कार घेण्याच्या विचारात आहात? मारुती, होंडासाठी वेटिंग पीरियडची माहिती जाणून घ्या…

मारुती डिझायरला ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. यासाठी ग्राहक कितीही दिवस वेटिंगवर राहण्यास तयार असतात. ही ग्राहकांसाठी बहुप्रतिक्षित सेडानपैकी एक आहे. ही कार देशांतर्गत बाजारपेठेत सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारपैकी एक आहे. ग्राहकांच्या प्रचंड मागणीमुळे त्याचा वेटिंग पीरियड वाढला आहे.

कार घेण्याच्या विचारात आहात? मारुती, होंडासाठी वेटिंग पीरियडची माहिती जाणून घ्या...
देशात सर्वाधिक सेल झाल्या ‘या’ टॉप 5 कार
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 12:14 PM

भारतीय कार बाजारात एसयुव्हीसह (SUV) सेडन सेगमेंटच्या कारच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. अनेक लोकांचा कल कार खरेदीकडे दिसून येत आहे. त्यात आपआपल्या सेगमेंटमध्ये लोकप्रिय झालेल्या कार्सलाही ग्राहकांकडून मोठी मागणी वाढली आहे. अशात मागणी जास्त व पुरवठा कमी असल्याने तसेच कार निर्मितीसाठी लागणार्या कच्च्या मालाचा (Raw material) पुरवठाही कमी होत असल्याने कार निर्मितीच्या गतीला मर्यादा येत असतात. अशा सर्वांचा परिणाम म्हणून मागणीच्या तुलनेत कार्सचा पुरवठा कमी होत असतो. त्यामुळे ग्राहकांना कार खरेदी केल्यावरही वेटिंग पीरियडवर (waiting period) रहावे लागत असते. अलीकडची गोष्ट म्हणजे काही गाड्यांचा वेटिंग पीरियड सहा महिन्यांपर्यंत पोहोचला आहे. या लेखातून आम्ही तुम्हाला अशाच काही सेडन कारबद्दल सांगत आहोत, ज्यांचा वेटिंग पीरियड सर्वाधिक आहे..

या गाड्यांना मागणी

सर्वात जास्त वेटिंग पीरियड असलेल्या सेडन कारची यादी पाहिल्यास त्यात, Honda City e:HEV, Hyundai Aura आणि Maruti Dzire यांचा समावेश आहे. या कारच्या खरेदीसाठी ग्राहकांना वेटिंग पीरियडवर रहावे लागत आहे. याशिवाय टाटा टिगोर आणि स्कोडा स्लाव्हियाचाही वेटिंग पीरियड काही दिवसांपासून वाढला आहे.

हे सुद्धा वाचा

सहा महिन्याचा वेटिंग पीरियड

कार निर्माता कंपनी होंडाने अलीकडेच तिचा हायब्रिड व्हेरिएंट बाजारात आणला आहे, या नवीन व्हेरिएंटचे नाव Honda City e:HEV असे ठेवण्यात आले आहे. ही होंडाची भारतातील पहिली मास-मार्केट हायब्रिड कार आहे. दरम्यान, त्याची मागणी पाहता यासाठी ग्राहकांना सहा महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. Hyundai Aura चा वेटिंग पीरियड खूप जास्त आहे. कारच्या CNG प्रकारासाठी सहा महिन्यांपर्यंत वेटिंग पीरियड आहे. दुसरीकडे मात्र, या छोट्या ह्युंदाई सेडानच्या पेट्रोल व्हेरिएंटच्या डिलिव्हरीसाठी सीएनजीपेक्षा थोडी कमी वाट पाहावी लागत असून त्यासाठी तीन महिन्यांचा वेटिंग पीरियड आहे. Aura चे डिझेल व्हेरिएंट काही काळापूर्वी भारतीय बाजारातून बंद करण्यात आले होते.

मारुतीच्या कार्सचाही समावेश

मारुती डिझायरला ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. यासाठी ग्राहक कितीही दिवस वेटिंगवर राहण्यास तयार असतात. ही ग्राहकांसाठी बहुप्रतिक्षित सेडानपैकी एक आहे. हे देशांतर्गत बाजारपेठेत सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या वाहनांपैकी एक आहे. ग्राहकांच्या प्रचंड मागणीमुळे त्याचा वेटिंग पीरियड वाढला आहे. डिझायरच्या डिझेल प्रकारासाठी सहा महिने, तर पेट्रोल प्रकारासाठी खरेदीदारांना तीन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दरम्यान, Honda City e:HE, Hyundai Aura आणि Maruti Dzire सोबत, टॉप 5 sedans मधील Tata Tigor कारसाठीही बराच वेटिंग पीरियड आहे. टाटा सेडानच्या पेट्रोल व्हेरियंटचा वेटिंग पीरियड चार महिन्यांपर्यंत आहे, तर या कारच्या सीएनजी प्रकारासाठी डिलिव्हरी तीन महिन्यांपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. या यादीतील शेवटचा क्रमांक स्कोडा स्लाव्हियाचा आहे. ही कार या वर्षाच्या सुरुवातीला भारतात दाखल झाली होती. ही कार भारतीय बाजारपेठेत यशस्वी ठरली आहे. या सेडानच्या 1.0 लिटर टर्बो-पेट्रोल प्रकारासाठी अधिकृत वेटिंग पीरियड सुमारे दोन महिने आहे. दुसरीकडे, त्याच्या 1.5 लीटर टर्बो-पेट्रोल व्हेरियंटसाठी चार महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.