Maruti Suzuki Ertiga सारखी दिसणारी ‘ही’ 7 सीटर कार कमी किंमतीत करा खरेदी, 20.51 किमीपर्यंत देते मायलेज
कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्यासाठी नवीन 7 सीटर कार घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला मारुती एर्टिगा सारखी लोकप्रिय असलेल्या कारबद्दल सांगणार आहोत. जी कार एर्टिगा सारखी 7 सीटर असून तुम्हाला कमी किमतीत खरेदी करता येणार आहे.

तुमचं कुटुंब जर मोठं असेल आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत लांबच्या प्रवासाला जायचे आहे तर तुम्ही सुद्धा 7 सीटर असलेली कार बाहेर घेऊन जाण्यासाठी पहिले प्राधान्य देतात. 7 सीटर कारने प्रवासाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे घरातील प्रत्येकजण एकत्र बसून प्रवासाचा आनंद घेऊन ट्रिप एन्जॉय करत असतात. अशातच 10 लाखापेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या Maruti Suzuki Ertiga ही कार लोकांना खूप आवडते आणि पहिली पसंतीची कार आहे. पण तुम्हाला माहित आहे का आपल्या भारतीय बाजारात अशी एक कार आहे जी Maruti Ertiga सारखी दिसते. तसेच एर्टिगा सारखी दिसणारी 7 सीटर कार तुम्हाला कमी किंमतीत तुमच्या बजेट प्रमाणे देखील खरेदी करता येणार आहे.
मारुती सुझुकी एर्टिगासारखी दिसणारी ही कार टोयोटा कंपनीची आहे. टोयोटा कंपनीकडे एक MPV (मल्टी पर्पज व्हेईकल) आहे जी तुम्हाला नक्की आवडेल, या कारचे नाव Toyota Rumion आहे. आम्ही तुम्हाला मारुती आणि टोयोटाच्या या कारची किंमत, मायलेज आणि सेफ्टी रेटिंगबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.
मारुती सुझुकी एर्टिगा किंमत आणि सेफ्टी रेटिंग
मारुतीच्या या 7 सीटर कारची किंमत 8 लाख 84 हजार रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, या किंमतीत तुम्हाला बेस व्हेरिएंट मिळेल. त्याचवेळी या कारच्या टॉप व्हेरियंटसाठी तुम्हाला 13 लाख 13 हजार रुपये (एक्स-शोरूम) देऊन कार खरेदी करावी लागेल.
2019 मध्ये Global NCAP ने या मारुती कारची क्रॅश चाचणी केली होती आणि त्या वेळी या कारला एडल्ट सेफ्टी आणि चाईल्ड सेफ्टी यामध्ये 3 स्टार रेटिंग मिळाले होते. 2019 नंतर या कारची चाचणी घेण्यात आलेली नाही.
मारुती सुझुकी एर्टिगा मायलेज
ही 7 सीटर कार पेट्रोल आणि CNG या दोन व्हेरियंटमध्ये खरेदी केली जाऊ शकते. तसेच ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनसह पेट्रोल व्हेरियंटसह, एक लिटर ऑइलपर्यंत 20.51 किमी मायलेज देते आहे, तर ऑटोमॅटिक प्रकारासह मायलेज 20.30 किमी पर्यंतचा आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या वाहनाचा सीएनजी व्हेरियंट एक किलो सीएनजीमध्ये 26.11 किलोमीटरचा मायलेज देईल.
टोयोटा रुमिओन किंमत आणि सेफ्टी रेटिंग
टोयोटा कंपनीची असलेली 7 सीटर एमपीव्हीचा बेस व्हेरिएंट 10 लाख 54 हजार रुपये (एक्स-शोरूम) मध्ये उपलब्ध आहे, तर टॉप व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी तुम्हाला 13 लाख 83 हजार रुपये (एक्स-शोरूम) देऊन कार खरेदी करावी लागेल. सेफ्टी रेटिंगबद्दल बोलायचे झाले तर या 7 सीटर कारची क्रॅश टेस्टिंग सध्या झालेली नाही.
टोयोटा रुमिओन मायलेज
जर तुम्हाला टोयोटाची रुमिओन ही 7 सीटर कार खरेदी करायची असेल, तर तुम्हाला या कारच्या मायलेजबद्दल देखील माहिती असणे आवश्यक आहे. कंपनीच्या मते, ही कार 20.51 किलोमीटर प्रति लीटर ऑइलपर्यंत मायलेज देते.
