PP Madhawan | सोनिया गांधींच्या स्वीय सचिवावर बलात्काराचा आरोप, कलम 376, 506 अन्वयेनुसार गुन्हा दाखल!

माधवन यांना पीडितेसोबत लग्न करायचे होते, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यांनी संमतीशिवाय महिलेशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. पीडितेने असाही दावा केला आहे की, या वर्षी फेब्रुवारीमध्येही माधवन यांनी तिला सुंदर नगर येथील फ्लॅटमध्ये नेले होते. तेथे माधवन यांनी पुन्हा महिलेसोबत तिच्या संमतीशिवाय संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.

PP Madhawan | सोनिया गांधींच्या स्वीय सचिवावर बलात्काराचा आरोप, कलम 376, 506 अन्वयेनुसार गुन्हा दाखल!
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 28, 2022 | 12:03 PM

मुंबई : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे स्वीय सचिव पीपी माधवन यांच्याविरोधात दिल्लीत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये नोकरी आणि लग्नाच्या नावाखाली बलात्कार (Rape) केल्याचा आरोप केलायं. पीडित महिलेच्या पतीचा 2020 मध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यू झाल्यापासून पीडित महिला नोकरीच्या शोधात होती. त्यावेळी ती पीपी माधवनच्या (PP Madhavan) संपर्कात आली. पीपी माधवन यांनी महिलेला मुलाखतीसाठीही बोलावले होते. तक्रारीत पीडित महिलेने माधवन यांच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोपही केला आहे.

संमतीशिवाय महिलेशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न

माधवन यांना पीडितेसोबत लग्न करायचे होते, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यांनी संमतीशिवाय महिलेशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. पीडितेने असाही दावा केला आहे की, या वर्षी फेब्रुवारीमध्येही माधवन यांनी तिला सुंदर नगर येथील फ्लॅटमध्ये नेले होते. तेथे माधवन यांनी पुन्हा महिलेसोबत तिच्या संमतीशिवाय संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.

माधवन सतत व्हॉट्स अॅपवरून व्हिडिओ कॉल करत असल्याचा आरोप

महिलेच्या म्हणण्यानुसार, माधवनने तिला उत्तम नगर मेट्रो स्टेशनजवळ जबरदस्तीने कारमध्ये बसवले होते. महिलेचा आरोप आहे की, माधवन सतत व्हॉट्स अॅपवरून व्हिडिओ कॉल करत होते. या आरोपांवर माधवन यांच्या पीएने बलात्काराची चर्चा आणि आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले आहे. हा फसवण्यासाठी कट रचला जात असल्याचे म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

पोलीस ठाण्यात कलम 376, 506 अन्वये गुन्हा दाखल

उत्तम नगर पोलीस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरून कलम 376, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळते आहे. द्वारका डीसीपी म्हणाले की, सर्व आरोप 71 वर्षीय व्यक्तीवर करण्यात आले आहेत. ते एका ज्येष्ठ नेत्याचे पीए म्हणून काम करतात. यासंदर्भात आजतकने सविस्तर रिपोर्ट दिला आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें