फोर्डनंतर आणखी एका बजेट कार ब्रँडचे भारतातून पॅकअप; उत्पादन केले बंद, कारण काय?

अमेरिकन कार कंपनी फोर्ड नंतर आता जपानच्या एका कार ब्रँडने भारतातून आपला व्यवसाय गुंडाळला आहे. यानंतर संबंधित ब्रँडची बजेटकार देखील आता भारतात उपलब्ध होणार नसून तिचे प्रोडक्शनच बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

फोर्डनंतर आणखी एका बजेट कार ब्रँडचे भारतातून पॅकअप; उत्पादन केले बंद, कारण काय?
निसान मोटर इंडियाने आपल्या डॅटसन ब्रँडच्या रेडी-गो कारचे उत्पादन बंद केले आहे.
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 2:23 PM

जपानी कार कंपनी निसान मोटर इंडिया (Nissan Motor India) आता आपल्या डॅटसन (Datsun) कारचा ब्रँड भारतीय बाजारपेठेतून गुंडाळण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आता या ब्रँडच्या सर्वात लोकप्रिय कार रेडी-गोचे (redi-Go) उत्पादनही बंद केले आहे. कंपनीने डॅटसन ब्रँडच्या आणखी दोन मॉडेल्सचे उत्पादन आधीच थांबवले आहे. निसान मोटरचे म्हणणे आहे, की जोपर्यंत या गाड्यांचा स्टॉक आहे तोपर्यंत त्यांची विक्री सुरूच राहील. त्याचबरोबर ज्यांच्याकडे डॅटसन ब्रँडची कार आहे, त्यांना कंपनीकडून सेवा तसेच ग्राहकांना त्यांच्या कारवर वॉरंटी मिळत राहील. डॅटसन ब्रँड अंतर्गत, कंपनीने भारतीय बाजारपेठेत अनेक एंट्री लेव्हल कार लॉन्च केल्या आहेत. यामध्ये गो प्लस, गो आणि रेडी-गो सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. या देशातील सर्वात स्वस्त कारमधील एक होत्या.

डॅटसनला घ्यावा लागला खरेदीदारांचा शोध

डॅटसन ब्रँडच्या गाड्या स्वस्त असूनही देशभरात फारशा लोकप्रिय झाल्या नाहीत. या कार ग्राहकांना आकर्षित करण्यात अयशस्वी झाल्या आणि म्हणूनच कंपनीने डॅटसन ब्रँडच्या कमी मागणीमुळे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीही डॅटसन ब्रँडच्या विक्रीअभावी कंपनीने अनेक देशांच्या मार्केटमधून काढता पाय घेतला होता. यामध्ये रशिया, इंडोनेशिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. चेन्नई प्लांटमध्ये रेडी-गोचे प्रोडक्शन थांबल्यानंतर डॅटसन आता जगातील फक्त काही देशांमध्येच उरली आहे. दरम्यान, डॅटसन बंद करणे हा कंपनीच्या जागतिक धोरणाचा एक भाग असून कंपनीला तिच्या प्रमुख ब्रँड निसानवर लक्ष केंद्रित करायचे असल्याचा खुलासा कंपनीच्या वतीने करण्यात आला आहे.

मॅग्नाइट एसयूव्हीवर लक्ष केंद्रित

भारतात निसान मोटर डिसेंबर 2020 मध्ये लॉन्च झालेल्या तिच्या मॅग्नाइट एसयूव्ही ब्रँडवर लक्ष केंद्रित करणार आहे. तेव्हापासून आतापर्यंत 1 लाखांहून अधिक ग्राहकांनी कंपनीच्या या कारवर विश्वास व्यक्त केला आहे. मॅग्नाइट व्यतिरिक्त कंपनी किक्स एसयूव्हीवरही लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगण्यात आले.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.