AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Touchscreen Bike पाहिली का? बोटांनी अशी होते कंट्रोल

Touchscreen Bike | कारमध्ये टचस्क्रीन असणे ही साधारण बाब झाली आहे. पण दुचाकीमध्ये असा फीचर मिळाला तर? डिजिटल डिस्प्ले आता दिसायला लागले आहेत. पण टचस्क्रीन बाईक तुम्ही पाहिली आहे का? या टचस्क्रीन फीचर्समुळे बोटांच्या इशाऱ्यावर ही बाईक तुम्हाला कंट्रोल करता येईल. टचस्क्रीनवर टॅपची ही सुविधा कोणत्या बाईकमध्ये आहे?

Touchscreen Bike पाहिली का? बोटांनी अशी होते कंट्रोल
| Updated on: Oct 28, 2023 | 4:24 PM
Share

नवी दिल्ली | 28 ऑक्टोबर 2023 : आता अनेक कारमध्ये टचस्क्रीनचे मॉर्डन फीचर देण्यात आले आहे. टचस्क्रीन डिस्प्लेमुळे आवडची गाणी, फोन कनेक्टिव्हिटी, एफएम अशा सुविधा मिळतात. पण टचस्क्रीनचा प्रयोग बाईकमध्ये तुम्ही पाहिला आहे का? अशा बाईक आपल्या अवतीभवती तरी नक्कीच नाहीत. सध्या मॉर्डन बाईकमध्ये डिजिटल डिस्प्ले दिसत आहे. पण त्याचा वापर मर्यादीत आहे. हे फीचर काही टचस्क्रीन नाही. तंत्रज्ञान इतके प्रगत झाले असताना पण दुचाकी कंपन्या टचस्क्रीन डिस्प्लेची दुचाकी का बरं आणतं नसतील? इतके नवनवीन फीचर जोडताना नेमका या उत्पादक कंपन्यांना टचस्क्रीन फीचरचाच का विसर पडत असेल बरं?

काही कंपन्या देतात फीचर

बाजारात काही मोटारसायकलमध्ये टचस्क्रीन मिळते. पण त्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. भारतीय बाजारात टॉप टू-व्हीलर्स कंपन्या नवीन मोटरसायकलमध्ये सेमी-डिजिटल वा डिजिटल इन्फोटेनमेंट स्क्रीनसह या दुचाकींची विक्री करतात. अर्थात या कंपन्या अगदी बोटावर मोजण्या इतक्या आहेत.

टचस्क्रीन बाईक

आंतरराष्ट्रीय दुचाकी बाजारात हार्ले-डेव्हिडसन आणि भारतीय मोटारसायकल कंपन्या त्यांच्या बाईकमध्ये टचस्क्रीनचा वापर करतात. या दोन्ही अमेरिकन ब्रँड्सच्या बाईकमध्ये टचस्क्रीन सहज उपलब्ध आहे. हार्ले डेव्हिडसन आणि इंडियन मोटारसायकलने स्वतः हे इन्फोटेन्मेट सिस्टिम विकसीत केली आहे. त्याला टचस्क्रीन देण्यात आली आहे. हार्ले-डेव्हिडसनच्या इन्फोटेनमेंट सिस्टिमचे नाव Boom Box आहे. तर इंडियन मोटारसायकलच्या नवीन सिस्टिमचे नाव Ride Command असे आहे. या दोन्ही सिस्टिम वाहनधारकांना टचस्क्रीन डिस्प्ले फीचर देतात.

या बाईकमध्ये आहे टचस्क्रीन

हार्ले डेव्हिडसनच्या Street Glide बाईकमध्ये बूम बॉक्स इन्फोटेनमेंट सिस्टिमसह टचस्क्रीन मिळते. तर इंडिया मोटारसायकलमध्ये या बाईकच्या एक्स-शोरुमची किंमत 37.49 लाख रुपयांपासून सुरु होते. इंडियन मोटरसायकलच्या Roadmaster आणि Chieftain Elite या सारख्या बाईकमध्ये टचस्क्रीनची सुविधा देण्यात आली आहे. रोडमास्टर आणि चीफटेन एलिटसाठी जवळपास 40-47 लाख रुपयांचे बजेट असेल.

काय आहेत फायदे बोट लावताच टचस्क्रीन डिस्प्ले माहिती देईल. या टचस्क्रीनमध्ये GPS नॅव्हिगेशन, हवामानातील बदल, बाईकचा वेग, समोरील वाहतूकीची सध्यस्थिती, कुठे कोंडी आहे. कुठे रस्ता मोकळा आहे, याची आगाऊ माहिती देईल. तसेच यापूर्वी बाईक कुठे उभी केली ते कळते. AM/FM रेडिओ, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, युएसबी ऑडिओ डिव्हाईस असे अनेक फीचर्स मिळतात.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?