AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय बाजारात Maruti चा जलवा, टॉप सेलिंग कार्सच्या यादीत मारुतीच्या 8 गाड्या

कार उत्पादक कंपन्यांनी जून महिन्यातील त्यांच्या वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. या महिन्यातही मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) देशात अव्वल स्थान पटकावलं आहे.

भारतीय बाजारात Maruti चा जलवा, टॉप सेलिंग कार्सच्या यादीत मारुतीच्या 8 गाड्या
Best selling cars
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 04, 2021 | 11:35 PM
Share

मुंबई : सर्व कार उत्पादक कंपन्यांनी जून महिन्यातील त्यांच्या वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. या महिन्यातही मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) देशात अव्वल स्थान पटकावलं आहे. मारुती सुझुकी कंपनीने जूनमध्ये एकूण 147,388 मोटारींची विक्री केली आहे, तर मेमध्ये ही संख्या 57,228 इतकी होती. (TOP 10 Best selling cars in June 2021, Maruti suzuki Dominating market, while hyundai stands second)

जूनमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्यांबद्दल बोलायचे झाल्यास, मारुतीच्या 8 गाड्यांचा टॉप 10 वाहनांच्या यादीमध्ये समावेश आहे. या व्यतिरिक्त, ह्युंदायच्या क्रेटा एसयूव्ही आणि Grand i10 Nios प्रीमियम हॅचबॅक या दोन गाड्यांनी टॉप सेलिंग वाहनांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. त्यामुळे ह्युंदाय ही मारुतीनंतरची देशातील दुसरी सर्वात यशस्वी वाहन कंपनी ठरली आहे.

Maruti WagonR

मारुती सुझुकी वॅगन आर (Maruti Suzuki Wagon R) या कारने जून 2021 मध्ये 19,447 युनिट्सची विक्री साधली आहे. त्यामुळे ही कार देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. जून 2020 मधील 6,972 युनिटच्या विक्रीच्या तुलनेत गेल्या महिन्यात वॅगन आरच्या विक्रीत मारुती सुझुकीने 179 टक्के वाढ नोंदवली आहे. विशेष म्हणजे वॅगन आरने देशातील स्विफ्ट हॅचबॅक कारला विक्रीच्या बाबतीत मागे टाकलं आहे.

Maruti Swift

गेल्या महिन्यात मारुतीने स्विफ्टच्या 17,272 वाहनांची विक्री केली आहे. देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांच्या यादीत स्विफ्टने दुसरं स्थान पटकावलं आहे.

Maruti Baleno

विक्रीच्या बाबतीत ही कार मे महिन्यात देशात सातव्या स्थानी होती. मात्र जूनमध्ये या कारने तिसरं स्थान पटकावलं आहे. कंपनीने जून 2021 मध्ये या कारच्या 14,701 युनिट्सची विक्री केली आहे.

Maruti Vitara Brezza

जून महिन्यात मारुतीच्या या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या 12,833 युनिट्सची विक्री झाली आहे.

Maruti Dzire

टॉप 10 यादीमध्ये समाविष्ट असलेली ही पहिली सब कॉम्पॅक्ट सेडान कार आहे. जूनमध्ये मारुतीने या कारच्या 12,639 युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीने 5,834 मोटारींची विक्री केली होती.

Maruti Alto

भारतातील सर्वात जुन्या हॅचबॅक कारने टॉप 10 यादीत स्थान मिळवले हे आश्चर्यच आहे. तथापि, जूनमध्ये ही कार बर्‍याच लोकांना आवडली आणि या कारची एकूण विक्री 12,513 युनिट्स इतकी होती. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने या कारची एकूण 7,298 वाहने विकली होती.

Hyundai Creta

ह्युंदायची ही कार बेस्ट सेलर एसयूव्ही ठरली आहे. जूनमध्ये ह्युंदायने या कारच्या 9,941 युनिट्सची विक्री केली आहे. तर मागील वर्षी ही आकडेवारी 7,207 इतकी होती.

Maruti Ertiga

ही 7 सीटर एमपीव्ही जूनमध्ये सेगमेंट लीडर होती. गेल्या महिन्यात मारुतीने Ertiga च्या एकूण 9,920 मोटारींची विक्री केली. मागील वर्षी या थ्री-रो सेव्हे सीटर एसयूव्हीची एकूण 3,306 वाहने विकली होती.

Maruti Eeco

मारुतीची ही मिनीव्हॅन अजूनही टॉप 10 यादीमध्ये आहे. गेल्या महिन्यात कंपनीने Eeco च्या एकूण 9,218 युनिट्सची विक्री केली होती. गेल्या वर्षी याच काळात कंपनीने एकूण 3,803 वाहनांची विक्री केली होती.

इतर बातम्या

लाट असो की लॉकडाऊन, महिंद्रा सुसाट, एका महिन्यात विक्रमी ट्रॅक्टर्सची विक्री

खूशखबर ! आता ड्रायव्हिंग लायसन्स बनवणे झाले सोपे, जाणून घ्या काय आहे नवीन नियम

जर्मन कारमेकर Volkswagen ची Polo GTI Facelift सादर, जाणून घ्या खास फीचर्स

(TOP 10 Best selling cars in June 2021, Maruti suzuki Dominating market, while hyundai stands second)

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा