AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यामाहाचा धमाका… या वर्षी लाँच करणार दोन ब्रँड न्यू स्पोर्ट्‌स बाईक… लूक पाहिलात का?

या दोन्ही बाईक ट्‌वीन सिलेंडसह उपलब्ध होणार आहेत. या दोन्ही बाईक्सच्या लाँचिंगची माहिती यामाहा मोटर इंडिया ग्रुपचे चेअरमन Eishin Chihana यांनी आपल्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिली आहे. या बाइक्स सध्या भारतात CBUs दोन शिपमेंटमध्ये पोहचणार आहेत.

यामाहाचा धमाका... या वर्षी लाँच करणार दोन ब्रँड न्यू स्पोर्ट्‌स बाईक... लूक पाहिलात का?
वायझेडएफ-आर7Image Credit source: tv9
| Updated on: Jun 04, 2022 | 11:35 AM
Share

यामाहा इंडियाने (Yamaha India) दिलेल्या माहितीनुसार, ते या वर्षाच्या शेवटापर्यंत दोन स्पोर्ट्स बाईक लाँच करण्याच्या तयारीला लागले आहेत. या दोन्ही बाईक्स YZF-R7 आणि MT-07 असणार आहेत. या दोन्ही बाईक ट्‌वीन सिलेंडसह उपलब्ध होणार आहेत. या दोन्ही बाईक्सच्या (new sports bikes) लाँचिंगची माहिती यामाहा मोटर इंडिया ग्रुपचे चेअरमन Eishin Chihana यांनी आपल्या नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत (Interview) दिली आहे. या बाइक्स सध्या भारतात CBUs दोन शिपमेंटमध्ये पोहचणार आहेत. साधारणत: 2024 पर्यंत या बाईक्स रस्त्यावर सर्वत्र नजरेस पडतील अशी आशा आहे. या लेखातून बाइक्समधील काही फीचर्सची माहिती घेणार आहोत.

चेअरमन Eishin Chihana यांनी ऑटोकार इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले, की भारतात YZF-R7 आणि MT-07 या दोन मोठ्या स्पोट्‌स बाईक्स लाँच करण्याचा कंपनीचा उद्देश आहे. या दोन्ही बाईक्स मर्यादीत स्वरुपात उपलब्ध राहणार असून टॉप रेंज कस्टमर्ससाठी या बाईक्स भारतात उपलब्ध असणार आहेत. जर कंपनीने या वर्षी दोन्ही बाईक्सची आयात केली तर कंपनीला OBD-2 रेग्युलेशन्सपासून वाचता येणार आहे.

यामाहाच्या या दोन्ही प्रीमियम रेंज असलेल्या बाईक्स युरो5/BS6 वर आधारीत राहणार आहे. भारत सरकारच्या नियमांनुसार, 1 एप्रिल 2023 च्या दरम्यान विक्री होणार्या वाहनांमध्ये OBD-2 फीचर असणे आवश्‍यक राहणार आहे. ही टेक्नोलॉजी डायग्नोस्टिक टेक्नोलॉजीवर आधारीत आहे. यामाहा सध्या या फीचरवर काम करीत नसून एका वर्षानंतर कंपनी भारतीय बाजारात OBD-2 फीचर असलेली बाईक सादर करेल अशा विश्‍वास कंपनीकडून व्यक्त होत आहे.

यामाहा MT-07 चे फीचर्स

MT-07 आणि MT-09 एक स्ट्रीट नेकेड मॉडेल्स आहेत. हे दोन्ही मॉडेल पहिल्यापेक्षा जास्त पावरफुल आणि चांगल्या इक्विपमेंटसह उपलब्ध आहेत. या आधी या बाइक्समध्ये 689 सीसी इंजिन लावण्यात आले होते. ते आता वाढवून 890 सीसीचे करण्यात आले आहे. ही बाइक इन-लाइन ट्रिपल सिलेंडरसह उपलब्ध आहे.

R7 बाइकची वैशिष्ट्ये

यामाहाची R7 बाइक पूर्णपणे फेयर्ड स्पोर्ट्‌स बाइक आहे. ही बाइक MT-07 प्लॅटफॉर्मवर बनविण्यात आली आहे. या बाइकची स्पर्धा भारतातील कावासाकी निंजा 650 आणि होंडा सीबी 650 आर सोबत होणार आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...