‘या’ आहेत देशातील टॉप 10 टू व्हीलर्स , विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर

भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या टू-व्हीलर्सची यादी जाहीर करण्यात आली आहे. (Top-Selling Two-Wheelers In India In January 2021)

‘या’ आहेत देशातील टॉप 10 टू व्हीलर्स , विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर

मुंबई : सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) ने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी 2021 मध्ये देशातील सर्वाधिक दुचांकींच्या विक्रीमध्ये हिरो मोटोकॉर्पने (Hero Motocorp) पहिल्या दहा दुचाकी वाहनांच्या यादीत स्वतःचा दबदबा कायम ठेवला आहे. या दुचाकी उत्पादक कंपनीची एंट्री-लेव्हल प्रवासी मोटारसायकल स्प्लेंडर या कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या महिन्यात विक्रीच्या बाबतीत टॉपला आहे. तर देशातील सर्वोत्तम स्कूटर होंडा अ‍ॅक्टिव्हा दुसर्‍या स्थानावर आहे. (Top 10 two wheelers in india, hero once again tops the chart)

जानेवारी 2021 मध्ये हिरो स्प्लेंडर कम्युटर मोटरसायकलच्या 2,25,382 युनिट्स दुचाकींची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात हिरोने 2,22,572 युनिट्स स्प्लेंडरची विक्री केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात यंदा 1.26 टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसऱ्या बाजूला होंडाने गेल्या महिन्यात अ‍ॅक्टिव्हा स्कूटरच्या 2,11,660 युनिट्सची विक्री केली आहे, जी जानेवारी 2020 मध्ये विक्री झालेल्या 234,749 युनिट्सपेक्षा 9.84% कमी आहे.

HF डीलक्सच्या विक्रीत घट, तरिही तिसर् स्थान कायम

टू व्हीलर सेगमेंट कोरोना साथीच्या रोगाच्या प्रभावातून बाहेर पडत असताना, एंट्री लेव्हल सब सेगमेंटने दुचाकींच्या विक्रीत टॉपचं स्थान मिळवलं आहे. हिरो मोटोकॉर्पच्या कम्यूटर मोटरसायकल, HF डीलक्सने गेल्या मिहन्यात 1,34,860 युनिट्सच्या विक्रीसह देशात तिसरं स्थान मिळवलं आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात HF डीलक्सच्या 1,91,875 युनिट्सची विक्री झाली होती. या विक्रीत यंदा 29.71% इतकी घट झाली आहे.

बजाज पल्सर चौथ्या स्थानी

जानेवारी 2021 मध्ये टॉप 10 दुचाकी वाहनांच्या यादीमध्ये बजाज पल्सर, होंडा सीबी शाईन, अॅक्सेस, टीव्हीएस एक्सएल सुपर, सीटी, रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 आणि ग्लॅमरचा समावेश आहे. या दुचाकींचा अनुक्रमे चौथा ते 10 वा क्रमांक लागतो. रॉयल एनफील्ड क्लासिक 350 हे 500 सीसी मॉडेल हे या प्रकारातील सर्वाधिक लोकप्रिय मॉडेल आहे. मागील महिन्यात रॉयल एनफील्डच्या 40,875 युनिट्सची विक्री झाली असून जानेवारी 2020 मध्ये 40,834 युनिट्सच्या तुलनेत 0.10% वाढ झाली आहे.

रॉयल एनफिल्डचं स्थान कायम

जानेवारी 2021 मध्ये टॉप 10 दुचाकी वाहनांची विक्री 10,26,175 युनिट्स इतकी नोंदवण्यात आली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात 9,82,035 युनिट्स इतकी होती. म्हणजेच त्यामध्ये 4.49.% वाढ नोंदवली गेली आहे. टॉप 10 दुचाकींच्या यादीत हिरो मोटोकॉर्पने 39.31% मार्केट शेअरसह तीन जागा मिळवल्या आहेत. आता, स्कूटर आणि प्रीमियम मोटारसायकल प्रकारात त्यांनी अधिक लक्ष घातलं आहे. हार्ले डेव्हिडसनसोबत भागीदारी केल्यानंतर आता हिरोच्या विक्रीत आणखी वाढ होईल असं बोललं जात आहे.

इतर बातम्या

‘या’ आहेत देशातील टॉप 10 टू व्हीलर कंपन्या, विक्रीबाबतची आकडेवारी जाहीर

TVS कडून शेजारील देशात Ntorq 125 SuperSquad मार्वल एडिशन स्कूटर लाँच; जाणून घ्या खासियत

रॉयल एनफिल्डने वाढवली बाईकची किंमत, जाणून Classic 350 साठी किती पैसे मोजावे लागणार

(Top 10 two wheelers in india, hero once again tops the chart)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI