन्हा त्याची सुरुवात केली आहे.

हे सुद्धा वाचा

  1. न्यू जनरेशन निंजा 400 मध्ये अपग्रेडेट इंजिन देण्यात आले आहे. यात, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सला घेउन  काही बदल करण्यात आलेले आहेत. कावासाकी आपल्या या बाईकला भारतात सीबीयू रुटसाठी विक्री करणार आहे. कावासाकीच्या या लेटेस्ट बाईकची स्पर्धा केटीएम आरसी 390 आणि टीव्हीएस अपाचे आरआर 310 सोबत होणार आहे.
  2. कावासाकी निंजा 400 बीएस 6 ला पॉवर देण्यासाठी 399 सीसी, पॅरेलल ट्‌विन, लिक्विड कूल्ड इंजिनचा वापर करण्यात आला आहे. सोबत यामध्ये यूरो 5 नॉर्मसला फॉलो करण्यात आले आहे. इंजिनमध्ये एमीशन कंप्लाइंसला अपडेट करण्यासोबतच अजून काही नवीन बदल करण्यात आलेले आहेत. बाईकचे इंजिन 44 बीएचपीची पॉवर आणि 37 एनएमचा टार्क जनरेट करु शकतो. यात 6 स्पीड युनिट्‌स देण्यात आले आहेत.
  3. फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये स्लिम एलईडी हेडलाईटसचा वापर करण्यात आला आहे. कावासाकी बीएस 6 मध्ये स्टाइलिंगलाही अपग्रेड करण्यात आले आहेत. ही बाईक लाइम ग्रीन कर्ल्समध्ये उपलब्ध आहे.
  4. कावासाकी निंजा 400 बीएस 6 मध्ये स्पिलिट स्टाइलच्या सीट्‌सचा वापर करण्यात आलेला आहे. ही बाईक 14 लीटर फ्यूअल टँकसह उपलब्ध आहे. यात ड्युअल टोन फिनिशचा वापर करण्यात आला आहे. यात साइड स्लंग एग्जोस्टचाही वापर करण्यात आला आहे.


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें