AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आलिशान Toyota Vellfire ची किंमत किती? ही कार कुठल्या सेलिब्रिटींकडे आहे?

Toyota Vellfire : सेलिब्रिटी म्हटलं की महागडया कार आल्याच. पण, आम्ही तुम्हाला रोल्स रॉयस, बीएमडब्ल्यू किंवा ऑडीबद्दल नाही बोलत आहोत. टोयोटा कंपनीची Toyota Vellfire देखील अनेक फिल्म स्टार्सची पसंती आहे. कारण काय, जाणून घ्या.

आलिशान Toyota Vellfire ची किंमत किती? ही कार कुठल्या सेलिब्रिटींकडे आहे?
Toyota VellfireImage Credit source: टोयोटा
| Updated on: Nov 22, 2024 | 3:09 PM
Share

नुकताच बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने आपल्या कार कलेक्शनमध्ये Toyota Vellfire कारचा समावेश केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार, अजय देवगण, आमिर खान, भूमी पेडणेकर, अनिल कपूर, जान्हवी कपूर आणि आलिया भट्ट यांच्याकडेही टोयोटा कंपनीची Toyota Vellfire ही कार आहे. टोयोटा कंपनीच्या Toyota Vellfire या लक्झरी वाहनाची किंमत 1 कोटी 22 लाख 30 हजार रुपये (एक्स-शोरूम) ते 1 कोटी 32 लाख 50 हजार रुपये (एक्स-शोरूम) आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये या वाहनाची ऑन रोड किंमत वेगवेगळी असू शकते.

प्रत्येक राज्यात आरटीओ चार्जर आणि इतर शुल्क थोडे वेगळे असतात. ही कार ब्लॅक, प्लॅटिनम व्हाईट पर्ल आणि प्रिशियस मेटल कलरमध्ये खरेदी करता येईल. Toyota Vellfire या कारमध्ये अ‍ॅडव्हान्स हायब्रीड टेक्नॉलॉजीसह 2.5 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इलेक्ट्रिक मोटरला जोडलेले आहे. सुरक्षिततेसाठी या गाडीत 6 एअरबॅग्स, अॅडेप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन ट्रेस असिस्ट, प्री-कोलिजन सेफ्टी सिस्टीम असे अनेक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.

स्पीकर सिस्टिम

या कारमध्ये लेदर फिनिश आणि ड्युअल सनरूफसह ड्युअल टोन प्रीमियम डॅशबोर्ड आहे. या कारमध्ये 17 स्पीकर सिस्टिम देण्यात आली आहे. या गाडीत रेक्लिंग फंक्शन सह सीट देण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवासादरम्यान खूप आराम मिळतो.

या कारची किंमत किती?

बॉलीवूड इंडस्ट्रीतील फिल्म स्टार्सजवळ तुम्ही महागड्या मर्सिडीज, ऑडी, बीएमडब्ल्यू आणि रोल्स रॉयस गाड्या पाहिल्या असतील. पण, त्यात Toyota Vellfire देखील आहे. Toyota Vellfire ची किंमत 1 कोटी 22 लाख 30 हजार रुपये (एक्स-शोरूम) ते 1 कोटी 32 लाख 50 हजार रुपये (एक्स-शोरूम) आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये या वाहनाची ऑन रोड किंमत वेगवेगळी असू शकते. प्रत्येक राज्यात आरटीओ चार्जर आणि इतर शुल्क थोडे वेगळे असतात. ही कार ब्लॅक, प्लॅटिनम व्हाईट पर्ल आणि प्रिशियस मेटल कलरमध्ये खरेदी करता येईल.

जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.