या 5 स्वस्त बाईक्समध्ये आहे ABS सेफ्टी फीचर, जाणून घ्या त्याच्याबद्दल…
1 जानेवारी 2026 पासून भारतातील सर्व दुचाकी वाहनांमध्ये एबीएस म्हणजेच अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम असणे आवश्यक झाले आहे. म्हणजेच आता प्रत्येक बाईक किंवा स्कूटरमध्ये तुम्हाला हे सेफ्टी फीचर्स मिळतील. मात्र, या गाड्यांच्या दरात किंचित वाढ होणार आहे.

सर्व दुचाकी वाहनांमध्ये एबीएस म्हणजेच अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम असणे आवश्यक झाले आहे. 1 जानेवारी 2026 पासून, हे लागू केलं आहे. एबीएस हे एक आवश्यक सुरक्षा फीचर्स आहे. विशेषत: भारतातील धोकादायक आणि खराब रस्त्यांवर हे फीचर उपयुक्त ठरते. जर तुम्ही कमी बजेटमध्ये एबीएस असलेली बाईक शोधत असाल तर येथे भारतातील 5 सर्वात स्वस्त बाईक्स आहेत, ज्या सिंगल चॅनेल एबीएससह येतात.
1. Hero Xtreme 125R
हिरोच्या सर्वात लहान एक्सट्रीम बाईकची किंमत आता 1 लाख रुपयांपेक्षा थोडी जास्त झाली आहे. पूर्वी याची किंमत 99,500 रुपये होती, परंतु अलीकडे 1,600 रुपयांनी वाढली आहे. तर बजाज पल्सर एनएस 125 पेक्षा ही कार 5,000 रुपये स्वस्त आहे. ही सध्या भारतातील सर्वात स्वस्त एबीएस बाईक आहे.
2. Bajaj Pulsar NS125
बजाजने नुकतेच हे मॉडेल एबीएससह अपडेट केले आहे. बेस व्हेरियंटची किंमत 1 लाख रुपयांपासून सुरू होते, पण आणखी 7,000 रुपयांमध्ये तुम्हाला टॉप व्हेरिएंट ‘एलईडी बीटी एबीएस’ मिळेल, ज्यात एबीएस, ऑल-एलईडी हेडलाइट, डिजिटल कंसोल आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीचा समावेश आहे. एबीएस मिळणारी ही पहिली 125 सीसी पल्सर आहे.
3. Hero Xtreme 160R 2V
ही बाईक हलकी, कमी पेट्रोल वापरणारी आणि किफायतशीर मानली जाते. 1.12 लाख रुपये किमतीच्या या लिस्टमध्ये याचाही समावेश आहे. भारतात 150-160 सीसी स्पोर्टी कम्युटर सेगमेंटमध्ये हिरोची ही नवीनएन्ट्री आहे. या मोटारसायकलची जागा आता बंद झालेल्या एक्सट्रीम स्पोर्ट्सने घेतली आहे.
4. Bajaj Pulsar 150
क्लासिक पल्सर मॉडेल 20 वर्षांहून अधिक काळापासून बाजारात आहे. नवीन पल्सर एनएस आणि एन सीरिज असूनही त्याची ओळख आणि लोकप्रियता अजूनही कायम आहे. बजाज पल्सर 150 ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी 150 सीसी कम्युटर बाईक आहे. जुनी असूनही ही बाईक मस्क्युलर स्टाइल, चांगले मायलेज आणि बजेट फ्रेंडली आहे.
5. Bajaj Pulsar N150
बजाजने नुकतीच लाँच केलेल्या या बाईकमध्ये बेस व्हेरियंटमधूनच ड्युअल चॅनेल एबीएस देण्यात आला आहे. यात एलईडी प्रोजेक्टर हेडलाईट आहे, डिजिटल डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सारखे फीचर्स उपलब्ध आहेत. ही कमी किमतीची मॉडर्न लुक आणि सेफ्टी बाईक आहे. याची किंमत 1.14 लाख रुपयांपासून सुरू होते.
